Suresh Raina | ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाचा कमाईबाबत विक्रम, मानाच्या पंगतीत स्थान

सुरेश रैना आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांपैकी एक आहे.

Suresh Raina | 'मिस्टर आयपीएल' सुरेश रैनाचा कमाईबाबत विक्रम, मानाच्या पंगतीत स्थान
सुरेश रैना

चेन्नई : सुरेश रैना ‘मिस्टर आयपीएल’ (Mister Ipl Sures Raina) म्हणून ओळखला जातो. रैनाने आतापर्यंत आयपीएलमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. रैनाने आपल्या बॅटिंगने विरोधी संघावर हल्ला चढवत अनेक विक्रम रचले आहेत. दरम्यान रैनाने आता आणखी एक विक्रम केला आहे. या विक्रमासह त्याने मानाच्या पंगतीत स्थान मिळवलं आहे. आयपीएलच्या 14 व्या मोसमासाठी रैना आणि चेन्नई सुपर किंग्जसमध्ये (Chennai Super Kings) करार करण्यात आला आहे. या करारासह रैनाच्या आयपीएलमधील कमाईचा आकडा हा 100 कोटीच्या पार गेला आहे. अशाप्रकारे रैना आयपीएलमधून 100 कोटींपेक्षा जास्त कमाई करणारा चौथा भारतीय तर एकूण पाचवा खेळाडू ठरला आहे. (ipl 2021 mister ipl suresh raina becomes 5th player who earning 100 crore ruppes)

आगामी मोसमासाठी 11 कोटींचा करार

आयपीएलच्या 14 व्या हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जसने सुरेश रैनासाठी 11 कोटी मोजले आहेत. याबाबतचे वृत्त InsideSport ने दिले आहे. यासह रैनाने आयपीएलमध्ये मानधनाच्या माध्यमातून 100 कोटींचा आकडा पार केला आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये ‘कॅप्टन कुल’ महेंद्रसिंह धोनी, ‘रनमशीन’ विराट कोहली, ‘हिटमॅन’ रोहित शर्मा आणि ‘मिस्टर 360’ एबी डीव्हीलियर्सने 100 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.

आयपीएलआधी रैनाची निराशाजनक कामगिरी

रैना आयपीएलच्या 14 व्या मोसमाआधी सय्यद मुश्ताक अली टी 20 ट्रॉफीमध्ये खेळत होता. रैना उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करत होता. या स्पर्धेत उत्तर प्रदेशला क्वार्टर फायनलमध्येही पोहचता आले नव्हते. तसेच रैनालाही फार विशेष कामगिरी करता आली नाही. रैनाने एकूण 5 सामन्यात केवळ 1 अर्धशतक लगावलं होतं. त्यामुळे रैनाची बॅट तळपलेली नाही. मात्र तो मिस्टर आयपीएल आहे, हे विसरुन चालणार नाही.

13 व्या मोसमातून माघार

आयपीएलच्या 13 व्या मोसमावर कोरोनाचं सावट होतं. यामुळे यूएईमध्ये या 13 व्या हंगमाचं आयोजन करण्यात आलं. मात्र रैनाने वैयक्तिक कारणांमुळे या मोसमातून माघार घेतली होती.

यशस्वी फलंदाज

रैना आयपीएलच्या इतिहासातील आतापर्यंतचा यशस्वी फलंदाज राहिला आहे. रैनाने एकूण 193 सामन्यात 137.14 च्या स्ट्राईक रेटने 1 शतक आणि 38 अर्धशतकासह 5 हजार 368 धावा केल्या आहेत. नाबाद 100 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या राहिली आहे. तसेच त्याने गोलंदाजी करताना 25 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.

संबंधित बातम्या :

Mahendra Singh Dhoni | आयपीएलची कमाल, ‘कॅप्टन कुल’ मालामाल, धोनीची छप्परफाड कमाई

(ipl 2021 mister ipl suresh raina becomes 5th player who earning 100 crore ruppes)

Published On - 4:28 pm, Fri, 22 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI