AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND VS NZ : पहिला सामना जिंकलो, म्हणून विषय संपला नाही, हे असंच सुरु राहिलं तर टी20 वर्ल्ड कप जिंकण आपल्यासाठी कठीण

IND VS NZ : भारताने पहिल्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडवर एकतर्फी अंदाजात 48 धावांनी विजय मिळवला. या विजयात एक शान आहे पण तितकाच मोठा धोका सुद्धा दडलेला आहे. त्याकडे आज दुर्लक्ष केलं तर उद्या टी 20 वर्ल्ड कप जिंकण कठीण होऊन बसेल.

IND VS NZ : पहिला सामना जिंकलो, म्हणून विषय संपला नाही, हे असंच सुरु राहिलं तर टी20 वर्ल्ड कप जिंकण आपल्यासाठी कठीण
Team India Image Credit source: PTI
| Updated on: Jan 23, 2026 | 9:45 AM
Share

नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या टी 20 सामन्यात भारताने न्यूझीलंडवर एकतर्फी 48 धावांनी विजय मिळवला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 238 धावा केल्या. न्यूझीलंडच्या टीमने 190 धावा केल्या. टीम इंडियाला पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळाला. पण हा विजय मिळवताना टीमच्या खेळाडूंनी एक नाही तर दोन-दोन अशा चूका केल्या जो चिंतेचा विषय आहे. जर, असचं सुरु राहिलं, तर पुढच्या महिन्यापासून सुरु होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचं जिंकणं खूप कठीण आहे.

पहिल्या सामन्यात भारतीय टीमच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन केलं. पण फिल्डिंगमध्ये कामगिरी सरासरी होती. न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या टी 20 सामन्यात इशान किशन आणि रिंकू सिंह दोघांनी सोपे झेल सोडले. कॅच सोडणं हा फक्त एका मॅचचा विषय नाही. मागच्या काही सामन्यात भारतीय खेळाडू कॅच सोडत असल्याचं दिसून आलय. टेस्ट असो वा वनडे सीरीज टीम इंडियाचे खेळाडूंची फिल्डिंगमधील कामगिरी निराशाजनक आहे. कॅच पकडण्याच्या बाबतीत भारतीय टीम तिन्ही फॉर्मेटमध्ये खूप खाली आहे.

काय सांगता, इतके चान्स सोडले

भारतीय क्रिकेट टीमच्या फिल्डिंगच्या आकड्यांवर नजर टाकली तर ते खूप खराब आहेत. 2023 पासून आतापर्यंत टेस्ट खेळणाऱ्या 12 टीम्समध्ये कॅच पकडण्याच्या बाबतीत भारतीय टीम 10 व्या नंबरवर आहे. भारताची कॅच एफिशिएन्सी 78.1 टक्के आहे. इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये भारताने पहिल्या 3 टेस्ट मॅचमध्ये 8 कॅच सोडले. संपूर्ण सीरीजमध्ये भारताने एकूण 23 संधी गमावल्या.

र दुसऱ्यांदा आपण वर्ल्ड कप कसा जिंकणार?

वनडेमध्ये भारताची कॅच एफिशिएंसी 75.6 टक्के आहे. यातही भारत 10 व्या स्थानी आहे. आशिया कप 2025 मध्ये भारताने 25 पैकी 12 झेल सोडले. 8 टीम्समध्ये आपण हॉन्गकॉन्ग पेक्षा पुढे होतो. भारतीय खेळाडू इतके फिट आहेत, मग ते इतक्या कॅच का सोडत आहेत? टी 20 वर्ल्ड कप सारख्या स्पर्धेत असचं प्रदर्शन कायम राहिलं, तर दुसऱ्यांदा आपण वर्ल्ड कप कसा जिंकणार? या समस्येवर जलदगतीने उपाय शोधावा लागेल.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.