मुंबईचे तगडे फलंदाज विरुद्ध दिल्लीची आक्रमक गोलंदाजी, अंतिम सामन्यात कोण ठरणार वरचढ?

आजचा आयपीएल फायनलचा सामना मुंबईचे तगडे फलंदाज विरुद्ध दिल्लीची आक्रमक गोलंदाजी असाच होणार आहे. (IPL 2020 Final  Mumbai Indians batting VS Delhi Capital bowling)

मुंबईचे तगडे फलंदाज विरुद्ध दिल्लीची आक्रमक गोलंदाजी, अंतिम सामन्यात कोण ठरणार वरचढ?
यंदाच्या वर्षी आयपीएलला नवा चॅम्पियन मिळेल किंवा पुन्हा एकदा ती जादुई ट्रॉफी मुंबई इंडियन्स उंचावताना दिसेल. मंगळवारी मुंबई विरुद्ध दिल्ली अशी अंतिम सामन्याची रोमहर्षक लढत पार पडणार आहे. या लढतीत दिल्लीविरुद्ध मुंबईचं पारडं जड मानलं जातंय.
Follow us
| Updated on: Nov 10, 2020 | 2:54 PM

दुबईआयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील अंतिम सामना (IPL 2020 Live) आज (10 नोव्हेंबर) खेळवण्यात येणार आहे. हा अंतिम सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात होणार आहे. मुंबईकडे तगड्या फलंदाजांचा भरणा आहे तर त्या फलंदाजांना बांधून ठेवायला दिल्लीकडे आक्रमक आणि विकेट टेकर गोलंदाज आहेत. एकूणच आजचा सामना मुंबईचे तगडे फलंदाज विरुद्ध दिल्लीची आक्रमक गोलंदाजी असाच होणार आहे. (IPL 2020 Final  Mumbai Indians batting VS Delhi Capital bowling)

मुंबईची तगडी बॅटिंग लाईनअप

मुंबईकडे तगडी बॅटिंग लाईनअप आहे. यामध्ये क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन, कायरन पोलार्ड, कृणाल पांड्या, हार्दिक पांड्या यांसारखे एकासएक तगडे फलंदाज आहेत. हे सर्व फलंदाज आपल्या आक्रमक आणि हार्ड हिटिंगसाठी प्रसिद्ध आहेत. या सर्व फलंदाजांनी यंदाच्या मोसमात बहारदार कामगिरी केली आहे. तसेच या सर्व खेळाडूंमध्ये निर्णायक क्षणी सामना पलटववण्याची क्षमता आहे. त्यामुळे दिल्लीसमोर या सर्व फलंदाजांना रोखण्याचे आव्हान असेल.

कगिसो रबाडाचा भेदक मारा, अश्विनची फिरकी

दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा या मोसमात धमाकेदार गोलंजाजी करतोय. तसेच रबाडा या मोसमात आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स घेणार गोलंदाज ठरला आहे. त्याने एकूण 14 सामन्यात 29 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्याकडे पर्पल कॅपही आहे. त्यामुळे मुंबईच्या फलंदाजांसमोर कगिसोसमोर सावधपणे खेळावे लागणार आहे. तसंच अश्विन देखील आपल्या फिरकीच्या जोरावर फलंदाजांना जाळ्यात ओढण्यात माहिर आहे. अश्विनचा विशेष करुन कॅरम बॉल प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर मार्कस स्टॉयनिसने यंदाच्या मोसमात बॅटपेक्षा बॉलने अधिक चांगली कामगिरी केली आहे.

मुंबईची 5 वी तर दिल्लीची पहिली वेळ

आयपीएलच्या अंतिम सामन्यात पोहचण्याची ही 5 वी वेळ आहे. याआधी मुंबईने 2010, 2013, 2015, 2017 आणि 2019 मध्ये फायलनमध्ये धडक मारली होती. यामध्ये 2010 या सालचा अपवाद वगळता मुंबईने प्रत्येक वेळेस विजेतेपद पटकावलं आहे. चेन्नईने 2010 मध्ये अंतिम सामन्यात मुंबईचा पराभव केला होता. तर दुसऱ्या बाजूला दिल्लीची अंतिम सामन्यात पोहचण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुंबईला अंतिम सामन्यात खेळण्याचा अनुभव आहे. तर दिल्लीची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे अनुभवी मुंबईसमोर दिल्ली कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

यशस्वी कर्णधार

रोहित शर्मा हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार राहिला आहे. रोहितने आपल्या नेतृत्वात 4 ही वेळा मुंबईला विजेतेपद मिळवून दिलं आहे. या मोसमातील अंतिम सामन्यात नाणेफेकीसाठी मैदानात येताच रोहितच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद होणार आहे. असा भीम पराक्रम करणारा तो दुसराच खेळाडू ठरणार आहे. दिल्लीविरुद्धचा अंतिम सामना हा रोहितच्या आयपीएल कारकिर्दीतील 200 वा सामना असणार आहे. त्यामुळे रोहितकडून या अंतिम सामन्यात चमकदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

दोन्ही संघाचे कर्णधार मुंबईकर

मुंबई आणि दिल्ली या दोन्ही संघांचे कर्णधार मूळचे मुंबईकर आहेत. यामुळे या अंतिम सामन्यात हे दोन्ही मुंबईकर खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे.

(IPL 2020 Final  Mumbai Indians batting VS Delhi Capital bowling)

संबंधित बातम्या

IPL 2020 Final MI vs DC : मुंबई-दिल्ली अंतिम सामन्याविषयी 6 रंजक गोष्टी

IPL 2020, MI vs DC : सूर्यकुमार यादव-क्विंटन डी कॉकची अर्धशतकी खेळी, मुंबईची दिल्लीवर 5 विकेट्सने मात

IPL 2020, DC vs MI : इशान किशनची शानदार खेळी, मुंबईचा दिल्लीवर 9 विकेट्सने दणदणीत विजय

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.