केदार जाधवची धोनीसोबत मॅच विनिंग खेळी, ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्सने मात

हैदराबाद : टीम इंडियाने हैदराबाद वन डेत ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्सने मात करत पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. मॅच फिनिशर महेंद्र सिंह धोनी आणि केदार जाधव यांच्या अभेद्य भागीदारीने भारताने ऑस्ट्रेलियावर सहज विजय मिळवला. धोनीने नाबाद 59 (72) तर केदार जाधवने नाबाद 81 (87) धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला. […]

केदार जाधवची धोनीसोबत मॅच विनिंग खेळी, ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्सने मात
सचिन पाटील

| Edited By:

Jul 05, 2019 | 4:22 PM

हैदराबाद : टीम इंडियाने हैदराबाद वन डेत ऑस्ट्रेलियावर सहा विकेट्सने मात करत पाच सामन्यांच्या वन डे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. मॅच फिनिशर महेंद्र सिंह धोनी आणि केदार जाधव यांच्या अभेद्य भागीदारीने भारताने ऑस्ट्रेलियावर सहज विजय मिळवला. धोनीने नाबाद 59 (72) तर केदार जाधवने नाबाद 81 (87) धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 237 धावांचं आव्हान दिलं होतं. विजयासाठी उतरलेल्या भारताला शिखर धवनच्या रुपाने पहिला धक्का लागला. शिखर धवनला खातंही उघडता आलं नाही, तो पहिल्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली (44) आणि रोहित शर्मा (37) यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण विराट बाद झाला आणि भारताची चिंता पुन्हा वाढली. यानंतर काही वेळातच रोहित शर्माही माघारी परतला.

अंबाती रायुडूलाही खास कामगिरी करता आली नाही. धोनीने टिच्चून फलंदाजी करत विकेट पडू दिली नाही. त्याला केदार जाधवची साथ लाभली. दोघांनी विजयी भागीदारी केली आणि भारताला विजय मिळवून दिला. भारताचा टी-20 मालिकेत पराभव झाला होता. त्यामुळे ही मालिका जिंकून त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी भारताकडे आहे.

त्याआधी ऑस्ट्रेलियाने 236 धावा केल्या. उस्मान ख्वाजा वगळता (50) ऑस्ट्रेलियाकडून कुणालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ग्लेन मॅक्सवेल (40), मार्कस स्टॉईनिस (37) यांनी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या उभारण्यास हातभार लावला. अॅलेक्स कॅरीने नाबाद 36 धावा करत ऑस्ट्रेलियाला 236 पर्यंत मजल मारुन दिली.

भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना सुरुवातीपासूनच वेसन घातली होती. शून्य धावसंख्येवर पहिला धक्का दिल्यानंतर एकावर एक धक्के देणं सुरुच होतं. मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, तर केदार जाधवने एका फलंदाजाला माघारी धाडलं.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें