World Test Championship : इंग्लंड दौऱ्याआधी कपील देव यांचा विराट कोहलीला महत्त्वपूर्ण सल्ला

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) अंतिम सामन्याला 18 जूनपासून साऊथहॅम्प्टन येथे सुरुवात होणार आहे. भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) या दोन तुल्यबळ संघात हा सामना होणार आहे. (Kapil Dev Advide Virat kohli Before India Tour of England) 

World Test Championship :  इंग्लंड दौऱ्याआधी कपील देव यांचा विराट कोहलीला महत्त्वपूर्ण सल्ला
विराट कोहली आणि कपील देव
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 2:51 PM

मुंबई : भारताचा इंग्लंड दौरा येत्या काहीच दिवसांत सुरु होतोय. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC Final) अंतिम सामन्याला 18 जूनपासून साऊथहॅम्प्टन येथे सुरुवात होणार आहे. भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) या आयसीसीच्या (ICC) कसोटी क्रमवारीतील पहिल्या दोन संघात हा सामना होणार आहे. इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी भारतीय संघाचे माजी कर्णधार दिग्गज खेळाडू कपील देव (Kapil dev) यांनी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. इंग्लंड दौऱ्यात विराटने आक्रमतेवर नियंत्रण ठेवण्याचा महत्त्वपूर्ण सल्ला कपील देव यांनी दिला आहे. (Kapil Dev Advide Virat kohli Before India Tour of England)

काय म्हणाले कपील देव?

पाठीमागच्या जवळपास दीड वर्षांपासून विराटच्या बॅटमधून शतक आलेलं नाहीय. इंग्लंड दौऱ्यात त्याच्या बॅटमधून रन्स निघतील अशी अपेक्षा आहे. परंतु अशी कामगिरी करताना त्याला अति आक्रमकतेपासून दूर रहावं लागेल. तो आक्रमकता दाखवतो, तो त्याचा स्वभाव आहे. परंतु मला भीती आहे की त्याने जास्त आक्रमकता दाखवू नये. प्रत्येक सेशन पार पडल्यानंतर त्याने आपल्या आक्रमकतेविषयी स्वत:लाच विचारायला हवं. जास्त आक्रमकता दाखवण्याऐवजी त्याने विरोधी टीमला वर पूर्ण नियंत्रण कसं मिळवता येईल, हे पाहावं, असं कपील देव म्हणाले.

त्याला रन्स करावेच लागतील. परंतु अति आक्रमकता थोडीशी बाजूला ठेवावी लागेल. काही गोष्टी लगेच मिळतील अशी परिस्थितीत इंग्लंडच्या वातावरणात नाहीय. तिथे बॉलच्या टप्प्यावर, स्विंगवर नजर ठेवावी लागेल. आपण जर सीम आणि स्विंग खूप चांगला खेळलात तर बॅटमधून धावा काढायला आपल्याला कुणीही रोखू शकत नाही, असं कपील देव म्हणाले.

भारताचा इंग्लंड दौरा

भारतीय संघ 2 जून रोजी इंग्लंडला रवाना होईल. कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सध्या मुंबईत क्वारंन्टाईन आहे. 14 दिवसांपासून क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर 24 सदस्यीय भारतीय संघ 2 तारखेला इंग्लंडसाठी प्रयान करेल. न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (WTC 2021) अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिका भारताला इंग्लंड दौऱ्यात खेळायची आहे. त्याअगोदर मुंबईत भारतीय संघाचा जोरदार सराव सुरु आहे.

किवीविरुद्ध भारताचं मिशन 72 तास

क्रिकेटच्या सामन्यांची रणनीती ही शक्यतो मैदानावर सराव करताना आखली जाते. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठीची तयारी टीम इंडिया (Inidan Cricket Team) बंद खोलीत करणार आहे. यासाठी संघाने एक ‘सिक्रेट प्लॅन’ तयार केला आहे. त्या प्लॅननुसार संपूर्ण टीम 72 तास बंद खोलीत राहून न्यूझीलंडच्या खेळाडूंची सर्व रणनीती लक्षपूर्वक जाणून घेणार आहे. प्रत्येक खेळाडूची खेळण्याची पद्धत महत्त्वाचे शॉट या साऱ्याचा अभ्यास यावेळी करण्यात येईल.

(Kapil Dev Advide Virat kohli Before India Tour of England)

हे ही वाचा :

World Test Championship : ‘मॅन ऑफ दी टूर्नामेंट’चा दावेदार कोण? अश्विनसह या दोन खेळाडूंमध्ये चुरस

WTC फायनल मॅच ड्रॉ झाली किंवा टाय झाली तर काय होणार ICC ची महत्त्वपूर्ण घोषणा

World Test Championship: न्यूझीलंडविरुद्ध द्रविडची बॅट आग ओकायची, राहुलचे शिष्य किवींना आस्मान दाखवणार?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.