India vs England 2nd Test | इंग्लंडच्या गोलंदाजांची अफलातून कामगिरी, 66 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक

टीम इंडियाने (india vs england 2nd test 2nd day) पहिल्या डावात सर्वबाद 329 धावा केल्या.

India vs England 2nd Test | इंग्लंडच्या गोलंदाजांची अफलातून कामगिरी, 66 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक
टीम इंग्लंड

चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यातील (India vs England 2nd Test) दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांनी अफलातून कामगिरी केली आहे. यासह त्यांनी 66 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. (india vs england 2nd test 2nd day england bowlers did not give extra run in india 1st innings break 66 years old record)

इंग्लंडच्या बोलर्सनी एकूण 95.5 ओव्हर्स गोलंदाजी केली. इंग्लंडने टीम इंडियाला पहिल्या डावात 329 धावांवर ऑल आऊट केलं. पहिल्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांनी एकही अतिरिक्त धाव दिली नाही. म्हणजे टीम इंडियाला एकही धाव ही एक्स्ट्राच्या रुपात मिळाली नाही. इंग्लंडने या कामगिरीसह टीम इंडियाचा 66 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला. पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यात लाहोरमध्ये 1955 मध्ये सामना कसोटी सामना खेळण्यात आला. या सामन्यात पाकिस्तानने 328 धावा केल्या होत्या. यावेळेस भारतीय गोलंदाजांनी एकही अतिरिक्त धाव दिली नव्हती.

भारताने 300-6 (88 Overs) या धावसंख्येवरुन दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. मात्र यानंतर मोईन अली आणि ओली स्टोन या गोलंदाजांनी अवघ्या 29 धावांच्या मोबदल्यात टीम इंडियाच्या 4 विकेट्स घेतल्या. यासह भारताचा 329 धावांवर डाव आटोपला.

दरम्यान असा कारनामा करण्याची इंग्लंडची ही काही पहिली वेळ नाही. इंग्लंडने 90 वर्षांपू्र्वी 1931 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरोधात 130. 4 ओव्हर गोलंदाजी केली. यादरम्यान इंग्लंडच्या बोलर्सने एकही अतिरिक्त धाव दिली नव्हती. तसेच 1892 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना मेलबर्नमध्ये 191.5 ओव्हर बोलिंग केल्यानंतरही एक्स्ट्रा धावा दिल्या नव्हत्या.

टीम इंडियाचा पहिला डाव

टीम इंडियाकडून पहिल्या डावात हिटमॅन रोहित शर्माने सर्वाधिक 161 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 18 फोर आणि 2 सिक्स ठोकले. तर अजिंक्य रहाणेने 149 चेंडूत 9 फोरसह 67 धावा केल्या. तर रिषभ पंत 58 धावांवर नाबाद राहिला.

संबंधित बातम्या :

India vs England 2nd Test 1st Day | हिटमॅन रोहित शर्माचा अनोखा कारनामा, ठरला पहिलाच भारतीय

India vs England 2nd Test, 1st Day Highlights | रोहित-रहाणेची संयमी भागीदारी, पहिल्या दिवसखेर टीम इंडियाच्या 300 धावा

(india vs england 2nd test 2nd day england bowlers did not give extra run in india 1st innings break 66 years old record)

Published On - 1:46 pm, Sun, 14 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI