AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India vs England 3rd Test | बॅटिंगसाठी खेळपट्टी चांगली होती, पीचबाबत टीका करणाऱ्यांना विराट कोहलीने सुनावलं

टीम इंडियाने इंग्लंडवर तिसऱ्या कसोटीत (india vs england 3rd test) 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. ही तिसरी कसोटी अवघ्या दुसऱ्या दिवसातील तिसऱ्या सत्रातच निकाली निघाली.

India vs England 3rd Test | बॅटिंगसाठी खेळपट्टी चांगली होती, पीचबाबत टीका करणाऱ्यांना विराट कोहलीने सुनावलं
टीम इंडियाने इंग्लंडवर तिसऱ्या कसोटीत (india vs england 3rd test) 10 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. ही तिसरी कसोटी अवघ्या दुसऱ्या दिवसातील तिसऱ्या सत्रातच निकाली निघाली.
| Updated on: Feb 26, 2021 | 12:44 PM
Share

अहमदाबाद : टीम इंडियाने पाहुण्या इंग्लंडवर तिसऱ्या कसोटीत (India vs England 3 rd Test) 10 विकेट्सने शानदार विजय मिळवला. या विजयासह भारताने 4 सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 ने आघाडी घेतली. ही तिसरी कसोटी अवघ्या दुसऱ्या दिवसातील तिसऱ्या सत्रात निकाली निघाली. 12 तासांमध्ये सामन्याचा निकाल लागला. या पीचवर फिरकी गोलंदाजांची चलती पाहायला मिळाली. यामुळे या खेळपट्टीबाबत अनेक दिग्गजांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच टीकाही केली. दरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) या पिचबाबत प्रतिक्रिया दिली आहे. (india vs england 3rd test captain virat kohli says good pitch from batting ahmedabad test)

विराट काय म्हणाला?

“खेळपट्टी बॅटिंग करण्यासाठी चांगली होती. पीच खराब नसून दोन्ही संघाच्या फलंदाजांची कामगिरी खराब होती”, अशी रोखठोक प्रतिक्रिया विराटने दिली. विराटने तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर ही प्रतिक्रिया दिली. “कोणत्याही बॅट्समनने पीचवर टिकून खेळण्याचा प्रयत्नच केला नाही. नाहीतर या खेळपट्टीवर खेळणं इतकं अवघडं नव्हतं. खेळपट्टीचा यामध्ये काहीच दोष नव्हता. पहिल्या डावात फक्त मोजकेच चेंडू टर्न होत होते. बॅटिंगचा स्तर फार वाईट होता. पहिल्या डावात 100 बाद 3 अशी आमची धावसंख्या होती. पण आम्ही 150 धावांच्या आत ऑलआऊट झालो. पहिल्या डावात फलंदाजासाठी खेळपट्टी फार पोषक होती. दोन्ही संघांनी या पीचवर तग धरुन फलंदाजी करण्याचा प्रयत्न केलाच नाही, असं विराटने स्पष्ट केलं.

अक्षर आणि अश्विनचं कौतुक

विराटने मॅचविनर ठरलेल्या लोकल बॉय अक्सर पटेल आणि रवीचंद्रन अश्विन या फिरकी जोडीचे कौतुक केलं. अक्षर पटेलने या सामन्यातील दोन्ही डावात मिळून एकूण 11 विकेट्स घेतल्या. तर अश्विननेही एकूण 7 विकेट्स घेतल्या.

चौथा कसोटी सामना 4 मार्चपासून

दरम्यान या मालिकेतील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना 4 ते 8 मार्चदरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना याच नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकून इंग्लंडचा एकतर्फी मालिका पराभव करण्याचा मानस टीम इंडियाचा असेल.

संबंधित बातम्या :

84 धावांवर गुंडाळला कांगारुंचा डाव, 8 विकेट्स घेत ‘या’ गोलंदाजाने ऑस्ट्रेलियाची उडवली दाणादाण

28 वर्षांपूर्वी 1 वाजून 51 मिनिटांनी ‘लिटील मास्टर’ सुनील गावसकर यांना ‘या’ खेळाडूमुळे ‘जोर का झटका’, नक्की काय घडलं?

(india vs england 3rd test captain virat kohli says good pitch from batting ahmedabad test)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.