AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : चेन्नईचा 7 विकेट्सने धुव्वा, ‘यांच्यामुळे’ पराभव झाला म्हणत धोनी भडकला!

चेन्नईने 188 धावा करुनही दिल्लीने लक्ष्य अगदी आरामात पूर्ण केलं. खरं तर दिल्लीच्या लवकर विकेट्स घेण्यात चेन्नईच्या गोलंदाजांना यश आलं नाही. (IPL 2021 DC vs CSK MS Dhoni)

IPL 2021 : चेन्नईचा 7 विकेट्सने धुव्वा, 'यांच्यामुळे' पराभव झाला म्हणत धोनी भडकला!
महेंद्रसिंग धोनी
| Updated on: Apr 11, 2021 | 9:57 AM
Share

मुंबई : पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) आणि शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) आयपीएलच्या 14 व्या मोसमाची विजयी सुरुवात केली. दिल्लीने चेन्नईवर (DC vs CSK) 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला. चेन्नईने दिल्लीला विजयासाठी 189 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान दिल्लीने 3 विकेट्सच्या बदल्यात 18.4 षटकांमध्ये पूर्ण केलं. चेन्नईने 188 धावा करुनही दिल्लीने लक्ष्य अगदी आरामात पूर्ण केलं. खरं तर दिल्लीच्या लवकर विकेट्स घेण्यात चेन्नईच्या गोलंदाजांना यश आलं नाही. चेन्नईचा कर्णधार धोनीने (MS Dhoni) गोलंदाजांना चेन्नईच्या पराभवाला जबाबदार धरलं आहे. (IPL 2021 Dc vs CSK bowler was responsible for Chennai Super Kings defeat)

धोनी काय म्हणाला?

दिल्लीकडून 7 विकेट्सने झालेल्या पराभवानंतर चेन्नईचा कर्णधार एम एस धोनी आपल्या गोलंदाजांवर भडकला. आमच्या गोलंदाजांना सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये विकेट्स मिळवता आल्या नाहीत. इथून पुढच्या सामन्यात पहिल्या मॅचमधल्या चुकांमधून गोलंदाजांनी शिकायला हवं, एवढ्या मोजक्या शब्दात धोनीने गोलंदाजांना खडसावलं.

चेन्नईचे गोलंदाज अपयशी

दिल्लीविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचे सरसकट सर्वच गोलंदाज अपयशी ठरले. शार्दुल ठाकूरला दोन विकेट्स मिळाल्या खऱ्या परंतु त्याने 3.4 षटकात तब्बल 53 धावा मोजल्या. ड्र्वेन ब्राव्होने 4 षटकात 28 धावा देत 1 विकेट मिळवली. उर्वरीत कोणत्याही गोलंदाजाला यश मिळालं नाही. पृथ्वी शॉ आणि शिखर धवनने ब्राव्होव्यतिरिक्त चेन्नईच्या सर्वच गोलंदाजांची धुलाई केली.

पृथ्वीची ‘गब्बर’ इनिंग

चेन्नईने दिलेले 189 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या सलामीवीरांनी चेन्नईला जोरदार प्रत्युत्तर दिलं. दिल्लीच्या दोन्ही सलामीवीरांनी धडाकेबाज अर्धशतकं झळकावत विजयाचा पाया रचला. शॉ ने अवघ्या 38 चेंडूत 72 धावांची धडाकेबाज खेळी केली. यात 3 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होतात. तर शिखरने 54 चेंडूत 85 धावा फटकावल्या. त्यात 2 षटकार आणि 10 चौकारांचा समावेश होता.

दिल्लीची विजयी सलामी

पृथ्वी शॉ आणि शिखर धवनच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएलच्या 14 व्या मोसमाची विजयी सुरुवात केली आहे. दिल्लीने चेन्नईवर 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. चेन्नईने दिल्लीला विजयासाठी 189 धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान दिल्लीने 3 विकेट्सच्या बदल्यात 18.4 षटकांमध्ये पूर्ण केलं.

(IPL 2021 DC vs CSK bowler was responsible for Chennai Super Kings defeat)

हे ही वाचा :

IPL 2021 : MS धोनी आला तसा गेला, ‘खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरचं टेकऑफ नाही’, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस!

IPL 2021 : रवींद्र जडेजाची ‘ती’ चूक महागात, आक्रमक सुरेश रैना रन आऊट झाला तो क्षण, पाहा व्हिडीओ

CSK vs DC, IPL 2021 Match 2 Result | पृथ्वी शॉ-शिखर धवनची शानदार अर्धशतकं, दिल्लीची चेन्नईवर 7 विकेटने मात

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.