AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारदस्त कार भेट देणाऱ्या आनंद महिंद्रांना टी नटराजनकडून खास रिटर्न गिफ्ट

आनंद महिंद्रा यांच्याकडून मोठं गिफ्ट मिळाल्यानंतर नटराजनने त्यांनाही खास गिफ्ट पाठवलं आहे. | T Natarajan return Gift To Aanand Mahindra

भारदस्त कार भेट देणाऱ्या आनंद महिंद्रांना टी नटराजनकडून खास रिटर्न गिफ्ट
Anand mahindra And T Natrajan
| Updated on: Apr 02, 2021 | 12:23 PM
Share

मुंबई :  ऑस्ट्रेलियात (India vs Australia) केलेल्या शानदार प्रदर्शनामुळे चर्चेत आलेल्या भारतीय संघाचा नवा यॉर्करकिंग गोलंदाज टी नटराजनला (T Natarajan) महिंद्रा ऑटोमोबाईल्सचे मालक आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी थार एसयूव्ही (Thar SUV) ही भारदस्त गाडी भेट दिली होती. नटराजनने ट्विट करुन ही माहिती दिली आहे. त्याला महिंद्रा यांच्याकडून मोठं गिफ्ट मिळाल्यानंतर त्यानेही आनंद महिंद्रा यांना खास गिफ्ट पाठवलं आहे. (Indian bowler T Natarajan return Gift To Aanand Mahindra)

टी नटराजनने महिंद्रा यांना काय गिफ्ट दिलं?

भारतीय संघाने गाबाच्या कसोटीत ऑस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवला. या विजयात टी नटराजनने महत्त्वाची भूमिका बजावली. याच कसोटीत परिधान केलेली जर्सी सही करुन ती जर्सी त्याने महिंद्रा यांना दिली आहे. टी नटराजन याचं हे खास गिफ्ट आनंद महिंद्रा यांना देखील आवडल्याशिवाय राहणार नाही. कारण गाबाची कसोटी खूपच ऐतिहासिक ठरली. इथून पुढची कित्येक वर्ष हा विजय भारताच्या आठवणीत राहणार आहे. याच सामन्यात परिधान केलेली जर्सी नटराजनने महिंद्रा यांना गिफ्ट केल्याने हे गिफ्ट महिंद्रा यांना आवडल्यावाचून राहणार नाही.

नटराजनचा बोलिंग परफॉर्मन्स आवडला, महिंद्रा गाडी भेट देण्याची घोषणा

ऑस्ट्रेलियाविरुद्धची ब्रिस्बेन कसोटी जिंकण्यात टी नटराजनचा महत्त्वाचा वाटा होता. त्याच्या याच मॅचचा बोलिंग परफॉर्मन्स महिंद्रा यांना आवडला होता. हाच परफॉरमन्स पाहून महिंद्रा यांनी त्याला गाडी भेट देण्याची घोषणा केली होती. अखेर आयपीएलआधी महिंद्रा यांनी त्याला गाडी भेट दिली आहे. गाडीसोबतचे फोटो ट्विट करुन नटराजनने महिंद्रा यांना धन्यवाद दिले आहेत.

नटरानजचं रिटर्न गिफ्ट, गिफ्ट देताना म्हणतो…

भारतीय संघासाठी क्रिकेट खेळणं हे माझ्यासाठी खूप मोठा भाग्याचा क्षण आहे. माझा प्रवास खूपच कठीण रस्त्याने झालाय. परंतु याच रस्त्यावर मला चाहत्यांचं भरभरुन प्रेम मिळालं. त्याच बळावर मी चांगलं प्रदर्शन करु शकलो. आज मी महिंद्रा यांचं गिफ्ट स्वीकारतोय त्या वेळी मला भरुन आलंय. त्यांच्याविषयी मला आदर आहे. त्यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. त्यांनी माझा प्रवास ओळखला आणि माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. आपलं क्रिकेटविषयीचं प्रेम पाहता मी आपल्याला गाबा टेस्टमध्ये परिधान केलेली जर्सी भेट पाठवत आहे”

(Indian bowler T Natarajan return Gift To Aanand Mahindra)

हे ही वाचा :

Sachin Tendulkar | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

2011 Cricket World Cup : कॅन्सरशी लढला, मैदानात रक्त सांडलं, मात्र मागे हटला नाही, वर्ल्डकप जिंकलाच!

वादग्रस्त अंपायर्स कॉल निर्णयावर आयसीसीचा मोठा निर्णय, DRS नियमांमध्ये 3 मोठे आणि महत्त्वाचे बदल!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.