IPL vs PSL | IPL विजेत्याला 20 कोटी, पाकिस्तानातील PSL जिंकणाऱ्या संघाला किती रकमेचं बक्षीस?

पीएसलच्या पाचव्या मोसमातील अंतिम सामन्यात कराचीने लाहोरवर 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:00 PM, 18 Nov 2020
ipl vs psl there is a big difference between winning amount of indian premier league and pakistan super league

कराची : पाकिस्तान सुपर लीग 2020 (PSL 2020) चा अंतिम सामना मंगळवारी 17 नोव्हेंबरला खेळण्यात आला. हा सामना कराची किंगस (Karachi Kings) विरुद्ध लाहोर कलंदर्स (Lahore Kalandars) यांच्यात खेळला गेला. या अंतिम सामन्यात कराचीने लाहोरवर 5 विकेट्सने शानदार विजय मिळवत विजेतेपद पटकावलं. तसेच पीसीएल स्पर्धेच्या अंतिम सामन्याच्या  काही दिवसांआधी म्हणजेच 11 नोव्हेंबरला आयपीएलच्या 13 व्या मोसमातील (IPL 2020) अंतिम सामना खेळण्यात आला. या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सवर (Delhi Capitals) मात करत विजेतेपद पटकावलं. विजेतेपद पटकावल्यानंतर विजेता, उपविजेता संघ तसेच चमकदार कामगिरी केलेले खेळाडू मालामाल होतात. आयपीएल आणि पीएसलमध्ये विजयी होणाऱ्या संघाला नक्की किती रक्कम बक्षिस देण्यात येते, तसेच या दोन्ही स्पर्धेतील विजयी रक्कमेत किती कोटींचे अंतर असते, हे आपण जाणून घेणार आहोत. ipl vs psl there is a big difference between winning amount of indian premier league and pakistan super league

मुंबई आणि कराचीला मिळालेल्या विजयी रक्कमेमध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे. पीएसल स्पर्धेच्या 5 व्या पर्वात कराचीने विजेतेपदावर नाव कोरलं. कराचीला 3 कोटी 50 लाख रुपये बक्षिस स्वरुपात देण्यात आले. तर उपविजेत्या ठरलेल्या लोहरला 1 कोटी 43 लाख रुपयांची रक्कम बक्षिस म्हणून मिळाली. मुंबई आयपीएलच्या 13 व्या मोसमाची चॅम्पियन टीम ठरली. मुंबईला 20 कोटींची रक्कम मिळाली. तर रनरअप ठरलेल्या दिल्ली संघाला 12 कोटी 50 लाख रुपये बक्षिस म्हणून मिळाले.

आयपीएलमध्ये प्ले ऑफमधील तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरच्या संघांनाही बक्षिस स्वरुपात ठराविक रक्कम देण्यात येते. मात्र पीएसल स्पर्धेत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघासाठी बक्षिस रक्कमेची तरतूद नाही. यंदाच्या मोसमात आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर होते. या संघांना अंतिम सामन्यानंतर प्रत्येकी 8 कोटी 75 लाख रुपयांची रक्कम बक्षिस म्हणून देण्यात आली.

वैयक्तिक बक्षिस समसमान

पीएलसमध्ये जरी तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघाला बक्षिस रुपात रक्कम दिली जात नाही. असे असले तरी, वैयक्तिक पातळीवर दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला आयपीएलप्रमाणे बक्षिस दिलं जातं. सर्वोत्कृष्ट बॅट्समन, बोलर आणि फिल्डर 10 लाख देण्यात येतात.

या खेळाडूंचा यंदाच्या आयपीएलमध्ये जलवा

1. इमर्जिंग प्लेअर ऑफ द इयर (प्रभावशाली युवा खेळाडू) : देवदत्त पडिक्कल (RCB) : 10 लाख रुपये बक्षीस
2. गेमचेंजर ऑफ द इयर : के. एल. राहुल (KXIP) :10 लाख रुपये बक्षीस
3. सुपर स्ट्रायकर ऑफ द इयर : कायरन पोलार्ड (MI) : 10 लाख रुपये बक्षीस
4. मोस्ट सिक्सेस ऑफ द सिजन : ईशान किशन (MI) : 10 लाख रुपये बक्षीस
5. पॉवर प्लेअर अवॉर्ड : ट्रेन्ट बोल्ट (MI) : 10 लाख रुपये बक्षीस
6. पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट मिळवणारा गोलंदाज) : कगिसो रबाडा : 10 लाख रुपये बक्षीस
7. ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा करणारा फलंदाज) : के. एल. राहुल : 10 लाख रुपये बक्षीस
8. मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेअर : जोफ्रा आर्चर (RR) : 10 लाख रुपये बक्षीस
9. फेअर प्ले अवॉर्ड : मुंबई इंडियन्स

संबंधित बातम्या :

IPL 2020: विजेत्या मुंबई इंडियन्ससह टॉप 4 संघ मालामाल

ipl vs psl there is a big difference between winning amount of indian premier league and pakistan super league