AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2020, SRH vs DC : अंपायर अनिल चौधरींचा पक्षपातीपणा, सनरायजर्स हैदराबादला मदत

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या सामन्यादरम्यान अंपायर अनिल चौधरी वादात सापडले.

IPL 2020, SRH vs DC : अंपायर अनिल चौधरींचा पक्षपातीपणा, सनरायजर्स हैदराबादला मदत
| Updated on: Oct 29, 2020 | 12:50 AM
Share

दुबई : आयपीएलच्या 13 व्या मोसमातील (IPL 2020) 47 वा सामना सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हैदराबादने दिल्लीचा 88 धावांनी पराभव केला. अनिल चौधरी (Anil Chaudhary) यांनी या सामन्यात फिल्ड अंपायरची भूमिका पार पाडली. अनिल चौधरी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या सामन्यात चौधरी यांनी हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरची मदत केली. चौधरी यांनी केलेल्या खाणा-खुणांमुळे वॉर्नरने डीआरएस न घेण्याचा निर्णय घेतला. हा सर्व प्रकार सामन्याच्या शेवटच्या काही षटकांदरम्यान घडला. यानंतर चौधरी यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच समालोचकांनीही चौधरी यांच्या वर्तणाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. IPL 2020 SRH vs DC Umpire Anil Chaudhary In The Controversy

नक्की प्रकार काय?

हैदराबादचा गोलंदाज संदीप शर्मा 17 वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरदरम्यान संदीपने टाकलेला चेंडू रवीचंद्रन आश्विनच्या पॅडला लागला. यामुळे संदीपने एलबीडबल्युसाठी अंपायरकडे अपील केली. मात्र ही अपील अनिल चौधरी नाकारली. त्यामुळे या निर्णयाला आव्हान म्हणून डीआरएस घ्यायचा का, याबाबत वॉर्नर संभ्रम होता. मात्र चौधरी यांनी बॅटला चेंडूचा स्पर्श झाला, असा इशारा केला. त्यामुळे वॉर्नरने डीआरस घेतला नाही. त्यामुळे चौधरी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

नियम काय सांगतात?

नियमांनुसार, संबंधित टीमला डीआरएस घेण्यासंदर्भात फिल्ड अंपायरसोबत कोणत्याही प्रकारे चर्चा करता येत नाही. तसेच डीआरएस घेण्यासंदर्भात संबंधित कर्णधार/खेळाडू मैदानाहबाहेरील सहकाऱ्यांची मदत घेत असेल, तर फिल्ड अंपायरला तो डीआरएसचा निर्णय रद्द करण्याचा अधिकार असतो.

दरम्यान या सामन्यात हैदराबादने दिल्लीचा पराभव केला. या पराभवामुळे दिल्लीला प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे. दिल्लीच्या साखळी फेरीतील आणखी 2 सामने उर्वरित आहेत. दिल्लीला यापैकी प्ले ऑफमध्ये धडकण्यासाठी एका विजयाची आवश्यकता आहे.

पराभवानंतर काय म्हणाला श्रेयस अय्यर?

“आमचा मोठ्या फरकाने पराभव झाला. पण यावेळस आम्ही पराभवाचं दु:ख करत बसू शकत नाही. आम्हाला साखळी फेरीतील आणखी 2 सामने खेळायचे आहेत. प्ले ऑफमध्ये पोहचण्यासाठी यापैकी केवळ 1 सामना जिंकायचा आहे. आम्ही मागील 3 सामन्यांपासून विजयासाठी आतुर झालो आहोत. हैदराबादविरुद्धच्या पराभवामुळे आम्हाला पुढील सामन्यात आणखी जोमाने खेळ करता येईल”, असं श्रेयस अय्यर म्हणाला.

संबंधित बातम्या :

IPL 2020, MI vs RCB : यॉर्करकिंग जसप्रीत बुमराहचे आयपीएलमधील 100 विकेट्स पूर्ण

IPL 2020, SRH vs DC : सनरायजर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर 88 धावांनी शानदार विजय

IPL 2020, SRH vs DC : “आमचा मोठा पराभव, आम्ही पावर-प्लेमध्येच सामना गमावला”, कर्णधार श्रेयस अय्यरची कबुली

IPL 2020 SRH vs DC Umpire Anil Chaudhary In The Controversy

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.