IPL 2020, RCB vs SRH: हैदराबादचा बंगळुरुवर 5 विकेट्सने शानदार विजय

हैदराबादने या विजयासह पॉइंट्सटेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

IPL 2020, RCB vs SRH: हैदराबादचा बंगळुरुवर 5 विकेट्सने शानदार विजय

शारजा : सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर (Royal Challengers Bangalore) 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. बंगळुरुने हैदराबादला विजयासाठी 121 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान हैदराबादने 5 विकेट्स गमावून 14.1 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. हैदराबादकडून ऋद्धीमान साहाने सर्वाधिक 39 धावा केल्या. तर मनिष पांडे आणि जेसन होल्डर प्रत्येकी 26 धावा केल्या. बंगळुरुकडून युझवेंद्र चहलने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तर वॉशिंग्टन सुंदर, नवदीप सैनी आणि इसरु उडाणाने प्रत्येकी 1 विकेट घेतला.

विजयी आव्हानाचं पाठलाग करायला आलेल्या हैदराबादची निराशाजनक सुरुवात झाली. हैदराबादला 10 धावांवर पहिला झटका बसला. कर्णधार डेव्हिड वॉर्नर 8 धावांवर बाद झाला. यानंतर ऋद्धीमान साहा आणि मनिष पांडे या दोघांनी दुसऱ्या विकेट्साठी अर्धशतकी भागीदारी केली. यानंतर मनिष पांडे 26 धावांवर बाद झाला. यानंतर ऋद्धीमानने हैदराबादचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ऋद्धीमानही 39 धावांवर बाद झाला. ऋद्धीमानने 32 चेंडूत 4 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 39 धावा केल्या. केन विलियम्सनला विशेष काही करता आले नाही. केन 8 धावांवर बाद झाला. हैदराबादला विजयासाठी अवघ्या काही धावांची गरज असताना अभिषेक शर्मा मोठा फटका मारण्याच्या घाईत 8 रन्सवर आऊट झाला. यानंतर जेसन होल्डरने षटकार खेचत हैदराबादला विजय मिळवून दिला. होल्डरने 10 चेंडूत 1 फोर आणि 3 सिक्ससह नाबाद 26 धावा केल्या.

त्याआधी हैदराबादने टॉस जिंकून बंगळुरुला बॅटिंगसाठी भाग पाडले. बंगळुरुने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 120 धावा केल्या. हैदराबादच्या गोलंदाजांपुढे बंगळुरुच्या फंलदाजांनी गुडघे टेकले. हैदराबादने बंगळुरुला ठराविक अंतराने धक्के दिले. बंगळुरुकडून सलामीवीर जोश फिलिपने सर्वाधिक 32 धावा केल्या. तर एबी डी व्हीलियर्सने 24 धावा केल्या. हैदराबादकडून संदीप शर्मा आणि जेसन होल्डरने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर थंगारसु नटराजन, शहाबाज नदीम आणि रशीद खान या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

IPL 2020 RCB vs SRH Live Score Update Today Cricket Match Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad लाईव्ह स्कोअर

Picture

हैदराबादचा 5 विकेट्सने सहज विजय

31/10/2020,10:47PM
Picture

हैदराबादला पाचवा धक्का

31/10/2020,10:42PM
Picture

हैदराबादचा 13 ओव्हरनंतर स्कोअर

31/10/2020,10:37PM
Picture

हैदराबादला चौथा धक्का

31/10/2020,10:32PM
Picture

हैदराबादला तिसरा झटका

31/10/2020,10:25PM
Picture

हैदराबादला दुसरा झटका

31/10/2020,9:59PM
Picture

पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर हैदराबादचा स्कोअर

31/10/2020,9:57PM
Picture

हैदराबादचा 4 ओव्हरनंतर स्कोअर

31/10/2020,9:41PM
Picture

हैदराबादला पहिला धक्का

31/10/2020,9:28PM
Picture

हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात

31/10/2020,9:19PM
Picture

हैदराबादला विजयासाठी 121 धावांचे आव्हान

31/10/2020,9:09PM
Picture

बंगळुरुला सातवा धक्का

31/10/2020,9:00PM
Picture

बंगळुरुला सहावा धक्का

31/10/2020,8:58PM
Picture

बंगळुरुला पाचवा धक्का

31/10/2020,8:52PM
Picture

14 ओव्हरनंतर बंगळुरुचा स्कोअर

31/10/2020,8:36PM
Picture

एबी पाठोपाठ जोश फिलिप आऊट

31/10/2020,8:24PM
Picture

बंगळुरुला तिसरा धक्का

31/10/2020,8:19PM
Picture

बंगळुरुच्या 9 षटकांनंतर धावा

31/10/2020,8:14PM
Picture

पावर प्लेच्या 6 ओव्हरनंतर बंगळुरुचा स्कोअर

31/10/2020,8:00PM
Picture

बंगळुरुला मोठा धक्का

31/10/2020,7:53PM
Picture

बंगळुरुला पहिला धक्का

31/10/2020,7:43PM
Picture

बंगळुरुचा 2 ओव्हरनंतर स्कोअर

31/10/2020,7:38PM
Picture

बंगळुरुच्या बॅटिंगला सुरुवात

31/10/2020,7:32PM
Picture

हैदराबादचे अंतिम 11 खेळाडू

31/10/2020,7:08PM
Picture

बंगळुरु प्लेइंग इलेव्हन

31/10/2020,7:08PM
Picture

हैदराबादने टॉस जिंकला

31/10/2020,7:02PM

बंगळुरु पॉइंट्सटेबलमध्ये 14 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर हैदराबाद 10 गुणांसह 7 व्या क्रमांकावर आहे. बंगळुरुला प्ले ऑफ फेरी गाठण्यासाठी केवळ 1 विजयाची आवश्यकता आहे. तर हैदराबादला प्ले ऑफ फेरीतील आव्हान कायम राखण्यासाठी उर्वरित सर्व सामने जिंकायचे आहेत.

आयपीएल स्पर्धेते हो दोन्ही संघ एकूण 16 वेळा आमनेसामने आले आहेत. या 16 पैकी 7 सामने बंगळुरुने जिंकले आहेत. तर 8 सामन्यात हैदराबादने बंगळुरुचा पराभव केला आहे. त्यामुळे आकडेवारीनुसार दोन्ही संघ तुल्यबळ आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : विराट कोहली (कर्णधार), अॅरॉन फिंच, देवदत्त पडीक्कल, पार्थिव पटेल, एबी डी व्हीलियर्स, गुरकीरत सिंह, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, डेल स्टेन, युजवेंद्र चहल, अॅडम झॅम्पा, इसुरु उदाना, मोईन अली, जोश फिलिप, पवन नेगी, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.

सनरायजर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर(कर्णधार), जॉनी बेयरस्टो, केन विलियम्सन, मनिष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंह, प्रियम गर्ग, ऋद्धिमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, संदीप शर्मा, संजय यादव, फॅबियन एलेन, पृथ्वी राज यारा, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टॅनलेक, थंगारसु नटराजन आणि बासिल थम्पी.

संबंधित बातम्या :

IPL 2020, SRH vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची विजयी सुरुवात, सनरायजर्स हैदराबादवर 10 धावांनी मात

IPL 2020 RCB vs SRH Live Score Update Today Cricket Match Royal Challengers Bangalore vs Sunrisers Hyderabad

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *