IPL 2020 | पाचव्या क्रमांकाआधी बॅटिंगसाठी ये, टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूचा धोनीला सल्ला

यंदाच्या मोसमात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला चमकदार कामगिरी करता आली नाही.

IPL 2020 | पाचव्या क्रमांकाआधी बॅटिंगसाठी ये, टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूचा धोनीला सल्ला

दुबई : आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमात प्लेऑफ फेरीसाठी चुरस पाहायला मिळत आहे. चौथ्या क्रमांकासाठी तब्बल 5 संघ शर्यतीत आहे. आज (23) ऑक्टोबरला चेन्नई सुपर किंग्जस (Chennai Super kings) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात यंदाच्या मोसमातील 41 वा सामना खेळण्यात येणार आहे. चेन्नईची 13 व्या मोसमात निराशाजनक कामगिरी राहिली आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू अजित आगरकरने (Ajit Agarkar) चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीला (Mahendra Singh Dhoni) एक सल्ला दिला आहे. IPL 2020 CSK Captain Mahendra Singh Dhoni Should Not Bat At Number Five Or Below Said Ajit Agarkar

चेन्नईच्या फलंदाजांनी या मोसमात निराशाजनक कामगिरी केली आहे. एकाही फलंदाजाला सातत्यापूर्ण कामगिरी करता आलेली नाही. स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. तरीही चेन्नईच्या फलंदाजीचा क्रम अजूनही ठरलेला नाही. कर्णधार धोनीही वेगवेगळ्या क्रमांकावर बॅटिंगसाठी येत आहे. धोनी पाचव्या किंवा त्यानंतरच बॅटिंगसाठी मैदानात येत आहे. धोनीने बॅटिंगसाठी 5 व्या क्रमांकाआधी आलं पाहिजे, असा सल्ला अजित आगरकरने दिला आहे.

“माझ्या हिशोबाने धोनीने पाचव्या किंवा त्यानंतरच्या क्रमांकावर बॅटिंग करायला नको. कोणी कोणत्या क्रमांकावर बॅटिंग करावी, हा निर्णय परिस्थितीनुसार घेतला जातो. पण धोनीने पाचव्या क्रमांकानंतर बॅटिंगसाठी येऊच नये. धोनी क्रिकेटमधील चतुर खेळाडू आहे. परिस्थितीनुसार धोनी निर्णय घेण्यात निपूण आहे. धोनीच्या कामगिरीत दिवसेंदिवस सकारात्मक बदल होत आहेत”, असं आगरकर म्हणाला.

धोनीची कामगिरी

धोनीची बॅट यंदाच्या मोसमात अजूनही तळपली नाहीये. धोनीने या मोसमात एकूण 10 सामने खेळले आहेत. यामध्ये धोनीने 27 च्या सरासरीने 184 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे धोनीला या 10 सामन्यात अर्धशतकही लगावता आलेलं नाही. धोनीची या मोसमातील 47 ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

चेन्नईची निराशाजनक कामगिरी

चेन्नईने 3 वेळा आयपीएलचं विजेतपद पटकावलं आहे. तर 10 वेळा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. पण या मोसमात चेन्नईला आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. चेन्नईने या मोसमातील सुरुवात विजयाने केली. मात्र त्यानंतर चेन्नईला पराभवाला सामोरे जावे लागले. चेन्नईने या मोसमात एकूण 10 सामने खेळले आहेत. यापैकी केवळ 3 सामन्यातच चेन्नईला विजय मिळवता आला आहे.

आगरकरची आयपीएल कारकिर्द

अजित आगरकरने आयपीएलमध्ये एकूण 42 सामने खेळले आहेत. या 42 सामन्यात आगरकरने 29 विकेट्स घेतल्या आहेत. 29 धावा देऊन 3 विकेट्स ही त्याची सर्वोच्च खेळी राहिली आहे. तर बॅटिंग करताना आगरकरने 179 धावा केल्या आहेत. 39 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020 | प्लेऑफमध्ये ‘हे’ तीन संघ पोहचणार, अजित आगरकरची भविष्यवाणी

IPL 2020 CSK Captain Mahendra Singh Dhoni Should Not Bat At Number Five Or Below Said Ajit Agarkar

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI