IPL 2020, KKR vs KXIP : पंजाबचा सलग पाचवा विजय, कोलकातावर 8 विकेट्सने मात

मनदीप सिंह आणि ख्रिस गेल या दोघांनी अर्धशतकी खेळी केली.

IPL 2020, KKR vs KXIP : पंजाबचा सलग पाचवा विजय, कोलकातावर 8 विकेट्सने मात

शारजा : किंग्जस इलेव्हन पंजाबने (Kings Eleven Punjab) कोलकाता नाईट रायडर्सवर (Kolkata Knight Riders) 8 विकेट्सने मात केली आहे. कोलकाताने पंजाबला विजयासाठी 150 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान पंजाबने 7 चेंडूआधी 2 विकेट्स गमावून पूर्ण केलं. पंजाबकडून मनदीप सिंहने सर्वाधिक नाबाद 66 धावा केल्या. तर ख्रिस गेलने 51 धावांची तडाखेदार खेळी केली. कोलकाताकडून वरुण चक्रवर्थी आणि लॉकी फर्ग्युसनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

विजयी आव्हानाचे पाठलाग करायला आलेल्या पंजाबची चांगली सुरुवात झाली. पहिल्या विकेटसाठी मनदीप सिंह आणि कर्णधार लोकेश राहुलने 47 धावा जोडल्या. यानंतर लोकेश राहुल 28 धावांवर आऊट झाला. लोकेशनंतर ख्रिस गेल मैदानात आला. मनदीप सिंह आणि ख्रिस गेल या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. या भागीदारीदरम्यान मनदीप सिंह आणि ख्रिस गेल या दोघांनी आपले अर्धशतक पूर्ण केलं. गेल अर्धशतक केल्यानंतर 51 धावांवर आऊट झाला. गेलने 29 चेंडूत 2 फोर आणि 5 सिक्सच्या मदतीने तडाखेदार 51 धावा केल्या. तर मनदीप सिंहने 56 चेंडूत नाबाद 66 रन्सची खेळी केली. त्याने यामध्ये 2 सिक्स आणि 8 फोर लगावले.

त्याआधी पंजाबने टॉस जिंकून कोलकाताला बॅटिंगसाठी भाग पाडले. कोलकाताने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 149 धावा केल्या. कोलकाताकडून सलामीवीर शुभमन गिलने 45 चेंडूत 3 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने 57 धावा केल्या. तर कर्णधार इयोन मॉर्गनने 40 धावांची खेळी केली. पंजाबकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर ख्रिस जॉर्डन आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी 2 विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तसेच मॅक्सवेल आणि मुर्गन आश्विनने प्रत्येकी 1 विकेट घेतला.

या विजयासह पंजाबचा हा या मोसमातील सलग 5 वा विजय ठरला. पंजाबने पॉइंट्सटेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. IPL 2020 KKR vs KXIP Live Score Update Today Cricket Match Kolkata Knight Riders vs Kings Eleven Punjab Live

लाईव्ह स्कोअरकार्ड

Picture

पंजाबचा सलग पाचवा विजय

26/10/2020,10:56PM
Picture

पंजाबला दुसरा धक्का

26/10/2020,10:52PM
Picture

गेलचे अर्धशतक पूर्ण

26/10/2020,10:45PM
Picture

मनदीपचे अर्धशतक पू्र्ण

26/10/2020,10:36PM
Picture

12 ओव्हरनंतर पंजाबचा स्कोअर

26/10/2020,10:20PM
Picture

पंजाबला पहिला धक्का

26/10/2020,10:03PM
Picture

पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर पंजाब

26/10/2020,9:54PM
Picture

4 ओव्हरनंतर पंजाब

26/10/2020,9:44PM
Picture

पंजाबच्या बॅटिंगला सुरुवात

26/10/2020,9:40PM
Picture

पंजाबला विजयासाठी 150 धावांचे आव्हान

26/10/2020,9:38PM
Picture

कोलकाताला आठवा धक्का

26/10/2020,9:05PM
Picture

कोलकाताला सातवा धक्का

26/10/2020,8:52PM
Picture

कोलकाताला सहावा धक्का

26/10/2020,8:46PM
Picture

शुभमन गिलचे अर्धशतक

26/10/2020,8:44PM
Picture

13 ओव्हरनंतर कोलकाता

26/10/2020,8:39PM
Picture

कोलकाताचा अर्धा संघ तंबूत

26/10/2020,8:32PM
Picture

10 ओव्हरनंतर कोलकाताचा स्कोअर

26/10/2020,8:25PM
Picture

कोलकाताला चौथा धक्का

26/10/2020,8:23PM
Picture

कोलकाताचा 9 ओव्हरनंतर स्कोअर

26/10/2020,8:20PM
Picture

गिल-मॉर्गनने कोलकाताचा डाव सावरला

26/10/2020,8:13PM
Picture

7 ओव्हरनंतर कोलकाताचा स्कोअर

26/10/2020,8:08PM
Picture

पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर कोलकाता

26/10/2020,8:03PM
Picture

5 ओव्हरनंतर कोलकाताचा स्कोअर

26/10/2020,7:58PM
Picture

कोलकाताला तिसरा धक्का

26/10/2020,7:52PM

[/svt-event]

Picture

कोलकाता 1 ओव्हरनंतर

26/10/2020,7:35PM
Picture

नितीश राणा गोल्डन डक

26/10/2020,7:33PM
Picture

कोलकाताच्या बॅटिंगला सुरुवात

26/10/2020,7:30PM
Picture

दोन्ही टीमचे अंतिम 11 खेळाडू

26/10/2020,7:17PM
Picture

पंजाबची टीम

26/10/2020,7:16PM
Picture

कोलकाताची टीम

26/10/2020,7:16PM
Picture

पंजाबने टॉस जिंकला

26/10/2020,7:15PM

कोलकाता पंजाबवर वरचढ

आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत कोलकाता आणि पंजाब एकूण 26 वेळा आमनेसामने भिडलेत. यामध्ये कोलकाता पंजाबवर वरचढ ठरली आहे. कोलकाताने 26 पैकी 18 सामन्यात पंजाबवर मात केली आहे. तर पंजाबला 8 सामने जिंकण्यास यश आले आहे.

प्ले ऑफमध्ये चौथ्या क्रमांकासाठी 4 संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळतेय. त्यामुळे आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे. किंग्जस इलेव्हन पंजाबने सुरुवातीला सामने गमावले. मात्र त्यानंतर त्यांनी दमदार पुनरागमन केले. पंजाबने आतापर्यंत 11 सामन्यांपैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. पंजाब पॉइंट्सटेबलमध्ये 10 गुणासह 5 व्या क्रमांकावर आहे. तर कोलकाता 12 गुणांसह पॉइंट्सटेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळणार आहे.

कोलकाता नाइट रायडर्स : इयोन मॉर्गन (कर्णधार), शुभमन गिल, नितीश राणा, राहुल त्रिपाठी, दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्यूसन, पॅट कमिन्स, वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण, टॉम बॅंटन, सिद्धेश लाड, कमलेश नागरकोटी, प्रसिद्ध कृष्णा, संदीप वॉरियर, शिवम मावी, रिंकू सिंह, ख्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ आणि निखिल नाईक.

किंग्जस इलेवन पंजाब : केएल राहुल (कर्णधार), हरप्रीत बरार, ईशान पोरेल, मनदीप सिंह, जेम्स नीशाम, तजिंदर सिंह, ख्रिस जॉर्डन, करुण नायर, दीपक हुड्डा, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, ग्लेन मॅक्सवेल, मुजीब उर रहमान, सरफराज खान, शेल्डन कॉट्रेल, मयंक अग्रवाल, मोहम्मद शमी, दर्शन नालकंडे, निकोलस पूरन, ख्रिस गेल, मुरुगन अश्विन, जगदीश सुचित, कृष्णप्पा गौतम, हार्डस विलोजेन आणि सिमरन सिंह.

संबंधित बातम्या :

IPL 2020, KXIP vs KKR : चित्तथरारक सामन्यात कोलकाताची पंजाबवर 2 धावांनी मात

IPL 2020 KKR vs KXIP Live Score Update Today Cricket Match Kolkata Knight Riders vs Kings Eleven Punjab Live

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *