IPL 2021 : रोहितच्या पलटणने आस्मान दाखवलं, मॅच चेन्नईच्या हातून कधी निसटली? धोनीने सांगितला नेमका ‘तो’ क्षण!

मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या महामुकबल्यामध्ये रोहितच्या पलटणने धोनीच्या किंग्जला 4 विकेट्सने नमवून ऐतिहासिक कामगिरी केली. या सामन्यात बिग हिटर कायरन पोलार्डने (Kieron Pollard) चेन्नईची पळता भुई थोडी केली. (IPL 2021 Mi vs CSk MS Dhoni Rued Dropped Catches After MI beat Csk)

IPL 2021 : रोहितच्या पलटणने आस्मान दाखवलं, मॅच चेन्नईच्या हातून कधी निसटली? धोनीने सांगितला नेमका 'तो' क्षण!
रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी...

मुंबई : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) पुन्हा दाखवून दिलं की स्कोअर कितीही मोठा असला तरी काय झालं?, आमच्याकडे जागतिक दर्जाचे सर्वोत्तम बॅट्समन आहेत, ज्यांच्याकडे कितीही मोठा स्कोअर चेस करण्याची क्षमता आणि प्रतिभा आहे. दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर शनिवारी खेळल्या गेलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या महामुकबल्यामध्ये रोहितच्या पलटणने धोनीच्या किंग्जला 4 विकेट्सने नमवून ऐतिहासिक कामगिरी केली. या सामन्यात बिग हिटर कायरन पोलार्डने (Kieron Pollard) चेन्नईची पळता भुई थोडी केली. एखाद्या झुल्यावर बसावं तशी मॅच एकडून तिकडे झुलत होती. अगदी शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर मुंबईने चेन्नईला धोबीपछाड दिला. चेन्नईने मॅच कुठे गमावली, याचं नेमकं कारण कर्णधार एम एस धोनीने (MS Dhoni) सामना संपल्यानंतर सांगितलं. (IPL 2021 Mi vs CSk MS Dhoni Rued Dropped Catches After Mumbai Indians Beat Chennai Super kings by 4 Wickets)

मॅच गमावल्यानंतर धोनी काय म्हणाला?

“दिल्लीचं पीच खूप खास होतं म्हणजेच बॅटिंगसाठी अनुकुल होतं. बॅटवर चांगल्या प्रकारे बॉल येत होता. आमच्या बोलर्सला मार पडला हे खरंय. मात्र फिल्डिंगमध्ये आमच्याकडून नको त्या चूका झाल्या. शिवाय आम्ही महत्त्वाचे कॅच सोडले. (धोनीला फॅफ डुप्लेसीने सोडलेला पोलार्डच्या कॅचवर अधिक प्रकाश टाकायचा होता किंबहुना त्याच्या मनात तीच खंत होती). आमच्या प्लॅननुसार बोलर्सला कामगिरी करण्यात अपयश आलं. त्यांनी काही खराब चेंडू टाकले तर काही चांगल्या चेंडूंवरही त्यांना फटके पडले. गुणतालिकेत सगळ्यात अव्वल स्थानी असल्यानंतर अशा पराभवावेळी तुम्हाला अधिक दु:ख होत नाही”

आमच्या प्लॅननुसार आमच्याकडून अंमलबजावणी झाली नाही

“आमच्या प्लॅननुसार आमच्याकडून अंमलबजावणी झाली नाही, हे ही तितकंच खरं आहे. पीचवर मोठे हिटर्स बॅटिंग करत असतात त्यावेळी काही प्लॅन्स आणि त्याच्यानुसार अंमलबजावणी करायची गरज असते. मात्र आमच्याकडून काही चुका झाल्या. या पीचवर मोठे शॉट्स खेळणं सोपं होतं. टूर्नामेंटमध्ये तुम्ही काही मॅचेस जिंकता तर काही मॅचेस जवळ येऊन हारता. जर आपण एक दोन षटकार खाल्ले नाही तर शेवटच्या ओव्हरमध्ये मॅच जिंकणं सोपं जातं. पराभव झाल्यावर नक्कीच दु:ख झालं पण संघाचं मनोबल मात्र अजिबात कमी झालं नाही. ज्यावेळी आपण दबावात असता त्यावेळी आपण खूप गोष्टी शिकतो….”, असं धोनी म्हणाला.

पोलार्डच्या वादळी खेळीत चेन्नई भुईसपाट

पोलार्डने चेन्नई विरुद्धच्या या सामन्यात 34 चेंडूत 6 फोर आणि 8 सिक्ससह 255.88 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 87 धावा चोपल्या. या दरम्यान पोलार्डने 17 चेंडूत अर्धशतक लगावलं. यासह पोलार्ड या 14 व्या मोसमात दिल्लीच्या पृथ्वी शॉला पछाडत कमी चेंडूत अर्धशतक झळकावणारा फलंदाज ठरला. पृथ्वीने 18 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं होतं.

पोलार्डने आपल्या खेळीत एकूण 8 सिक्स लगावले. त्यापैकी 3 सिक्स हे 90 मीटरपेक्षा अधिक लांबीचे लगावले. पोलार्डने 93, 97 आणि 105 मीटर लांबीचे गगनचुंबी सिक्स लगावले.

अष्टपैलू पोलार्डने चेन्नईची हवा गुल केली

पोलार्डने बॅटिंगसह बोलिंगनेही कमाल केली. पोलार्डने मुंबईकडून या सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 2 ओव्हरमध्ये 12 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे पोलार्डने बॅक टु बॅक 2 विकेट्स घेतल्या. पोलार्डने फॅफ डु प्लेसीस आणि सुरेश रैना या घातक फलंदाजांना बाद केलं.

चेन्नई विरुद्ध पोलार्डची सर्वोत्तम कामगिरी

पोलार्डने या सामन्यात बोलिंगसह बॅटिंगने शानदार अष्टपैलू कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीसाठी पोलार्डला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासह पोलार्ड चेन्नई विरुद्ध मुंबईकडून सर्वाधिक 4 वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार घेणारा खेळाडू ठरला.

(IPL 2021 Mi vs CSk MS Dhoni Rued Dropped Catches After Mumbai Indians Beat Chennai Super kings by 4 Wickets)

हे ही वाचा :

MI vs CSK IPL 2021 Match 27 | कायरन पोलार्डची झंझावाती खेळी, रंगतदार सामन्यात मुंबईचा चेन्नईवर 4 विकेट्सने धमाकेदार विजय

IPL 2021, MI vs CSK | वादळी खेळीसह पोलार्डचा विक्रम, मुंबईची ऐतिहासिक कामगिरी

Published On - 8:25 am, Sun, 2 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI