IPL 2021 : MS धोनी आला तसा गेला, ‘खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचं टेकऑफ नाही’, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस!

मागील मोसमापासून अपयश धोनीची पाठ सोडायला तयार नाही. धोनी शून्यावर बाद झाल्यानंतर इकडे सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रतिभेला बहर आला. MS Dhoni Clean Bold

IPL 2021 : MS धोनी आला तसा गेला, 'खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचं टेकऑफ नाही', सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस!
धोनीची बॅट बोलेना...
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 9:09 AM

मुंबई :  मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) बॅटिंगसाठी उतरला. मात्र दिल्लीचा युवा गोलंदाज आवेश खानने (Avesh Khan) त्याला चारी मुंड्या चित करत दुसऱ्याच बॉलवर त्याची दांडी उडवली. धोनी शुन्यावर आऊट झाला. त्याच्याकडून चेन्नईला खूप अपेक्षा होत्या. मागील मोसमापासून अपयश धोनीची पाठ सोडायला तयार नाही. धोनी शून्यावर बाद झाल्यानंतर इकडे सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या प्रतिभेला बहर आला. मुंबईत आणि महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांत ढगाळ वातावरण आहे. याच ‘ढगाळ वातावरणामुळे हेलिकॉप्टरचं टेकऑफ होऊ शकलं नाही’, असे मजेशीर ट्विट नेटकऱ्यांनी केले. (IPL 2021 CSK vs DC Avesh khan Clean Bold MS Dhoni Social Media Troll Dhoni)

आयपीएलच्या 14 व्या पर्वातील दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात मुंबईतील वानखेडे मैदानावर खेळविण्यात आला. प्रथम टॉस जिंकून दिल्लीने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. साहजिक इच्छा नसताना चेन्नईला बॅटिंग करावी लागली. चेन्नईच्या डावाची सुरुवात खराब झाली. सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्येच चेन्नईचे सलामीवीर डु-प्लेसीस (faf du plessis) आणि ऋतुराज गायकवाड (ruturaj gaikwad) तंबूत परतले.

धोनी डक आऊट

सलामीवीर तंबूत परल्यानंतर डावाची सूत्रे हातात घेतली ती आयपीएल मॅन सुरेश रैना (Suresh Raina) आणि अष्टपैलू मोईन अलीने (Moin Ali). अली 24 चेंडूत 36 धावा काढून तो आऊट झाला. अंबाती रायुडूदेखील (Ambati Rayudu) आक्रमक फटका खेळण्याच्या नादात 23 धावा काढून बाद झाला. सातव्या क्रमांकावर धोनीने मैदानात पाऊल ठेवलं. चेन्नईच्या फॅन्सला त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या. मात्र आवेशने ‘सुपर’ चेंडू टाकत धोनीला चकवा दिला आणि तंबूत जायला भाग पाडलं. धोनी डक आऊट झाला.

रैनाची दमदार बॅटिंग

यादरम्यान सुरेश रैनाने दमदार फलंदाजी केली. त्याने अवघ्या 32 चेंडूत हे अर्धशतक झळकावलं. रैना मैदानात चांगला सेट झाला होता. पण निर्णायक क्षणी रैना दुर्देवी ठरला. त्याला जडेजाने रनआऊट केलं. रैनाने एकूण 36 चेंडूत 54 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 3 चौकार आणि 4 षटकार लगावले.

अपयश धोनीची पाठ सोडायला तयार नाही

आयपीएलचा 13 वा हंगाम चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीसाठी खराब राहिला तसंच चेन्नईलाही समाधानकारक कामगिरी करता आला नाही. अगदी आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासात चेन्नईची एवढी खराब कामगिरी झाली नव्हती. प्ले ऑफच्या अगोदरच चेन्नईला आपला गाशा गुंडाळावा लागला होता. पाठीमागचं सगळं विसरुन 14 व्या हंगामात धोनी करामत करेल, अशी अपेक्षा चाहत्यांना होती. मात्र या सामन्यातही धोनी करामत करु शकला नाही. चेन्नईला सात विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला.

नेटकऱ्यांच्या प्रतिभेला बहर

(IPL 2021 CSK vs DC Avesh khan Clean Bold MS Dhoni Social Media Troll Dhoni)

हे ही वाचा :

IPL 2021 : सॅम vs टॉम, सख्ख्या भावाने सख्ख्या भावाला तुडवला, 6 बॉलमध्ये 23 धावा झोडल्या!

IPL 2021 : रवींद्र जडेजाची ‘ती’ चूक महागात, आक्रमक सुरेश रैना रन आऊट झाला तो क्षण, पाहा व्हिडीओ

IPL 2021 : ज्याला काही महिने हिणवलं, त्याच पृथ्वी शॉच्या धमाकेदार खेळीने टीकाकारांची तोंड बंद!

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.