IPL 2021 : आयपीएलमधील सर्वोत्तम 6 इनिंग्स कोणत्या? ज्यामध्ये झाली चौकार-षटकारांची लयलूट!

आयपीएलमधील अशाच 6 सर्वोत्तम खेळी बघणार आहोत, ज्यात एका इनिंगमध्ये सर्वाधिक रन्स पाहायला मिळाले...! (IPL Best 6 Innings highest Runs in One inning)

IPL 2021 : आयपीएलमधील सर्वोत्तम 6 इनिंग्स कोणत्या? ज्यामध्ये झाली चौकार-षटकारांची लयलूट!
आयपीएलमधील सर्वोत्तम 6 इनिंग्ज

मुंबईआयपीएलचा (IPL 2021) रणसंग्राम सुरु होण्यास अगदी काही दिवस शिल्लक राहिलेत. 9 एप्रिलला आयपीएलच्या 14 व्या मोसमातील पहिला सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royals Challengers Banglore) यांच्यात होणार आहे. आयपीएलची स्पर्धा तशी धावांची लयलूट करणारी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेत अनेक बॅट्समन उत्तुंग रेकॉर्डस बनवत असतात. तसेच दुसरे बॅट्समन त्यांचा रेकॉर्ड मोडून नवीन रेकॉर्ड्स प्रस्थापित करत असतात. आपण आयपीएलमधील अशाच 6 सर्वोत्तम खेळी बघणार आहोत, ज्यात एका इनिंगमध्ये सर्वाधिक रन्स पाहायला मिळाले…! (IPL Best 6 Innings highest Runs in One inning)

ख्रिस गेल (175*)

वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅट्समन, युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलने 2013 च्या आयपीएल मोसमात आरसीबीकडून खेळताना पुणे वॉरियर्सच्या गोलंदाजांना फोडून काढलं होतं. त्याने पुण्याविरुद्ध नाबाद 175 धावांची खेळी केली होती. आतापर्यंतचा एका इनिंगमधला आयपीएलमधील हा सर्वाधिक स्कोअर आहे. 175 धावांच्या खेळीत गेलने 17 षटकार मारले होते. तसंच या इनिंग्जमुळे टी ट्वेन्टीमध्ये सर्वाधिक 17 षटकारांचा विक्रम देखील त्याच्या नावावर आहे. अजूनपर्यंत तरी तो विक्रम कुणीही तोडू शकलं नाहीय.

ब्रँडन मॅक्युलम (158*)

न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रँडन मॅक्युलमची आक्रमक फलंदाज म्हणून ओळख राहिली. त्याने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत नेहमी आक्रमक खेळ केला. आयपीएलच्या पहिल्याच मोसमात पहिल्याच मॅचमध्ये त्याने कोलकात्याकडून खेळताना आरसीबीच्या बोलर्सला सळो की पळो करुन सोडलं होतं. त्याने नाबाद 158 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 13 षटकार मारले होते.

एबी डिव्हिलियर्स (133*)

आयपीएलमधील तिसरी सर्वोच्च धावांची खेळी दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक बॅट्समन तसंच आरसीबीचा हुकमाचा एक्का एबी डिव्हिलियर्सच्या नावावर आहे. आयपीएलच्या 2015 च्या मोसमात त्याने मुंबई इंडियन्सच्याविरुद्ध नाबाद 133 धावांची खेळी केली होती. त्याने या खेळीत 19 चौकार आणि 4 षटकार लगावले होते.

के एल राहुल (132*)

किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार के.एल. राहुलने आयपीएलच्या पाठीमागच्या मोसमात आरसीबीच्या गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली होती. त्याने केवळ 63 बॉलमध्ये नाबाद 132 धावांची खेळी केली होती. या खेळीत त्याने 7 उत्तुंग षटकार लगावले होते.

ए बी डिव्हिलियर्स (129*)

आयपीएलमधल्या एका इनिंगमध्ये सर्वोच्च धावांमध्ये एबी डिव्हिलियर्सचा बोलबाला राहिला आहे. 133 धावांची नाबाद खेळी केल्यानंतर पुन्हा एकदा त्याने 129 धावांची नाबाद खेळी केली. आयपीएलच्या 2016 च्या मोसमात त्याने गुजरात लायन्सविरुद्ध नाबाद 129 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 12 गगनचुंबी षटकार लगावले.

रिषभ पंत (128*)

सध्याचा आघाडीचा फलंदाज आणि प्रत्येकाच्या तोंडी असलेलं नाव म्हणजे रिषभ पंतने. त्याने आपल्या बॅटची जादू अनेकवेळा दाखवून दिलीय. 2018 च्या मोसमात त्याने हैदराबादविरुद्ध नाबाद 128 रन्सची खेळी खेळली. या खेळीला त्याने 15 चौकार आणि 7 षटकारांचा साज चढवला.

(IPL Best 6 Innings highest Runs in One inning)

हे ही वाचा :

चिडक्या क्विंटन डी कॉकला आयसीसीने दाखवला इंगा, आता ‘असं’ काही करण्याअगोदर तो लक्षात ठेवेन…!

IPL 2021 : IPL सामने मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार की नाही?, BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीचा मोठा खुलासा

IPL मध्ये सर्वाधिक विकेट्स, तरीही 4 वर्षापासून संघात जागा नाही, अमित मिश्रा भडकला, म्हणतो, ‘मी काय करावं…?’

Published On - 1:27 pm, Mon, 5 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI