AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरे याला अगोदर संघाबाहेर काढा… हा आहे भारतीय संघातील खरा खलनायक, 5सामन्यात फक्त 24 रन ते…

टी 20 वर्ल्ड कप 2026 चांगलाच रंगात आला. मात्र, सध्याच्या परिस्थितीला भारतीय संघ मोठ्या अडचणीत सापडला. या वर्ल्ड कपमध्ये फलंदाजांची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. त्यामध्येच आता धक्कादायक आकडे पुढे येत आहेत.

अरे याला अगोदर संघाबाहेर काढा... हा आहे भारतीय संघातील खरा खलनायक, 5सामन्यात फक्त 24 रन ते...
20 World Cup 2026
| Updated on: Feb 26, 2026 | 12:29 PM
Share

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारतीय संघाने तूफान सुरूवात केली. मात्र, आता भारतीय संघ अडचणीत सापडला. दक्षिण आफ्रिकेसोबतच्या सामन्यात भारताचा दारूण पराभव झाला. तब्बल 76 धाव्यांनी भारताला हा पराभव स्वीकारावा लागवा. भारतीय संघाने पावरप्लेमध्ये काही मोठ्या चुका केल्या, ज्याचा थेट फटका बसला. तीन फलंदाजांची चूक अख्ख्या संघाला भोगावी लागत असून संघ मोठ्या अडचणीत सध्याच्या स्थितीला आहे. आज 26 फेब्रुवारीला वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका आमनेसामने आहेत. सुपर 8 फेरीतील होणारा हा सामना टीम इंडियासाठीही फार महत्त्वाचा असणार आहे. दक्षिण आफ्रिकेने हा सामना जिंकल्यास भारताला सेमी फायनलमध्ये जाण्याची समीकरणे सोपी होणार. झिम्बाब्वेविरुद्धचा सामना भारताला कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावा लागणार आहे. भारतीय संघाकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. सेमी फायनलमध्ये जायचे असेल तर झिम्बाब्वेचा पराभव करणे आवश्यक आहे

या सामन्यात भारताचा पराभव झाला तर टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात येईल आणि टी 20 वर्ल्ड कपवर आपले नाव कोरण्याचे स्वप्न अधुरे राहिल. मागच्या काही सामन्यात गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. पण फलंदाजांची कामगिरी निराशाजनक राहिली. पराभवानंतर सूर्यकुमार यादव स्पष्टच बोलताना दिसला. नक्की चूक कुठे झाली हे सांगताना सूर्या दिसला.  अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

कारण अभिषेक आणि तिलक दोघांचीही फलंदाजी फेल गेली. सतत या दोघांवर चर्चा होत आहे. मात्र, या टी 20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक निराशाजनक कामगिरी राहिलेल्या रिंकू सिंग याच्याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा याच्यापेक्षाही रिंकू सिंगची कामगिरी अधिक निराशाजनक राहिली. रिंकू सिंगने या वर्ल्ड कपमध्ये 5 मॅच खेळल्या आहेत. त्याने फक्त 29 बॉल खेळली. 29 बॉलमध्ये त्याला फक्त 24 रन काढण्यात यश मिळाले.

5 सामन्यात फक्त 29 बॉल खेळण्यात त्याला यश मिळाले. रिंकूने अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात 14 बॉलमध्ये फक्त 6 रन काढले. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो फक्त 4 बॉल खेळला त्यामध्ये 11 रन काढले (नाबाद) नामिबियाविरुद्ध 6 बॉलमध्ये फक्त 1 रन, नेदरलँड्सविरुद्ध 3 बॉलमध्ये (नाबाद) 6 रन केले आणि आता शेवटच्या दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात 2 बॉल खेळून तो शून्यावर आऊट झाला. दक्षिण आफ्रिकेच्या विरोधातील सामन्यात संघाला त्याची खरी गरज होती पण खेळू शकला नाही. आता रिंकू सिंगला संघातून बाहेर काढण्याची मागणी केली जात आहे.

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला