AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video | जेम्स अँडरसनच्या बोलिंगवर रिषभ पंतने मारलेला रिव्हर्स स्वीप पाहिलात का?

रिषभ पंतने जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर (Rishabh Pant hit Reverse Sweep on James Anderson bowling)हा भन्नाट फटका खेचला.

Video | जेम्स अँडरसनच्या बोलिंगवर रिषभ पंतने मारलेला रिव्हर्स स्वीप पाहिलात का?
रिषभ पंतने जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर (Rishabh Pant hit Reverse Sweep on James Anderson bowling)हा भन्नाट फटका खेचला.
| Updated on: Mar 05, 2021 | 6:46 PM
Share

अहमदाबाद : टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा (india vs england 4th test) खेळ संपला आहे. या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने 7 विकेट्स गमावून 294 धावा केल्या. यासह टीम इंडियाने 89 धावांची निर्णायक आघाडी घेतली. रिषभ पंत (Rishabh Pant) दुसऱ्या दिवसातील खेळाचा हिरो ठरला. रिषभ पंतने 118 चेंडूत 13 चौकार आणि 2 षटकारांसह 101 धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान पंतने जेम्स अँडरसनच्या (James Anderson) बोलिंगवर भन्नाट रिव्हर्स स्वीप मारला. या रिव्हर्स स्वीपचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या अफलातून फटक्यासाठी पंतचं कौतुकही केलं जात आहे. (india vs england 4th test day 2 Rishabh Pant hit Reverse Sweep on James Anderson bowling)

पंतने असा मारला रिव्हर्स स्वीप

अँडरसन सामन्यातील 83 वी ओव्हर टाकयला आला. पंत आणि वॉशिग्टंन सुंदरमध्ये सातव्या विकेटसाठी 99 धावांची भागीदारी झाली होती. तर पंत स्वत: 89 धावांवर खेळत होता. अँडरसनने या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर पंतने परफेक्ट टायमिंगसह फर्स्ट स्लीपच्या डोक्यावरुन अचूक रिव्हर्स स्वीप लगावला. पंतने लगावलेला फटका पाहून अँडरसनही अवाक झाला. पंतने मारलेल्या या फटक्यानंतर इंग्लंड टीमचा विशेषत: अँडरसनचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. पंतने मारलेला या फटक्याने अनेक आजी माजी खेळाडूही प्रभावित झाले. या रिव्हर्स स्वीपसाठी पंतचं दिग्गज खेळाडूंकडून कौतुक केलं जातंय.

पंत रिव्हर्स स्वीप बद्दल काय म्हणाला?

“अशा प्रकारचे फटके मारताना विचार करावा लागतो. भाग्य तुमच्या बाजून असेल तर तुम्ही असे फटके मारण्याची जोखीम पत्कारू शकता. मला माझा नैसर्गिक खेळ करण्याची परवानगी आहे. पण मी परिस्थितीनुसार खेळण्याचा प्रयत्न करतो. मी माझ्या देशासाठी खेळतो. या दरम्यान जर क्रिकेट चाहत्यांना माझा खेळ पाहून आनंद वाटत असेल तर मी फार भाग्यवान आहे”, अशी प्रतिक्रिया पंतने सामन्यानंतर दिली.

संबंधित बातम्या :

India vs England 4th Test, Day 2 Live Updates | रिषभ पंतचे खणखणीत शतक, वॉशिंग्टनची ‘सुंदर’ खेळी, दुसऱ्या दिवसखेर टीम इंडियाकडे 89 धावांची आघाडी

India vs England 4th Test | व्वा पंत ! सिक्सर खेचत रिषभ पंतचे खणखणीत शतक पूर्ण

(india vs england 4th test day 2 Rishabh Pant hit Reverse Sweep on James Anderson bowling)

पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.