AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020 | चेन्नईला मोठा झटका, ‘हा’ अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर

चेन्नईला यंदाच्या मोसमात खेळलेल्या एकूण 10 सामन्यांपैकी केवळ 3 सामन्यातच विजय मिळवता आला आहे.

IPL 2020 | चेन्नईला मोठा झटका, 'हा' अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर
| Updated on: Oct 21, 2020 | 4:02 PM
Share

दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमात चेन्नई सुपर किंग्जसने (Chennai Super Kings) निराशाजनक कामगिरी केली आहे. चेन्नईने यंदाच्या मोसमात एकूण 10 सामन्यांपैकी केवळ 3 सामन्यातच विजय मिळवता आला आहे. तर 7 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यासह चेन्नई पॉइंट्सटेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे. चेन्नई आधीच संकटात आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे. चेन्नईच्या अष्टपैलू खेळाडूला दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडावे लागले आहे. ड्वेन ब्राव्होला मांडीच्या दुखापतीमुळे यंदाच्या मोसमातून बाहेर पडावे लागले आहे. IPL 2020 Chennai Super Kings All-Rounder Dwayne Bravo Ruled Out Due To Groin Injury

ड्वेन ब्राव्होला दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडावे लागणार आहे,अशी माहिती चेन्नईचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी पीटीआयसोबत बोलताना दिली. ब्राव्होला मांडीच्या दुखापतीमुळे काही सामने खेळता येणार नाही, अशी माहिती काही दिवसांपूर्वी चेन्नईचा हेड कोच स्टीफन फ्लेमिंगने दिली होती. ब्राव्होला किमान 10-15 दिवस विश्रांती करावी लागणार असल्याचं फ्लेमिंगने म्हटलं होतं. मात्र आता ब्राव्होला या स्पर्धेतूनच बाहेर पडावे लागले आहे.

नक्की प्रकरण काय?

ब्राव्होच्या मांडीला सीपीएल (CPL) स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात ब्राव्होला या दुखापतीचा त्रास अधिक तीव्रतेने जाणवला होता. त्यामुळे ब्राव्होला मैदान सोडावे लागले होते. ऐन मोक्याच्या क्षणी शेवटच्या ओव्हरमध्ये दिल्लीला विजयासाठी 17 धावांची आवश्यकता होती. मात्र ब्राव्हो मैदान सोडून गेल्याने धोनीला नाईलाज म्हणून रवींद्र जडेजाला शेवटची ओव्हर टाकायला द्यावी लागली. या शेवटच्या ओव्हरमध्ये दिल्लीच्या अक्षर पटेलने रवींद्र जडेजाच्या बोलिंगवर 3 सिक्स लगावत दिल्लीला विजय मिळवून दिला होता.

दरम्यान यंदाच्या मोसमातून अनेक संघातील अनेक खेळाडूंना दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे. यामध्ये सनरायजर्स हैदराबादच्या मिचेल मार्श आणि भुवनेश्वर कुमारचा समावेश आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्सचे अनुभवी गोलंदाज अमित मिश्रा आणि इशांत शर्मालाही दुखापतीमुळे बाहेर पडावे लागले.

चेन्नईच्या निराशाजनक कामगिरीची कारणं

चेन्नई आयपीएलमधील यशस्वी टीम होती. मात्र यंदाच्या मोसमात चेन्नईने फार ढिसाळ कामगिरी केली आहे. याचे कारणही तसेच आहे. मोसमाच्या सुरुवातीआधीच मिस्टर आयपीएल सुरेश रैना आणि हरभजन सिंह या दोघांनी वैयक्तिक कारणांमुळे माघार घेतली. सुरेश रैना चेन्नईचा स्टार खेळाडू होता. तो बॅटिंग, बोलिंग आणि फिल्डिंग अशा तीनही आघाड्यांवर यशस्वी कामगिरी करायचा. मात्र त्याने माघार घेतल्याने चेन्नई अडचणीत सापडली.

कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीला 10 सामन्यानंतरही सूर गवसला नाहीये. धोनीला मोठे फटके मारण्यासाठी अजूनही संघर्ष करावा लागतोय. तर दुसऱ्या बाजूला केदार जाधव सातत्याने संधी मिळूनही खराब कामगिरी करतोय. या सर्व कारणांमुळे चेन्नईला यंदाच्या मोसमात चमकदार कामगिरी करता आली नाही.

संबंधित बातम्या :

IPL 2020 | बंगळुरु विरुद्धच्या सामन्याआधी दिल्लीला मोठा फटका, ‘हा’ अनुभवी खेळाडू स्पर्धेबाहेर

IPL 2020 : हैदराबादला दुखापतीचे ग्रहण, मिचेल मार्श पाठोपाठ ‘हा’ मोठा खेळाडू स्पर्धेबाहेर, हैदराबादला मोठा धक्का

IPL 2020 Chennai Super Kings All-Rounder Dwayne Bravo Ruled Out Due To Groin Injury

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.