AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajinkya Rahane: मराठमोळ्या मुंबईकर अजिंक्य रहाणेला अजून एक चान्स मिळेल?

भारताचे बॅटिंग कोच विक्रम राठोड यांनी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराच्या बाबतीत संयम दाखवण्याचे आवाहन केले आहे.

Ajinkya Rahane: मराठमोळ्या मुंबईकर अजिंक्य रहाणेला अजून एक चान्स मिळेल?
Ajinkya Rahane
| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 6:27 PM
Share

सेंच्युरियन: दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होण्याआधी अजिंक्य रहाणेवरुन बरीच चर्चा झाली होती. अजिंक्य रहाणेला पहिल्या कसोटीत संधी द्यायची की, नाही, यावर बऱ्याच क्रिकेट पंडितांनी आपली मत मांडली. या सर्व चर्चेला कारण होता, तो अजिंक्य रहाणेचा फॉर्म. ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा अपवाद वगळता रहाणे मागच्यावर्षभरात फारशी चमकदार कामगिरी करु शकलेला नाही. त्यामुळे पूर्वपुण्याईवर संघात किती काळ खेळवायचं, हा प्रश्न निर्माण होणं, स्वाभाविक आहे. (India vs South Africa Will mumbai boy Ajinkya Rahane will get one more chance in Second Test)

अजिंक्य ज्या पाचव्या स्थानावर खेळतो, त्या क्रमांकावर त्याला श्रेयस अय्यर आणि हुनमा विहारी यांच्याकडून स्पर्धा आहे. अय्यरने न्यूझीलंडविरुद्ध केलेली शतकी खेळी आणि हनुमा विहारीने भारत ‘अ’ कडून खेळताना दक्षिण आफ्रिकेत केलेली दमदार कामगिरी, यामुळे रहाणेऐवजी या दोघांना संधी द्यावी असा एक मतप्रवाह आहे. आता दुसऱ्या कसोटीनंतर अजिंक्य रहाणेला संघात स्थान द्यायचे की, नाही, यावरुन पुन्हा चर्चा घडेल. कारण सेंच्युरियन कसोटीत भारतीय संघाची मधल्याफळीतील कामगिरी पाहता, रहाणेची कामगिरी फार आश्वासक नसली, तरी खूप वाईटही नाहीय.

सेंच्युरियनच्या दोन्ही डावात कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा अपयशी ठरले. त्या तुलनेत रहाणेने पहिल्या डावात 48 धावांची खेळी केली आणि दुसऱ्या डावात 20 धावा केल्या. दोन्ही डावात मिळून त्याने 12 चौकार लगावले. ही फार चांगली कामगिरी नाहीय. पण राहुल, मयांकचा अपवाद सोडल्यास, अन्य फलंदाजांची कामगिरी पाहिली, तर रहाणेला अजून एक संधी मिळू शकते किंवा मिळाली पाहिजे.

परदेशातील खेळपट्ट्यांवर रहाणेची कामगिरी चांगली आहे, त्यामुळे त्याला संधी द्यावी, असे क्रिकेटच्या जाणकरांचे मत होते. सेंच्युरियन कसोटीत रहाणेच्या फलंदाजीत तो अनुभव दिसला. त्यामुळे त्याला अजून एक संधी मिळाली पाहिजे. भारताचे बॅटिंग कोच विक्रम राठोड यांनी अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराच्या बाबतीत संयम दाखवण्याचे आवाहन केले आहे. सेंच्युरियनवरील पहिल्या कसोटीत रहाणे आणि पुजारा दोघांचा खराब फॉर्म कायम असला, तरी संघ व्यवस्थापन त्यांच्याबाबतीत अधीर किंवा उतावीळ झालेले नाही, असे विक्रम राठोड यांनी सांगितले.

“रहाणे आणि पुजारा त्यांच्याबाजूने सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतायत. दुर्देवाने त्यांचा खराब फॉर्मचा कालावधी लांबला आहे. पण यातून बाहेर येण्यासाठी त्यांना वेळ देण्याची गरज आहे” असे राठोड म्हणाले. या दौऱ्याआधी रहाणेने दक्षिण आफ्रिकेत 53 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या दोन दौऱ्यात तीन कसोटी सामने खेळले आहेत. दोन अर्धशतकासह 266 धावा केल्या आहेत.

संबंधित बातम्या: 

IND VS SA: सेंच्युरियनवरील विजयानंतर विराट कोहलीची पहिली प्रतिक्रिया म्हणाला…. IND VS SA: सेंच्युरियनमधील भारताच्या पहिल्या कसोटी विजयाचे ‘हे’ आहेत तीन हिरो IND VS SA: इतका राग बरा नव्हे, सिराजने बावुमाला मैदानावर फेकून मारला बॉल

(India vs South Africa Will mumbai boy Ajinkya Rahane will get one more chance in Second Test)

राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी
भाजपात नाराजी, कुणाला डावललं तर कुणाचं तिकीट कापल्यानं डोळ्यात पाणी.
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग
भाजपात AB फॉर्मवरून नाराजी, कार्यकर्त्यांकडून जिल्हाध्यक्षांचा पाठलाग.
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात
भाजपचे प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर निवडणुकीच्या रिंगणात.
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.