India vs England 1st Test, Day 2 | बेन स्टोक्सची धमाकेदार अर्धशतकी खेळी, विक्रमाला गवसणी, ठरला तिसरा इंग्रज फलंदाज

India vs England 1st Test, Day 2 | बेन स्टोक्सची धमाकेदार अर्धशतकी खेळी, विक्रमाला गवसणी, ठरला तिसरा इंग्रज फलंदाज
बेन स्टोक्स

बेन स्टोक्सने (ben stokes) 118 चेंडूमध्ये 10 चौकार आणि 3 सिक्सह शानदार 82 धावांची खेळी केली

sanjay patil

|

Feb 06, 2021 | 4:17 PM

चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात (Team india vs england) चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा (India vs England, 1st Test, Day 2) खेळ सुरु आहे. इंग्लंडने या सामन्यातील पहिल्या डावात वर्चस्व मिळवलं आहे. इंग्लंडने ताज्या आकडेवारीनुसार 500 पेक्षा अधिक धावांचा टप्पा ओलांडला आहे. कर्णधार जो रुटच्या शानदार खेळीच्या जोरावर इंग्लंडने 500 धावा केल्या आहेत. दरम्यान ऑलराऊंडर (Ben Stockes) बेन स्टोक्सने 82 धावांची खेळी. स्टोक्सने यासह विक्रमाला गवसणी घातली आहे. (india vs england 1st test 2nd day ben stokes makes record for  sixes)

काय आहे विक्रम ?

स्टोक्सने सामन्याच्या 95 व्या ओव्हरमधील अश्विनच्या गोलंदाजीवर जोरदार सिक्स खेचला. हा सिक्स खेचताच स्टोक्सने कसोटी कारकिर्दीत 75 सिक्स लगावण्याची कामगिरी केली. तसेच तो इंग्लंडकडून कसोटीमध्ये सर्वाधिक सिक्स लगावणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. स्टोक्सने 118 चेंडूमध्ये 10 चौकार आणि 3 सिक्सह शानदार 82 धावांची खेळी केली. यासह स्टोक्सच्या नावावर एकूण 77 सिक्सची नोंद झाली आहे.

इंग्लंडकडून टेस्टमध्ये सर्वाधिक षटकार लगावण्याचा विक्रम माजी कर्णधार केवीन पीटरसनच्या नावावर आहे. पीटरसनने एकूण 81 षटकार लगावले आहेत. पीटरसनने आपल्या 10 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत ही कामगिरी केली आहे. तर अँड्यू फ्लिंटॉफच्या नावे 78 सिक्सची नोंद आहे.

सिक्सर किंग स्टोक्स

विशेष म्हणजे स्टोक्सने आपल्या 7 वर्षांच्या टेस्ट कारकिर्दीत 75 पेक्षा अधिक कडक सिक्स लगावले आहेत. स्टोक्सने 2013 मध्ये कसोटी पदार्पण केलं होत. तेव्हापासून इतर कोणत्याही फलंदाजाला स्टोक्सपेक्षा अधिक सिक्स लगावता आले नाहीत. पाकिस्तानचा मिस्बाह उल हक याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. मिस्बाहने या 7 वर्षांमध्ये 51 सिक्स मारले आहेत.

बेन स्टोक्सची कसोटी कारकिर्द

बेन स्टोक्सने आतापर्यंत 67 सामन्यांतील 122 डावांमध्ये 58.54 स्ट्राईक रेटसह तसेच 37. 48 च्या सरासरीने 4 हजार 428 धावा केल्या आहेत. यामध्ये 1 द्विशतक, 10 शतक आणि 22 अर्धशतकांचा समावेश आहे. 258 ही त्याची कसोटीमधील सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे. तसेच त्याने बोलिंगनेही शानदार कामगिरी केली आहे. स्टोक्सने कसोटीमध्ये 158 विकेट्स घेतल्या आहेत.

संबंधित बातम्या :

India vs England : इंग्लंडच्या खेळाडूंनी हातावर बांधल्या काळ्या पट्ट्या, काय आहे कारण?

Ravi Shastri | जेव्हा रवी शास्त्री 120 वर्षांचे झाले…

India vs england 1st Test | बुम बुम ! ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराहचा वर्ल्ड रेकॉर्ड

(india vs england 1st test 2nd day ben stokes makes record for  sixes)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें