MI vs CSK IPL 2021 Match 27 | कायरन पोलार्डची झंझावाती खेळी, रंगतदार सामन्यात मुंबईचा चेन्नईवर 4 विकेट्सने धमाकेदार विजय

MI vs CSK 2021 Live Score Marathi | मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सवर 4 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे.

MI vs CSK IPL 2021 Match 27 | कायरन पोलार्डची झंझावाती खेळी, रंगतदार सामन्यात मुंबईचा चेन्नईवर 4 विकेट्सने धमाकेदार विजय
MI vs CSK 2021 Live Score Marathi | मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने

|

May 01, 2021 | 11:55 PM

नवी दिल्ली | मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सवर 4 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) विजयासाठी 219 धावांचे तगडे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान मुंबईने 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. पोलार्डने नाबाद 34 चेंडूत 87 धावांची विजयी खेळी साकारली. तसेच क्विंटन डी कॉकने 37, रोहित शर्माने 35 आणि कृणाल पंड्याने 32 धावा केल्या. तसेच हार्दिक पंड्याने 7 चेंडूत 2 सिक्ससह 16 धावांची निर्णायक खेळी केली. चेन्नईकडून सॅम करनने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. या सामन्याचे आयोजन दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये (Arun Jaitley Stadium) करण्यात आले होते.  (mi vs csk live score ipl 2021 match mumbai indians vs chennai super kings scorecard online arun jaitley stadium delhi in marathi)

Key Events

कायरन पोलार्डची वादळी खेळी

कायरन पोलार्ड मुंबईच्या विजयाच्या हिरो ठरला. पोलार्डने 34 चेंडूत 6 फोर आणि 8 सिक्ससह 255.88 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 87 धावा चोपल्या. तसेच त्याआधी पोलार्डने बोलिंग करताना 2 ओव्हरमध्ये 12 धावा देत 2 विकेट्स घेतल्या.

मुंबईचा मोठा विजय

मुंबईने आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा 200 पेक्षा अधिक विजयी धावांचे यशस्वीपणे पाठलाग केला आहे. चेन्नईने मुंबईला विजयासाठी 219 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान मुंबईने शेवटच्या चेंडूवर पू्र्ण केले. चेन्नईला पराभूत करत मुंबईने या मोसमातला चौथा विजय साकारला. मुंबई पॉंइट्स टेबलमध्ये 8 गुणांसह चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
 • 01 May 2021 11:49 PM (IST)

  मुंबईचा शानदार विजय

  मुंबईने चेन्नईवर 4 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. चेन्नईने विजयासाठी दिलेले 219 धावांचे आव्हान मुंबईने 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. कायरन पोलार्डने हा मुंबईच्या विजयाचा शिल्पकार ठरला. पोलार्डने 34 चेंडूत 87 धावांची नाबाद वादळी खेळी साकारली.

 • 01 May 2021 11:26 PM (IST)

  मुंबईला विजयासाठी 6 चेंडूत 16 धावांची आवश्यकता

  मुंबईला विजयासाठी 6 चेंडूत 16 धावांची गरज आहे. मैदानात कायरन पोलार्ड आणि धवल कुलकर्णी खेळत आहेत.

 • 01 May 2021 11:24 PM (IST)

  मुंबईला सहावा धक्का

  मुंबईला सहावा धक्का बसला आहे.  जेम्स निशाम आऊट झाला आहे. निशाम शून्यानवर बाद झाला.

 • 01 May 2021 11:22 PM (IST)

  मुंबईला पाचवा धक्का

  मुंबईला पाचवा धक्का बसला आहे. हार्दिक पंड्या आऊट झाला आहे. हार्दिकने 16 धावांची खेळी केली. यादरम्यान त्याने सलग 2 सिक्स लगावले.

 • 01 May 2021 11:20 PM (IST)

  हार्दिक पंड्याचे सलग 2 सिक्स

  हार्दिक पंड्याने 19 व्या ओव्हरच्या पहिल्या 2 चेंडूवर सॅम करनच्या गोलंदाजीवर सलग 2 षटकार लगावले.

 • 01 May 2021 11:17 PM (IST)

  फॅफकडून पोलार्डला जीवनदान

  फॅफ डु प्लेसिसने पोलार्डला 17 व्या ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर जीवनदान दिलं. फॅफने पोलार्डचा कॅच सोडला.

 • 01 May 2021 11:15 PM (IST)

  पोलार्डचा फॅल्ट सिक्स

  पोलार्डने  18 व्या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर फॅल्ट सिक्स लगावला.

 • 01 May 2021 11:12 PM (IST)

  सॅम करनची शानदार गोलंदाजी

  सॅम करनने सामन्यातील  17 वी आणि त्याच्या कोट्यातील तिसरी ओव्हर टाकली. या ओव्हरमध्ये त्याने केवळ 2 धावा देत 1 विकेट घेतली. सॅमने कृणाल पंड्याला एलबीडब्लूय आऊट करत चेन्नईला ब्रेक थ्रू मिळवून दिला.

 • 01 May 2021 11:09 PM (IST)

  मुंबईला चौथा झटका

  सॅम करनने  मुंबईला चौथा झटका दिला आहे. सॅमने कृणाल पंड्याला एलबीडबल्यू आऊट केलं. कृणालने 23 चेंडूत 32 धावांची खेळी केली.

 • 01 May 2021 11:06 PM (IST)

  मुंबईला विजयासाठी 24 चेंडूत 50 धावांची आवश्यकता

  मुंबईला विजयासाठी 4 ओव्हरमध्ये 50 धावांची गरज आहे. मैदानात कायरन पोलार्ड 55* आणि कृणाल पंड्या 32* धावांवर नाबाद खेळत आहेत. मुंबईने 16 व्या ओव्हरमध्ये  1 सिक्स, 2 फोर आणि 2 एकेरी धावांसह एकूण 16 धावा केल्या.

 • 01 May 2021 11:01 PM (IST)

  पोलार्डचे वेगवान अर्धशतक

  कायरन पोलार्डने चौकार ठोकत मोसमातील सर्वात वेगवान अर्धशतक लगावलं आहे. पोलार्डने 17 चेंडूत 3 फोर आणि 6 सिक्ससह हे अर्धशतक लगावलं.

 • 01 May 2021 10:52 PM (IST)

  पोलार्डचा गगनचुंबी सिक्स

  पोलार्डने 15 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर 103 मीटर लांबीचा गगनचुंबी सिक्स लगावला आहे.

 • 01 May 2021 10:47 PM (IST)

  पोलार्डचा झंझावात, सलग 2 सिक्स

  पोलार्डने 14 व्या ओव्हरच्या चौथ्या आणि पाचव्या बोलवर लुंगी एन्गिडीच्या गोलंदाजीवर सलग 2 सिक्स चोपले आहेत.

 • 01 May 2021 10:42 PM (IST)

  पोलार्डचे बॅक टु बॅक 2 सिक्स

  पोलार्डने 13 व्या ओव्हरच्या शेवटच्या 2 चेंडूवर रवींद्र जाडेजाच्या बोलिंगवर सलग 2 सिक्स लगावले.

 • 01 May 2021 10:39 PM (IST)

  पोलार्डचा जोरदार सिक्स

  कायरन पोलार्डने 13 व्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर रवींद्र जाडेजाच्या बोलिंगवर 97 मीटर लांबीचा सिक्स लगावला आहे.

 • 01 May 2021 10:33 PM (IST)

  कृणालचा जोरदार सिक्स

  कृणाल पंड्याने शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर 12 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर जोरदार सिक्स लगावला.

 • 01 May 2021 10:28 PM (IST)

  मुंबईला तिसरा धक्का

  मोईन अलीने मुंबईला तिसरा झटका दिला आहे.  मोईनने आपल्या गोलंदाजीवर  क्विंटन डी कॉकला कॅच आऊट केलं. डी कॉकने 38 धावा केल्या.

 • 01 May 2021 10:24 PM (IST)

  मुंबईला दुसरा धक्का

  मुंबईने दुसरी विकेट गमावली आहे. सूर्यकुमार यादव आऊट झाला आहे. रवींद्र जाडेजाने सूर्याला आपल्या बोलिंगवर विकेटकीपर महेंद्रसिंह धोनीच्या हाती कॅच आऊट केलं. सूर्याने 3 धावा केल्या.

 • 01 May 2021 10:19 PM (IST)

  मुंबईला मोठा धक्का

  मुंबईला मोठा धक्का बसला आहे.  कर्णधार रोहित शर्मा आऊट झाला आहे. शार्दुल ठाकूरने रोहितला 35 धावांवर ऋतुराज गायकवाडच्या हाती कॅच आऊट केलं.

 • 01 May 2021 10:09 PM (IST)

  मुंबईची पावर प्लेनंतरची धावसंख्या

  मुंबईने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये बिनबाद 58 धावा केल्या आहेत. रोहित शर्मा 31 तर क्विंटन डी कॉक 25 धावांवर नाबाद खेळत आहेत.

 • 01 May 2021 10:04 PM (IST)

  हिटमॅनचा शानदार सिक्स, सलामी जोडीची अर्धशतकी भागीदारी

  हिटमॅन रोहित शर्माने 6 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर लुंगी एन्गिडीच्या बोलिंगवर सिक्स खेचला आहे. यासह रोहितने क्विंटन डी कॉकसह अर्धशतकी भागीदारी केली आहे.

 • 01 May 2021 09:57 PM (IST)

  मुंबईची शानदार सुरुवात

  मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक सलामी जोडीने मुंबईला शानदार सुरुवात मिळवून दिली आहे. या दोघांनी 4 ओव्हरमध्ये बिनबाद 40 धावांची भागीदारी केली आहे. रोहित 21 तर क्विंटन 17 धावांवर नाबाद आहेत.

 • 01 May 2021 09:52 PM (IST)

  क्विटंन डी कॉकचा सिक्स

  क्विंटन डी कॉकने तिसऱ्या ओव्हरचा शेवट सिक्सने केला आहे.

 • 01 May 2021 09:48 PM (IST)

  रोहितचे सलग 2 चौकार

  रोहित शर्माने तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या 2 चेंडूवर सलग 2 चौकार लगावले आहेत.

 • 01 May 2021 09:39 PM (IST)

  मुंबई आणि क्विंटनची चौकाराने सुरुवात

  मुंबई आणि क्विंटन डी कॉकची चौकाराने सुरुवात झाली आहे. क्विंटने पहिल्याच चेंडूवर दीपक चाहरच्या गोलंदाजीवर शानदार चौकार लगावला.

 • 01 May 2021 09:38 PM (IST)

  मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात

  मुंबईच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक सलामी जोडी मैदानात खेळत आहेत. मुंबईला विजयासाठी 219 धावांची आवश्यकता आहे.

 • 01 May 2021 09:28 PM (IST)

  मुंबईला विजयासाठी 219 धावांचे आव्हान

  अंबाती रायुडची नाबाद 72 धावांची खेळी, फॅफ ड्यु प्लेसिस आणि मोईन अलीच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने मुंबईला विजयासाठी 219 धावांचे आव्हान दिले आहे. चेन्नईने 4 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 218 धावा चोपल्या. मुंबईकडून कायरन पोलार्डने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

 • 01 May 2021 09:09 PM (IST)

  अंबाती रायुडूचा झंझावात, 20 चेंडूत वेगवान अर्धशतक

  अंबाती रायुडूने चौकार ठोकत झंझावाती अर्धशतक पूर्ण केलं आहे. रायुडूने 20 चेंडूत हे अर्धशतक पूर्ण केलं.

 • 01 May 2021 09:05 PM (IST)

  चेन्नईचा 17 ओव्हरनंतर स्कोअर

  चेन्नईने 17 ओव्हरनंतर 4 विकेट्स गमावून 174 धावा केल्या आहेत. चेन्नईने या 17 व्या ओव्हरमध्ये 21 धावा चोपल्या. यासह अंबाती रायुडू आणि रवींद्र जाडेजा जोडीने पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.

 • 01 May 2021 08:59 PM (IST)

  अंबाती रायुडूचे सलग 2 सिक्स

  अंबाती रायुडूने 16 व्या ओव्हरमधील शेवटच्या 2 चेंडूवर धवल कुलकर्णीच्या गोलंदाजीवर सलग 2 सिक्स लगावले. या 16 व्या ओव्हरमध्ये चेन्नईने 17 धावा चोपल्या.

 • 01 May 2021 08:51 PM (IST)

  रायुडूचा जोरदार सिक्स

  अंबाती रायुडूने राहुल चहरच्या बोलिंगवर  15 ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर 93 मीटरचा जोरदार सिक्स लगावला.

 • 01 May 2021 08:43 PM (IST)

  पोलार्डचा धमाका, चेन्नईला सलग 2 धक्के

  कायरन पोलार्डने चेन्नईला सलग 2 धक्के दिले आहेत. पोलार्डने आधी फॅफ डु प्लेसिसला 50 धावांवर बाद केलं. त्यानंतर पुढील चेंडूवर सुरेश रैनाला 2 धावांवर कॅच आऊट केलं.

 • 01 May 2021 08:40 PM (IST)

  चेन्नईला तिसरा झटका

  चेन्नईला फॅफ डु प्लेसिसच्या रुपात तिसरा धक्का लागला आहे. फॅफला कायरन पोलार्डने जसप्रीत बुमराहच्या हाती कॅच आऊट केलं. फॅफने 28 चेंडूत 4 सिक्स आणि 2 फोरसह 50 धावांची अर्धशतकी खेळी केली.

 • 01 May 2021 08:37 PM (IST)

  फॅफ डु प्लेसीसचे वेगवान अर्धशतक

  फॅफ डु प्लेसीसने 27 चेंडूत शानदार अर्धशतक पूर्ण केलं आहे. फॅफ या मोसमात सातत्याने शानदार कामगिरी करत आहे.

 • 01 May 2021 08:35 PM (IST)

  चेन्नईला दुसरा धक्का

  चेन्नईने दुसरी विकेट गमावली आहे. मोईन अली कॅच आऊट झाला आहे. मोईनला जसप्रीत बुमराहने विकेटकीपर क्विंटन डी कॉकच्या हाती कॅच आऊट केलं. मोईनने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली.

 • 01 May 2021 08:32 PM (IST)

  दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी

  फॅफ डु प्लेसीस आणि मोईन अली या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे. ऋतुराज गायकवाडच्या रुपात चेन्नईने लवकर पहिली विकेट गमावली. यानंतर या दोघांनी शानदार फलंदाजी केली. विशेष म्हणजे या दरम्यान मोईनने जोरदार फटकेबाजी केली. मोईनने 33 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं.

 • 01 May 2021 08:19 PM (IST)

  मोईन अलीचे धमाकेदार अर्धशतक

  मोईन अलीने 33 चेंडूत शानदार अर्धशतक पूर्ण केलं आहे. मोईनने या खेळीदरम्यान 3 फोर आणि 5 सिक्स लगावले. मोईनच्या आयपीएल कारकिर्दीतील हे 4 थं अर्धशतक ठरलं.

 • 01 May 2021 08:13 PM (IST)

  मोईन अलीचा गगनचुंबी सिक्स, दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी

  मोईन अलीने 9 व्या ओव्हरमधील दुसऱ्या चेंडूवर राहुल चाहरच्या गोलंदाजीवर 88 मीटरचा गगनचुंबी सिक्स लगावला.यासह चेन्नईची दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाली आहे.

 • 01 May 2021 08:02 PM (IST)

  चेन्नईचा पावर प्लेनंतर स्कोअर

  चेन्नई सुपर किंग्सने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 49 धावा केल्या आहेत. मोईन अली 26* तर फॅफ डु प्लेसीस 17* धावांवर खेळत आहेत. चेन्नईने ऋतुराज गायकवाडच्या रुपात एकमेव विकेट गमावली.

 • 01 May 2021 07:43 PM (IST)

  मोईल अलीचा सिक्स

  मोईन अलीने तिसऱ्या ओव्हरमध्ये तिसऱ्या चेंडूवर लेग साईडला 69 मीटर लांबीचा सिक्स लगावला.

 • 01 May 2021 07:38 PM (IST)

  फॅफ डु चा जोरदार सिक्स

  फॅफ डु प्लेसिसने दुसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर धवल कुलकर्णीच्या गोलंदाजीवर सिक्स लगावला.

 • 01 May 2021 07:35 PM (IST)

  चेन्नईला पहिला धक्का

  चेन्नईला पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला झटका बसला आहे. ऋतुराज गायकवाड  कॅच आऊट झाला आहे.

 • 01 May 2021 07:32 PM (IST)

  ऋतुराज आणि चेन्नईची चौकाराने सुरुवात

  ऋतुराज गायकवाडने पहिल्याच ओव्हरमध्ये दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावत शानदार सुरुवात केली आहे.

 • 01 May 2021 07:30 PM (IST)

  चेन्नईच्या बॅटिंगला सुरुवात

  चेन्नई सुपर किंग्सच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. फॅफ डु प्लेसिस-ऋतुराज गायकवाड सलामी जोडी मैदानात खेळत आहेत.

 • 01 May 2021 07:20 PM (IST)

  चेन्‍नई सुपर किंग्‍स

  महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, फॅफ डु प्‍लेसीस, लुंगी एन्गिडी, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जाडेजा, सॅम करन, मोईन अली, शार्दुल ठाकुर आणि दीपक चाहर.

 • 01 May 2021 07:19 PM (IST)

  मुंबई इंडियन्सची पलटण

  रोहित शर्मा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, जसप्रीत बुमराह, राहुल चाहर, जेम्स नीशम, सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, कृणाल पंड्या, हार्दिक पंड्या, ट्रेन्ट बोल्ट आणि धवल कुलकर्णी.

 • 01 May 2021 07:16 PM (IST)

  मुंबईमध्ये 2 बदल

  चेन्नई विरुद्धच्या सामन्यासाठी मुंबईने 2 बदल केले आहेत. नॅथन कूल्टर नाइलच्या जागी मराठमोळ्या धवल कुलकर्णीला संधी देण्यात आली आहे. तर जयंत यादवऐवजी न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू जेम्स निशामचा समावेश करण्यात आला आहे. निशामचं मुंबईकडून पदार्पण ठरलं आहे. तर चेन्नईमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

 • 01 May 2021 07:09 PM (IST)

  मुंबईकडून जेम्स निशामचे पदार्पण

  न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू  जेम्स निशामने मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केलं आहे. नाणेफेकीआधी निशामला टीम कॅप देऊन त्याचं स्वागत करण्यात आलं.

 • 01 May 2021 07:05 PM (IST)

  मुंबईने टॉस जिंकला

  मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आहे. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चेन्नई बॅटिंग करणार आहे.

 • 01 May 2021 06:40 PM (IST)

  मुंबई विरुद्ध चेन्नई आमनेसामने

  आयपीएलच्या 14 व्या मोसमातील 27 वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे.

Published On - May 01,2021 11:49 PM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें