AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020: मुंबई इंडियन्सचे सलामीवीर ठरले, रोहित शर्मासोबत ‘हा’ खेळाडू सलामीला उतरणार !

IPL 2020: मुंबई इंडियन्सचे सलामीवीर ठरले, रोहित शर्मासोबत 'हा' खेळाडू सलामीला उतरणार ! (Quinton De Kock to open with MI captain Rohit Sharma).

IPL 2020: मुंबई इंडियन्सचे सलामीवीर ठरले, रोहित शर्मासोबत 'हा' खेळाडू सलामीला उतरणार !
| Updated on: Sep 18, 2020 | 2:28 PM
Share

यूएई : आयपीएलच्या 13 व्या मोसमाचं बिगुल वाजलं आहे. 13 व्या मोसमातील सलामीचा सामना खेळण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज सज्ज आहेत. हा सामना 19 सप्टेंबरला खेळला जाणार आहे. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्मा सलामीला उतरणार हे निश्चित आहे. मात्र त्याच्या जोडीला कोण असेल, याबाबतही आता मुंबईचा प्रशिक्षक महेला जयवर्धनेने स्पष्ट केलं आहे. दक्षिण आफ्रिकेचा विकेटकीपर फलंदाज क्विंटन डी कॉक हा रोहितसोबत सलामीला उतरेल, अशी माहिती जयवर्धनेने दिली. अबूधाबीतील पत्रकार परिषदेत जयवर्धनेने ही माहिती दिली. यावेळेस मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माही उपस्थित होता. (Quinton De Kock to open with MI captain Rohit Sharma).

महेला जयवर्धने काय म्हणाला ?

“सलामीसाठी मुंबईकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. या अनेक पर्यांयापैकी ऑस्ट्रेलियाचा ख्रिस लिन हा सलामीवीर म्हणून चांगला पर्याय आहे. लिनकडून सलामीवीर म्हणून डावाची सुरुवात केली जाऊ शकते. मात्र मुंबईसाठी सलामीवीर म्हणून रोहित आणि डी कॉक यांनी आयपीएलच्या मागील मोसमात दमदार कामगिरी केली होती. दोघेही अनुभवी आहेत. दोघे फार वेळ एकत्र खेळलेत. दोघांमध्ये उत्तम ताळमेळ आहे. रोहित उत्तम कर्णधार ही आहे. ही जोडी एकमेकांना पूरक आहे. त्यामुळे या क्रमात कोणताही बदल न करता आहे तो क्रम कायम ठेवणार” असं जयवर्धने म्हणाला.

रोहित शर्मा काय म्हणाला ?

रोहितने याआधीही मुंबईसाठी विविध क्रमांवर फलंदाजी केली आहे. रोहित सलामीसह तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरही खेळला आहे. “टॉप ऑर्डरमध्ये खेळताना मी मनसोक्त फटकेबाजी करत बॅटिंगचा आनंद घेतो. यंदाही मी फटकेबाजी करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मी उत्सुक असल्याचं रोहित म्हणाला आहे. टीममध्ये परिस्थिती आणि गरजेनुसार अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मागील मोसमात सर्व सामन्यात मी सलामीला आलो. तसेच यावेळेसही सलामीला खेळण्याचा विश्वास रोहितने व्यक्त केला. परिस्थितीनुसार मी वेगळ्या क्रमांकावर येऊन फलंदाजी करेन, असंही रोहित म्हणाला. संघ व्यवस्थापन जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल. संघात दुसऱ्या सलामीवीराची भूमिका डी कॉक बजावेल आणि हे निश्चित असल्याचं रोहितने पत्रकार परिषदेत नमूद केलं.

रोहित आणि डी कॉक

रोहित आणि डी कॉक या दोघांनी मागील मोसमात 16 पैकी 15 सामन्यात डावाची सुरुवात केली. या दोघांनी 37 च्या सरासरीने 5 अर्धशतकांच्या सहाय्याने 565 धावा केल्या होत्या.

आयपीएलचा 13 वा हंगाम एकूण 53 दिवस चालणार आहे. यंदा कोरोनामुळे आयपीएलचं यूएईमध्ये आयोजन केलं आहे. एकूण 53 दिवस आयपीएलचा महासंग्राम चालणार आहे.

या 53 दिवसांमध्ये एकूण 60 सामने खेळले जाणार आहेत. त्यापैकी 10 दिवस डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) सामने खेळवण्यात येणार आहे. यूएईतील अबूधाबी, शारजाह आणि दुबई या मैदानात हे सामने खेळवण्यात येतील. (Quinton De Kock Opening With Rohit Sharma).

संंबंधीत बातम्या : 

IPL 2020 | सलामीच्या लढतीत धोनीच्या चेन्नईपेक्षा रोहितची मुंबई भारी, गौतम गंभीरला विश्वास

IPL 2020 | तीन युवा खेळाडू आयपीएल पदार्पणासाठी सज्ज, सामना पलटवण्याची क्षमता

ICC ODI ranking | आयसीसी क्रमवारीत ‘विराट’ स्थान अबाधित, रोहित शर्माचा कितवा नंबर?

Follow Us
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट...
प्रताप सरनाईकांच्या दाव्यानंतर कैलास पाटलांची मोठी प्रतिक्रिया, थेट... धारशिवमध्ये राजकीय समीकरण पुन्हा बदलणार?
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण