IND vs NZ : इशान किशनच्या बाबतीत सूर्यकुमार यादव इतकं ढळढळीत खोटं बोलला का? सर्वांसमोर पोल-खोल
IND vs NZ 4th T20I : भारताचा काल न्यूझीलंड विरुद्ध चौथ्या टी 20 सामन्यात पराभव झालाच. पण सूर्यकुमार यादव खोट बोलला अशी चर्चा सुरु झालीय. भारताने पाच सामन्यांच्या टी 20 मालिकेत आधीच 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

India vs New Zealand 4th T20I : भारत आणि न्यूझीलंडमध्ये वायजॅग येथे चौथा T20 सामना झाला. या मॅचसाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये इशान किशनचा समावेश केला नव्हता. त्याच्याजागी अर्शदीप सिंहला खेळवण्यात आलं. प्लेइंग इलेव्हनमध्ये इशान किशनचा समावेश का केला नाही? त्यावर सूर्यकुमार यादवने त्याला दुखापत झाल्याचं सांगितलं. भारतीय कर्णधाराने हे जे सांगितलं ते खोटं वाटलं. कारण मॅच दरम्यान इशान किशनवर मैदानावर पळताना, टीममेट्सना पाणी पाजताना दिसला.
गुवहाटी येथे तिसऱ्या टी 20 सामन्यादरम्यान फिल्डिंग करताना इशान किशनला दुखापत झाली. त्यामुळे त्याचा चौथ्या सामन्यात टीममध्ये समावेश केला नाही असं सूर्यकुमार यादव टॉस दरम्यान बोलला. ज्या मॅचमध्ये इशानला दुखापतीमुळे खेळवलं नाही असं सांगितलं, त्याच, सामन्यादरम्यान तो मैदानावर पळताना दिसला. इशान मैदानावर फलंदाजी करणाऱ्या आपल्या सहकाऱ्याला ड्रिंक देण्यासाठी पळत आला. इंजरी असतानाही इशान मैदानावर पळत आला आणि सहकाऱ्याला पाणी पाजल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय.
तो खोटं का बोलला?
इशान किशनच्या या व्हिडिओनंतर, सूर्यकुमार यादव जे बोलला ते काय होतं? तो खोटं का बोलला? असे प्रश्न निर्माण होतायत. इशान किशनला खरच कुठली दुखापत झालीय की नाही? असा प्रश्न फॅन्सच्या मनात निर्माण झालाय.
कॉमेंट्री करताना आकाश चोपडा काय म्हणाले?
आकाश चोपडाला LIVE मॅच दरम्यान कॉमेंट्री सुरु असताना इशान किशन इंजरी असूनही पळताना दिसला. त्यावर ते सुद्धा स्वत:ला कमेंट करण्यापासून रोखू शकले नाहीत. इशान ज्या पद्धतीने मैदानावर पळतोय, ते पाहून असं वाटत नाही की, त्याला इंजरी झालीय असं आकाश चोपडा म्हणाले. पुढच्या मॅचमध्ये तो खेळताना दिसेल अशी अपेक्षा चोपडा यांनी व्यक्त केली. पाच सामन्यांच्या टी 20 सीरीजमध्ये सलग तीन सामने जिंकणाऱ्या टीम इंडियाचा चौथ्या मॅचमध्ये पराभव झाला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 215 धावा केल्या. भारताचा डाव 165 धावांवर आटोपला. न्यूझीलंडने 50 धावांनी मोठा विजय मिळवला.
