India vs England 2nd Test | टीम इंडिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची घोषणा, संघात एकूण 4 बदल

दुसऱ्या कसोटीसाठी (india vs england 2021 2nd test) संघात एकूण 4 बदल करण्यात आले आहेत.

India vs England 2nd Test | टीम इंडिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडची घोषणा, संघात एकूण 4 बदल
इंग्लंड क्रिकेट टीम
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 3:40 PM

चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये 13 फेब्रुवारीपासून दुसरा कसोटी सामना (India vs England 2nd Test) खेळवण्यात येणार आहे. हा दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडने 12 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. कर्णधार जो रुटने (Joe Root) पत्रकार परिषदेदरम्यान याबाबतची माहिती दिली. दुसऱ्या कसोटीसाठी संघात एकूण 4 बदल करण्यात आले आहेत. (india vs england 2021 2nd test england announces 12 man squad for second test in chennai)

फास्टर बोलर जोफ्रा आर्चरला दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. तर जेम्स अँडरसनलाही वगळण्यात आलं आहे. आर्चर आणि अँडरसनच्या जागी संघात स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्सला संधी मिळाली आहे. तर फिरकीपटू डॉम बेसला डच्चू देत मोईन अलीला स्थान देण्यात आलं आहे. बेसने पहिल्या सामन्यात 5 विकेट्स घेतल्या. तर आक्रमक फलंदाज असलेल्या जोस बटलरलाही वगळण्यात आलं आहे.

2 नव्या चेहऱ्यांना संधी

इंग्लंड टीम मॅनेजमेटंने या दुसऱ्या कसोटीसाठी नव्या दमाच्या 2 खेळाडूंना संधी दिली आहे. ओली स्टोन आणि बेन फोक्स या नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

दुसऱ्या टेस्टसाठी इंग्लंडचा 12 सदस्यीय संघ : जो रूट (कर्णधार), रॉरी बर्न्स, डॉम सिबली, डॅन लॉरेन्स, बेन स्टोक्स, ओली पोप, मोईन अली, जॅक लीच, स्टुअर्ट ब्रॉड, ख्रिस वोक्स, बेन फोक्स आणि ऑली स्टोन.

दरम्यान अद्याप टीम इंडियाकडून दुसऱ्या कसोटीसोठी घोषणा करण्यात आलेली नाही. दुसऱ्या सामन्यात टीम इंडियामध्ये 3 बदल करण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे. विराट कोहली फिरकीपटू अक्षर पटेलला कसोटी पदार्पण करण्याची संधी देणार असल्याचं म्हटलं जात आहे. यामुळे नक्की कोणाच्या जागी कोणाला संधी मिळते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

प्रेक्षकांना परवानगी

क्रिकेट चाहत्यांना या दुसऱ्या कसोटीच्या निमित्ताने स्टेडियममध्ये येऊन सामना पाहता येणार आहे. त्यामुळे चाहते स्टेडियममध्ये येऊन जल्लोष करण्यासाठी उत्सुक आहेत. पण त्यांना कोरोनाच्या नियमांचं पालन करावे लागणार आहे.

संबंधित बातम्या :

India vs England 2021 | इंग्लंडला मोठा धक्का, हुकमाचा एक्का जायबंदी, दुसऱ्या कसोटीला मुकणार

India vs England 2nd Test | इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत कॅप्टन विराटला वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी

India vs England | टीम इंडियाविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी इंग्लंड संघाची घोषणा

(india vs england 2021 2nd test england announces 12 man squad for second test in chennai)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.