AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 20205 : धोनीच्या टीमचा पराभव दिसताच अभिनेत्रीच्या डोळ्यात तरळले अश्रू , Video viral

IPL 2025 CSK : एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जा संघ आता आयपीएल मधील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. गेल्या मॅचमध्ये जेव्हा सीएसकेचा पराभव झाला तेव्हा भारतीय अभिनेत्रीला अश्रू अनावर झाले, भर स्टेडियममध्येच ती रडू लागली.

IPL 20205 : धोनीच्या टीमचा पराभव दिसताच अभिनेत्रीच्या डोळ्यात तरळले अश्रू , Video viral
सीएसकेच्या पराभवानंतर अभिनेत्री रडलीImage Credit source: social media
| Updated on: Apr 28, 2025 | 10:39 AM
Share

आयपीएल 2025 चा हा सीझन हा एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वात वाईट ठरल्याचे दिसत आहे, कारण सीएसकेचा संघ पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहे. त्यामुळे आता जरी सीएसकेने सर्व 5 सामने जिंकले तरी त्यांचे फक्त 14 गुण होतील, त्यामुळे अशा परिस्थितीत केवळ एक चमत्कारच त्यांना प्लेऑफमध्ये घेऊन जाऊ शकतो. दरम्यान काल जेव्हा घरच्या मैदानावर (चेपॉक) सीएसकने शेवटचा सामना गमावला, तेव्हा संघाला पाठिंबा देण्यासाठी आलेली भारतीय अभिनेत्री श्रुती हासन ही देखील आपले अश्रू रोखू शकली नाही आणि स्टेडियममध्येच रडू लागली.

चेन्नई सुपर किंग्जचा मागचा सामना सनरायझर्स हैदराबाद सोबत होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना सीएसकेचा संघ 154 धावांवर गारद झाला. त्यांना प्रत्युत्तर देताना हैदराबादने 8 बॉल शिल्लक असताना लक्ष्य गाठले आणि 5 विकेट्सने विजय मिळवला.

श्रुती हसनला कोसळलं रडू

जेव्हा सीएसके सामन्यात मागे पडला, तेव्हाच त्यांचा पराभव निश्चित होत होता. ते पाहून हा सामना पाहण्यासाठी आलेली आणि स्टँडमध्ये बसलेली श्रुती हासन आपले अश्रू रोखू शकली नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, ती रडत होती, तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. श्रुती संघाला पाठिंबा देण्यासाठी चेपॉक स्टेडियमवर आली होती.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर

आता फक्त एक चमत्कारच सीएसकेला प्लेऑफमध्ये घेऊन जाऊ शकतो. एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसके संघाने 9 पैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे चेन्नईचा संघ आता 4 गुणांसह पॉईंट टेबलमध्ये तळाशी आहे. त्यामुळे आता जरी त्यांनी सर्व सामने जिंकले तरी त्यांचे 14 गुण होतील. मात्र यापूर्वी असं घडलंय की संघ 14 गुणांसह पात्र ठरले आहेत परंतु सीएसकेचा नेट रन रेट (-1.302) देखील खूपच खराब आहे. 5 वेळा विजेता ठरलेला सीएसकेचा संघ या हंगामात मात्र वाईट काळातून जात आहे.

पॉइंट्स टेबलबद्दल बोलायचे झाले तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सध्या अव्वल स्थानावर आहे, त्यांनी 10 पैकी 7 सामने जिंकले आहेत. गुजरात टायटन्स 12 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर मुंबई इंडियन्स तिसऱ्या स्थानावर आहे. मुंबईचेही 12 गुण आहेत, त्यांनी 10 पैकी 6 सामने जिंकले आहेत. दिल्ली कॅपिटल्स 9 पैकी 9 सामने जिंकून 12 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.