AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020, RR vs DC | राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा बिहू डान्स पाहिलात का ?

दिल्लीविरुद्धच्या या सामन्यात राजस्थानचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने 4 ओव्हरमध्ये 4. 80 च्या इकॉनॉमी रेटने 19 धावा देत 3 विकेट घेतल्या.

IPL 2020, RR vs DC | राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा बिहू डान्स पाहिलात का ?
| Updated on: Oct 15, 2020 | 2:05 AM
Share

दुबई : आयपीएलच्या 30 व्या (IPL 2020) सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) 13 धावांनी पराभव केला. या विजयासह दिल्लीने पॉइंट्सटेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर झेप घेतली. मात्र हा सामना सुरु होण्याआधी तसेच पृथ्वी शॉला सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बोल्ड केल्यानंतर राजस्थानच्या जोफ्रा आर्चर आणि इतर खेळाडूंनी आसामी बिहू डान्स करत एकच धमाल उडवून दिली. आर्चरने रियान परागसोबत बिहू डान्सवर ठेका धरला. आयपीएलने आपल्या ट्विटर हॅंडलवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जोफ्रासोबत युवा खेळाडू आणि मूळचा आसामचा असलेला रियान पराग आणि राहुल तेवतियाही एन्जॉय करताना दिसत आहेत. ipl 2020 jofra archer perform Assamese bihu dance with riyan parag

राजस्थानने हैदराबादचा 26 व्या सामन्यात 5 विकेटने पराभव केला होता. युवा फलंदाज रियान परागने षटकार ठोकत राजस्थानला विजय मिळवून दिला होता. यानंतर रियान परागने मैदानातच हटके स्टाईलमध्ये बिहू नृत्य करत विजयी आनंद साजरा केला. यानंतर रियानचा नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यामुळे रियान ट्विटरवर ट्रेंड झाला होता. तेव्हापासून बिहू नृत्य चर्चेत आलं. तसेच रियानच्या डान्सनंतर अनेक नेटीझन्सनी बिहू स्टेपवर थिरकत आनंद लूटला.

https://twitter.com/tarun_reddy409/status/1315291799687028737

विजय मिळवल्यानंतर तसेच आनंदाच्या क्षणी अनेक क्रिकेटपटू मैदानात डान्सद्वारे आनंद व्यक्त करतात. यामध्ये वेस्टइंडिंजचे खेळाडू आघाडीवर आहेत. यामध्ये प्रामुख्याने ड्वेन ब्राव्हो, ख्रिस गेल यांचा नंबर लागतो. या दोन्ही खेळाडूंनी अनेकदा आयपीएल स्पर्धेत गंगनम स्टाईल डान्स केला आहे. तसेच कधीकधी विराट कोहलीही मैदानात थिरकताना दिसतो.

रियान परागची कारकिर्द

रियान पराग 2018 च्या अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या संघात होता. तेव्हा रियान अवघ्या 16 वर्षांचा होता. रियानने आयपीएलमध्ये 2019 साली पदार्पण केलं. तेव्हापासून ते आतापर्यंत रियानने आयपीएलमध्ये एकूण 13 सामने खेळले आहेत. यात त्याने 226 धावा केल्या आहेत. 50 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. रियानच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक ठोकण्याचा विक्रम आहे. रियानने वयाच्या साडे सतराव्या वर्षी ही कामगिरी केली होती. तसेच रियान लेगब्रेक बोलर आहे. रियानने गोलंदाजी करताना 2 विकेट्स घेतल्या आहेत.

रियानचे वडील पराग दास हे फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले आहेत. त्यांनी आसामचे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. यासह ते रेल्वेसाठीही खेळायचे. रेल्वेच्या या संघात महेंद्रसिंह धोनीही खेळायचा.

दिल्लीविरुद्धच्या या सामन्यात राजस्थानचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने 4 ओव्हरमध्ये 4. 80 च्या इकॉनॉमी रेटने 19 धावा देत 3 विकेट घेतल्या. आर्चरने सातत्याने राजस्थानसाठी निर्णायक क्षणी विकेट मिळवून देण्याची कामगिरी केली आहे. जोफ्राने यंदाच्या मोसमात खेळलेल्या एकूण 8 मॅचमध्ये 12 विकेट घेतल्या आहेत. पर्पल कॅपच्या यादीत जोफ्रा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

संबधित बातम्या :

IPL 2020, RR vs DC : दिल्ली कॅपिटल्सच्या शिखर धवनचा ‘गब्बर’ रेकॉर्ड, विराट कोहलीचा विक्रम मोडित

ipl 2020 jofra archer perform Assamese bihu dance with riyan parag

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.