IPL 2020 | बंगळुरुविरुद्धच्या सामन्याआधी सनरायजर्स हैदराबादला मोठा झटका, ‘हा’ स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर

सनरायजर्स हैदराबाद पॉइंट्सटेबलमध्ये 7 व्या क्रमांकावर आहे.

IPL 2020 | बंगळुरुविरुद्धच्या सामन्याआधी सनरायजर्स हैदराबादला मोठा झटका, 'हा' स्टार खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर
sanjay patil

|

Oct 31, 2020 | 5:34 PM

दुबई : आयपीएलच्या 13 व्या मोसमात प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक संघ प्रयत्न करतोय. अशातच सनरायजर्स हैदराबादला (Sunrisers Hyderabad) मोठा धक्का लागला आहे. प्ले ऑफमध्ये जागा बनवण्यााठी रस्सीखेच पाहायला मिळतेय. अशा आव्हानात्मक परिस्थितीत हैदराबादला मोठा धक्का लागला आहे. दुखापतीमुळे हैदराबादच्या स्टार खेळाडूला आयपीएलच्या 13 व्या मोसमातून बाहेर पडावे लागले आहे. अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला (Vijay Shankar) दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर पडावे लागले आहे. त्यामुळे हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. विजय शंकरला ग्रेड 2 इंज्युरीमुळे स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे. विजयची दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात गुडघ्याच्या मागील नस दुखावली होती. IPL 2020 Sunrisers Hyderabad All Rounder Vijay Shankar Ruled Out Of IPL 2020 Due To Hamstring Injury

विजय दिल्लीविरुद्धच्या सामन्यात आपल्या कोट्यातील दुसरी ओव्हर टाकत होता. या दरम्यान त्याला दुखापतीचा त्रास जाणवला. या दुखापतीमुळे विजयला आपल्या स्पेलमधील दुसरी ओव्हरही पूर्ण करता आली नव्हती. दुखापतीमुळे विजयला मैदान सोडून ड्रेसिंगरुममध्ये जावे लागले होते.

विजयने यंदाच्या मोसमात 7 सामन्यात हैदराबादचे प्रतिनिधित्व केलं. या 7 सामन्यात त्याने 97 धावा केल्या. विजयने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात विजयी अर्धशतकी खेळी केली होती. तसेच त्याने या मोसमात 4 विकेट्सही घेतल्या होत्या.

विजयची आयपीएल कारकिर्द

विजयने 2014 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केलं. विजयने तेव्हापासून ते आतापर्यंत एकूण 40 सामने खेळले आहेत. यामध्ये विजयने बॅटिंग करताना 127.73 च्या स्ट्राईक रेटने 654 धावा केल्या आहेत. यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे. विजयची 63 नाबाद ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. तसेच विजयने गोलंदाजी करताना एकूण 6 विकेट्स घेतल्या आहेत.

दुखापतग्रस्त हैदराबाद

या मोसमाच्या सुरुपातीपासून हैदराबादच्या मागे दुखापतीचे ग्रहण लागले आहे. दुखापतीमुळे मिचेल मार्श आणि भुवनेश्वर कुमारला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे विजय शंकर हा तिसरा खेळाडू ठरला आहे.

हैदराबाद प्ले ऑफच्या शर्यतीत

हैदराबादने यंदाच्या मोसमात आतापर्यंत एकूण 12 सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. हैदराबाद पॉइंट्सटेबलमध्ये 10 गुणांसह 7 व्या क्रमांकावर आहे. प्ले ऑफच्या शर्यतीत आव्हान कायम राखण्यासाठी हैदराबादला उर्वरित 2 सामने जिंकणं आवश्यक असणार आहे. हैदराबादचा नेट रन रेट हा प्लस आहे. त्यामुळे हैदराबादची ही जमेची बाजू आहे. दरम्यान आज (31 ऑक्टोबर) हैदराबाद बंगळुरुविरुद्ध भिडणार आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020 : सनरायजर्स हैदराबादला मोठा धक्का, दुखापतीमुळे मिचेल मार्श स्पर्धेबाहेर

IPL 2020 : हैदराबादला दुखापतीचे ग्रहण, मिचेल मार्श पाठोपाठ ‘हा’ मोठा खेळाडू स्पर्धेबाहेर, हैदराबादला मोठा धक्का

ipl 2020 sunrisers hyderabad all rounder vijay shankar ruled out of IPL 2020 due to hamstring injury

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें