पाकविरुद्ध खेळायचं की नाही, निर्णय मोदी सरकार घेणार

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीआय) वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळायचं की नाही, याबाबतचा फैसला सरकारकडे सोपवला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाचं काम पाहणारी प्रशासक समिती (CoA) चे प्रमुख विनोद राय यांच्या उपस्थितीत आज पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर विनोद राय यांनी याबबतची माहिती दिली. पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळायचं की नाही याबाबत सरकारशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असं …

पाकविरुद्ध खेळायचं की नाही, निर्णय मोदी सरकार घेणार

नवी दिल्ली: भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीआय) वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळायचं की नाही, याबाबतचा फैसला सरकारकडे सोपवला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाचं काम पाहणारी प्रशासक समिती (CoA) चे प्रमुख विनोद राय यांच्या उपस्थितीत आज पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर विनोद राय यांनी याबबतची माहिती दिली. पाकिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळायचं की नाही याबाबत सरकारशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असं त्यांनी सांगितलं.

सध्या विश्वचषकासाठी तीन महिन्यांचा वेळ आहे. त्यामुळे सरकारशी चर्चा करुन पाकिस्तानविरुद्ध खेळायचं की नाही याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असं विनोद राय यांनी सांगितलं.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडावे अशी मागणी जोर धरत आहे. त्यातच क्रिकेट विश्वचषकातही भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळू नये अशीही मागणी पुढे आली. भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना 16 जूनला मँचेस्टर इथं होणार आहे. मात्र हा सामना खेळू नये, अशी मागणी होत आहे.  त्यामुळे बीसीसीआयच्या प्रशासक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आज बैठक घेतली.

सीओए प्रमुख विनोद राय यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना माहिती दिली.”सध्या आमची सरकारशी चर्चा सुरु आहे. 16 जूनला पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या सामन्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. आम्ही आयसीसीला दोन चिंता सांगू. पहिलं तर आमच्या खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा आणि दुसरा म्हणजे जो देश दहशतवादाला चालना देत आहे त्या देशाशी क्रिकेटचे संबंध तोडावे”, असं विनोद राय यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

 शोएब अख्तर म्हणतो, ‘पाकिस्तानसोबत न खेळण्याचा भारताला पूर्ण हक्क, पण…’ 

CoA Meeting LIVE : भारत-पाक मॅच होणार की नाही? नागपूरच्या थोडगेंची महत्त्वाची भूमिका  

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याला नागपुरात विरोध, मैदान खोदण्याचा इशारा 

पाकिस्तानविरुद्ध न खेळण्यापेक्षा, खेळून हरवा: सुनील गावसकर  

पुलवामा हल्ल्यानंतर राजनाथ सिहांची EXCLUSIVE मुलाखत  

‘पुलवामाप्रमाणे आत्मघाती हल्ला करु’, जैशनंतर आता हिजबुलची धमकी 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *