AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL मधील संघांची संख्या वाढवण्याच्या BCCI च्या योजनेला राहुल द्रविडचं समर्थन; सांगितलं ‘कारण’

IPL मध्ये दोन नव्या संघांचा समावेश केला जाणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

IPL मधील संघांची संख्या वाढवण्याच्या BCCI च्या योजनेला राहुल द्रविडचं समर्थन; सांगितलं 'कारण'
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Nov 15, 2020 | 3:19 PM
Share

मुंबई : आयपीएलच्या 13 व्या मोसमाचा नुकताच शेवट झाला आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमी आता पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या 14 व्या मोसमाच्या प्रतीक्षेत आहेत. यावर्षी कोरोनामुळे आयपीएलच्या 13 व्या मोसमाला जवळपास 5 महिन्यांच्या विलंबाने सुरुवात झाली. मात्र आयपीएलचा 14 व्या हंगामाची सुरुवात (IPL 2021) सालाबादप्रमाणे मार्च महिन्यातच होईल, असा आशावाद बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (BCCI President Sourav Ganguly) व्यक्त केला होता. दरम्यान आयपीएलच्या पुढील हंगामात आणखी दोन संघ दिसू शकतात. किंवा पुढील हंगामात एक संघ आणि 2022 च्या आयपीएलमध्ये एक संघ वाढवला जाऊ शकतो. तसेच आयपीएलच्या काही नियमांमध्ये बदलही केले जाणार आहेत. (IPL 2020 : Rahul Dravid supports IPL Teams expansion says It will help young Indian Talent)

दरम्यान सध्या ज्या फ्रेंचायजी आयपीएलमध्ये सहभागी आहेत, त्यांना नव्या दोन संघांचा विचार पटलेला नाही. कारण दोन नवे संघ आले तर त्यांच्याकडील सध्याचे काही खेळाडू बदलले जाऊ शकतात. त्यांनी उभा केलेला संतुलित संघ बिघडू शकतो. शिवाय पुढील आयपीएलला फार वेळ शिल्लक नसल्यामुळे नव्याने टीम उभी करण्यासाठी पुरेसा अवधी नाही. परिणामी काही फ्रेंचायजी नव्या संघांबाबत अनुकूल दिसत नाहीत. दरम्यान, बीसीसीआयच्या नव्या योजनेला एका मोठ्या व्यक्तीचं समर्थन मिळालं आहे. टीम इंडियाचा माजी कर्णधार ‘द वॉल’ राहूल द्रविड आयपीएलमधील संघांच्या संख्येत वाढ करण्याच्या समर्थनात उभा राहिला आहे. द्रविडच्या मते, “आयपीएलमधील संघांची संख्या वाढली तर देशातील अनेक नव्या प्रतिभावान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसोबत खेळण्याची संधी मिळेल”.

नॅशनल क्रिकेट अकॅडमीचा (NCA) अध्यक्ष असलेला राहुल द्रविड म्हणाला की, “देशात खूप प्रतिभावान खेळाडू आहेत ज्यांना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळत नाही. अशा खेळाडूंसाठी आयपीएलचा विस्तार होणं गरजेचं आहे”. न्यूज एजन्सी PTI च्या रिपोर्टनुसार राहुल द्रविड राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाचे सह-मालक मनोज बदाले यांच्या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशनाच्या कार्यक्रमात द्रविड बोलत होता.

द्रविड म्हणाला की, “जर तुम्ही प्रतिभेच्या दृष्टीने पाहात असाल तर मी म्हणेन की आयपीएल आता विस्तारासाठी पूर्णपणे तयार आहे. देशात असे अनेक प्रतिभाशाली खेळाडू आहेत ज्यांना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळत नाहीए. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण आता आयपीएलच्या विस्ताराचा विचार करायला हवा”. दरम्यान यावेळी बदाले म्हणाले की, “आयपीएलमध्ये 9 व्या संघाचा समावेश करायला हवा. परंतु स्पर्धेची गुणवत्ता कायम राहायला हवी. तसेच स्पर्धेतील अनेक सामने दुपारी खेळवावे लागतील”.

IPL मध्ये मोठे बदल, दोन नवे संघ सहभागी होणार, एका संघात 4 ऐवजी 5 परदेशी खेळाडू खेळणार?

त्यालाच जाऊन विचारा ! रोहितच्या दुखापतीबाबतच्या प्रश्नावरुन ‘दादा’ भडकला

T 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं यजमानपद भारताला मिळणं हे सन्मानजनक : सौरव गांगुली

(IPL 2020 : Rahul Dravid supports IPL Teams expansion says It will help young Indian Talent)

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत