IPL 2021 | सामन्याआधी शमीच्या पाया पडला आणि मैदान गाजवलं, दीपक चहरची अफलातून गोलंदाजी

चेन्नई सुपर किंग्सचा (chennai super kings) वेगवाग गोलंदाज दीपक चाहरने (deepak chahar) पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात 4 विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीसाठी दीपकला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले.

IPL 2021 | सामन्याआधी शमीच्या पाया पडला आणि मैदान गाजवलं, दीपक चहरची अफलातून गोलंदाजी
चेन्नई सुपर किंग्सचा (chennai super kings) वेगवाग गोलंदाज दीपक चाहरने (deepak chahar) पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात 4 विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीसाठी दीपकला 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्काराने गौरवण्यात आले.
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 12:16 AM

मुंबई : कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या (Mahendrasingh Dhoni) चेन्नई सुपर किंग्जसने (Chennai Super Kings) केएल राहुलच्या (K L Rahul) पंजाब किंग्सला (Punjab Kings) पाणी पाजलं आहे. चेन्नईने पंजाबवर 6 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. पंजाबने चेन्नईला विजयासाठी 107 धावांचे आव्हान दिले होते. चेन्नईने हे विजयी आव्हान 15.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. (Moeen Ali) मोईन अली, फॅफ डु प्लेसिस (Faf Du Plesis) आणि दीपक चहर (Deepak Chahar) ही तिकडी चेन्नईच्या विजयाचे हिरो ठरले. वेगवाग गोलंदाज चहरने पंजाबच्या 4 विकेट्स घेत पंजाबच्या सलामी जोडी आणि मीडल ऑर्डरच्या फलंदाजांना माघारी धाडलं. त्याच्या या कामगिरीनंतर चहर आणि पंजाबचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचा (Mohammed Shami) एक फोटो व्हायरल होत आहे. (ipl 2021 pbks vs csk chennai super kings deepak chahar photo viral with mohammed shami)

काय आहे फोटोत?

या फोटोमध्ये शमी आणि दीपक एकत्र दिसत आहेत. दीपक या फोटोत मोहम्मद शमीच्या पाया पडताना दिसत आहे. हा फोटो सराव करतानाचा दिसून येत आहे.

दीपकने पंजाब विरुद्धच्या या सामन्यात एकूण 4 विकेट्स घेतल्या. त्यामुळे शमीने दिलेल्या या विजयी मंत्रमुळे दीपक यशस्वी झाला, असंही म्हटलं जात आहे. दीपकने आपल्या 4 ओव्हरच्या स्पेलमध्ये 13 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्याने यामध्ये मयंक अग्रवाल, ख्रिस गेल, निकोलस पूरन आणि दीपक हुड्डा या महत्वाच्या फलंदाजाना बाद केलं.

मोईन अली आणि फॅफ डु प्लेसिस शानदार फलंदाजी

मोईन अली आणि फॅफ डु प्लेसिस या जोडीने चेन्नईच्या विजयाचा पाया रचला. सलामीवीर ऋतुराज गायकवाड बाद झाला. त्यानंतर मोईन अली आणि फॅफ डु प्लेसिसने दुसऱ्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली. चेन्नईची 90 धावसंख्या असताना मोईन अली आऊट झाला.

मोईनने 46 धावांची खेळी केली. त्यानंतर फॅफ मैदानात अखेरपर्यंत मैदानात टिकून राहिला. सुरेश रैना आणि अंबाती रायुडूने झटपट बाद झाले. त्यानंतरही फॅफने एक बाजू लावून धरत चेन्नईला विजय मिळवून दिला.

संबंधित बातम्या :

PBKS vs CSK IPL 2021, Match 8 Result | चेन्नई सुपर किंग्सचा पंजाबवर 6 विकेट्सने सहज विजय

Ravindra Jadeja | आधी रॉकेट थ्रो करत रन आऊट, त्यानंतर हवेत झेपावत शानदार कॅच, रवींद्र जाडेजाची शानदार फिल्डिंग, पाहा व्हिडीओ

(ipl 2021 pbks vs csk chennai super kings deepak chahar photo viral with mohammed shami)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.