AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PBKS vs RCB : पंजाब हरल्यानंतर जॉश इंग्लिसच्या बायकोने विराट कोहलीला शिवी घातली का?

PBKS vs RCB : मुल्लांपुरमध्ये पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये आयपीएल 2025 चा पहिला क्वालिफायर सामना झाला. ही मॅच पूर्णपणे एकतर्फी ठरली. या सामन्यात बंगळुरुच्या घातक गोलंदाजीसमोर पंजाबच्या फलंदाजांनी गुडघे टेकले.

PBKS vs RCB : पंजाब हरल्यानंतर जॉश इंग्लिसच्या बायकोने विराट कोहलीला शिवी घातली का?
virat kohli records for rcb
| Updated on: May 30, 2025 | 9:08 AM
Share

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मागच्या आठ सीजनपासूनच्या अपयशावर अखेर IPL 2025 मध्ये ब्रेक लावला. नवीन कर्णधार रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली बंगळुरुने आयपीएलच्या 18 व्या सीजनच्या फायनलमध्ये प्रवेश केला. बंगळुरुने टुर्नामेंटच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये पंजाब किंग्सचा दारुण पराभव केला. पंजाबच प्रदर्शन इतकं खराब होतं की, टीमचा स्टार खेळाडू जॉश इंग्लिसची पत्नी आपल्या रागावर नियंत्रण ठेऊ शकली नाही. ती शिव्या देताना दिसली. तिने ही शिवी विराट कोहलीला दिल्याचा दावा केला जातोय.

पंजाबच्या मुल्लांपुरमध्ये गुरुवारी 29 मे रोजी आयपीएल 2025 ची पहिली क्वालिफायर मॅच झाली. यात पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या नंबरवर असलेस्या आरसीबी आणि पंजाब किंग्समध्ये सामना झाला. संपूर्ण सामन्यात प्रत्येक स्तरावर बंगळुरुची टीम पंजाबवर भारी पडली. बंगळुरुच्या गोलंदाजांनी पंजाबच्या फलंदाजांना त्यांच्या होम ग्राऊंडवर गुडघे टेकायला भाग पाडलं.

ती रागात इंग्रजीमध्ये शिव्या देत होती

या सामन्यात नेहमीप्रमाणे टीमचा स्टार खेळाडू विराट कोहली आक्रमक अंदाजात दिसला. प्रत्येक विकेटच कोहलीकडून जोरदार सेलिब्रेशन सुरु होतं. इनिंगच्या तिसऱ्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारने प्रियरंजन सिंहला बाद केलं, त्यावेळी कोहली स्लिपमध्ये फुल जोशमध्ये सेलिब्रेट करताना दिसला. त्याचवेळी टीव्ही स्क्रिनवर जॉश इंग्लिसची पत्नी दिसली. ती पंजाबची जर्सी परिधान करुन पतीच्या टीमला सपोर्ट करत होती. योगायोगाने सेलिब्रेशन नंतर लगेच कॅमेरा तिच्या चेहऱ्यावर गेला. त्यावेळी ती रागात इंग्रजीमध्ये शिव्या देत होती.

म्हणून असे अपशब्द निघाले असतील

इंग्लिसच्या बायकोचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेक युजर्सचा दावा आहे की, हे अपशब्द ती कोहलीबद्दल बोलत होती, जो आक्रमक अंदाजात विकेटच सेलिब्रेशन करत होता. पण, खरच तिने कोहलीला शिवी दिली का?. व्हिडिओ पाहून असं वाटू शकतं की, ती कोहलीला शिवी देत होती. पण तिने कोहलीबद्दलच असं म्हटलं, असं ठामपणे म्हणू शकत नाही. टीमची खराब फलंदाजी पाहून निराश होऊन तिच्या तोंडातून स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणून असे अपशब्द निघाले असतील.

2016 नंतर पहिल्यांदा आयपीएल फायनलमध्ये

पंजाब किंग्सने होमग्राऊंडवर झालेल्या या सामन्यात पहिली फलंदाजी केली. बंगळुरुच्या भेदक गोलंदाजीसमोर पंजाब किंग्सने गुडघे टेकले. पंजाबची टीम 15 ओव्हर सुद्धा फलंदाजी करु शकली नाही. 14.1 ओव्हरमध्ये 101 रन्सवर ऑलआऊट झाले. प्रत्युत्तरात बंगळुरुच्या टीमने 2 विकेट गमावून 60 चेंडूत विजयी लक्ष्य गाठलं. बंगळुरुची टीम 2016 नंतर पहिल्यांदा आयपीएल फायनलमध्ये पोहोचली आहे.

अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.