India vs England 2nd Test | कॅप्टन कोहली आणि जो रुटला किर्तीमान करण्याची संधी, अश्विनही स्पर्धेत

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात (India vs England 2nd Test) चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे.

India vs England 2nd Test | कॅप्टन कोहली आणि जो रुटला किर्तीमान करण्याची संधी, अश्विनही स्पर्धेत
विराट कोहली, जो रुट आणि आर अश्विन
Follow us
| Updated on: Feb 13, 2021 | 12:08 PM

चेन्नई : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये दुसरा कसोटी सामना (India vs England 2nd Test) खेळण्यात येत आहे. या दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंडमध्ये 4 तर टीम इंडियामध्ये 3 बदल केले आहेत. इंग्लंडने पहिला सामना जिंकल्याने ते या 4 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. दरम्यान या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), इंग्लंडचा कॅप्टन जो रुट (Joe Root) आणि फिरकीपटू आर अश्विनला (Ravichandran Ashwin) विक्रम करण्याची नामी संधी आहे. (india vs england 2nd test day 1 virat kohli r ashwin and joe root have chance to break record)

विराटला धोनीच्या विक्रमाच्या बरोबरीची संधी

विराटला टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे. धोनीने आपल्या नेतृत्वात भारतात एकूण 21 कसोटींमध्ये विजय मिळवून दिला होता. तर विराटने आपल्या कॅप्टन्सीमध्ये अद्याप 20 टेस्ट जिंकवून दिल्या आहेत. यामुळे विराटने हा दुसरा सामना जिंकल्यास विजयासह धोनीच्या विक्रमाची बरोबरीही करता येईल.

जो रुट पॉन्टिंगचा रेकॉर्ड ब्रेक करणार?

इंग्ंलंडचा कॅप्टन जो रुटला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचा विक्रम मोडीत काढण्याची संधी आहे. पॉन्टिंगने आशियात एकूण 1 हजार 889 कसोटी धावा केल्या आहेत. तर रुटला हा विक्रम मोडीत काढण्यासाठी अवघ्या 8 धावांची आवश्यकता आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार अॅलिस्टर कुक भारतीय उपमहाद्विपमध्ये सर्वाधिक धावा करणारा परदेशी फलंदाज आहे. कुकने आशियात 2 हजार 710 धावा केल्या आहेत. तर यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या माजी खेळाडू जॅक कॅलीस याबाबतीत 2 हजार 58 धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

अश्विनला हरभजनला मागे टाकण्याची संधी

फिरकीपटू आर अश्विनला टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंहचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. भारतात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा हा रेकॉर्ड आहे. हरभजनने भारतात एकूण 265 विकेट्स घेतल्या आहेत. हा विक्रम मोडण्यासाठी अश्विनला केवळ 3 विकेट्सची आवश्कता आहे. यामुळे अश्विनला पहिल्या डावात गोलंदाजीदरम्यान हा रेकॉर्ड आपल्या नावे करण्याची संधी आहे.

टीम इंडियावर भारतात मालिका गमावण्याचं संकट

दुसरा सामना गमावला तर 2012-13 नंतर टीम इंडियावर पहिल्यांदाच कसोटी मालिकेत (मायदेशात) 2 सामन्यात पराभूत होण्याची नामुष्की ओढावेल. याआधी इंग्लंडनेच भारताला 3 सामन्यांच्या मालिकेत 2-1 च्या फरकाने पराभूत केलं होतं.

संबंधित बातम्या :

India vs England 2nd Test | अक्षर पटेलचं कसोटी पदार्पण, फिरकीवर इंग्लंडला नाचवणार?

India vs England 2nd Test, 1st Day Live | हिटमॅन 80 धावांवर नाबाद, लंचपर्यंत टीम इंडियाच्या 3 बाद 106 धावा

(india vs england 2nd test day 1 virat kohli r ashwin and joe root have chance to break record)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.