AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs GT : बाजी पलटवणारे ते 18 चेंडू ठरले मुंबई इंडियन्ससाठी टर्निंग पॉइंट, तिथेच गुजरातने सामना गमावला

IPL 2026 GT vs MI Match Turning Point : इंडियन प्रीमियर लीग 2026 च्या 30 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सवर 99 धावांनी दणदणीत विजय नोंदवला. या विजयामुळे मुंबईचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी पोहोचला. मुंबईतर्फे खेळताना तिलक वर्माने 101 धावांची शानदार खेळी करत शतकही झळकावले.

MI vs GT : बाजी पलटवणारे ते 18 चेंडू ठरले मुंबई इंडियन्ससाठी टर्निंग पॉइंट, तिथेच गुजरातने सामना गमावला
मुंबई इंडियन्सच्या मॅचचा टर्निंग पॉईंटImage Credit source: PTI
| Updated on: Apr 21, 2026 | 2:35 PM
Share

IPL 2026 मध्ये मुंबईने इंडियन्सने पराभवचा दुष्टचक्र अखेर भेदलं आहे. स्पर्धेतील 30 व्या सामन्यात काल मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सवर तब्बल 99 धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयासह पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईचा संघ वर आला आहे. या सामन्यात मुंबईच्या संघाने 199 धावा केल्य, ज्यात 101 धावा करत शतक झळकावणाऱ्या तिलक वर्माचा सिंहाचा वाटा होता. पाच वेळा चॅम्पियन बनलेल्या मुंबई इंडियन्सचा संघ कालच्या विजयामुळे पुन्हा एकदा रूळांवर परतला आहे.

या हंगामातील आपल्या सहाव्या सामन्यात त्यांनी गुजरात टायटन्सचा तब्बल 99 धावांनी पराभव केला. यापूर्वी मुंबईने सलग चार सामने गमावले होते. त्यामुळे कालचा विजय हा त्यांच्यासाठी संजीवनीसारखाच ठरला म्हटला तरी अतिशयोक्ती होणार नाही. एवढंच नव्हे तर, या विजयामुळे पॉईंट्स टेबलमध्ये मुंबईचा संघ 10 व्या स्थानावरून 7 व्या स्थानावर पोहोचला आहे.

मात्र असं असलं तरी कालचा विजय हा मुंबईसाठी सोपा नव्हता. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कर्णधार हार्दिक पांड्या नाणेफेक हरला आणि त्याला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. मुंबईची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली, त्यांनी 50 धावांतच तीन गडी गमावले. फलंदाजीचा वेगही लक्षणीयरीत्या मंदावला होता. डावाच्या 17 व्या षटकापर्यंत मुंबईची धावसंख्या केवळ 141 होती. गुजरातच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबई केवळ 160 किंवा 170 धावाच करू शकेल असे वाटत होते, पण शेवटच्या तीन षटकांत जे घडले त्याने बाजी पलटवली.

18 चेंडूत 58 धावा

गुजरातविरुद्ध मुंबईच्या संघाची संथ फलंदाजी पाहिल्यावर, ते 199 धावांपर्यंत पोहोचतील अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. मात्र, शेवटच्या 18 चेंडूंमध्ये तिलक वर्माने (45 चेंडूंत 101 धावा) 58 धावा जोडून आपल्या संघाची पडती बाजू सावरलली. आणि हाच क्षण मुंबईसाठी सामन्यातील निर्णायक क्षण, अगदी टर्निंग पॉईंट ठरला म्हणा ना.. कारण 200 धावा करण्याचा मानसिक दबाव गुजरातच्या फलंदाजांवर वाढत गेला. त्यानुळे, पटापट, वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात गुजरातची आघाडीची फलंदाजी पूर्णपणे कोसळली.

असा पलटला सामना

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनाही या गोष्टीचा फायदा झाला. विशेषतः अश्विनी कुमारने कहर केला. अश्विनीने मुंबईसाठी 4 षटकांत 24 धावा देऊन 4 बळी टिपले. मिचेल सँटनर आणि अल्लाह गझनफर यांनीही प्रत्येकी 2 बळी घेतले, तर जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांनी नव्या चेंडूने प्रत्येकी 1 बळी घेत गुजरातला गारद केलं. अशाप्रकारे, शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरताचा संघ 15.5 षटकांत अवघ्या 100 धावांवर ऑलआऊट झाला आणि मुंबईलने 99 धावांनी दणदणीत विजय मिळवला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...