AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tokyo Olympic | ऑलिम्पिकमध्ये यशस्वी व्हा, महाराष्ट्राच्या खेळाडूंना राज्य सरकारचं पाठबळ

टोकियो ऑलिम्पिक 2021मध्ये सहभागी महाराष्ट्रातील खेळाडूंना प्रोत्साहन रक्कम देण्यात आली. ( Maharashtra Players Tokyo Olympic )

Tokyo Olympic | ऑलिम्पिकमध्ये यशस्वी व्हा, महाराष्ट्राच्या खेळाडूंना राज्य सरकारचं पाठबळ
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते खेळाडूंना प्रोत्साहन रक्कम प्रदान
| Updated on: Dec 28, 2020 | 5:28 PM
Share

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देणारा आणखी एक निर्णय घेण्यात आलाय. टोकियो ऑलिम्पिक 2021मध्ये सहभागी होणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंना पूर्व तयारीसाठी प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी 50 लाख रुपये अशी 2.50 कोटी रक्कम आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते देण्यात आली. (Maharashtra Govt gave fund five players to preparation Tokyo Olympic 2021)

मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा येथील समिती कक्षात झालेल्या कार्यक्रमात स्वरूप उन्हाळकर ( शूटिंग पॅराऑलिम्पिक), राही सरनोबत ( शूटिंग), तेजस्विनी सावंत ( शूटिंग), प्रवीण जाधव ( आर्चरी रिकर्व्हर सांघिक), अविनाश साबळे ( एथलेटिक्स) या 5 खेळाडूंना हे सहाय्य देण्यात आले. या खेळाडूंना ऑलिम्पिकसाठी कोटा मिळाला आहे.

क्रीडा विभागाच्या मिशन ऑलिम्पिकअंतर्गत योजनेंतर्गत 50 लाख प्रत्येकी ही रक्कम प्रोस्ताहन म्हणून देण्यात आली. निधी वाटपाच्या कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा राज्य मंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार , मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, शालेय शिक्षण व क्रीडा अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया उपस्थित होते.

अर्थसहाय्य मिळालेले खेळाडू

राही सरनोबत (Rahi Sarnobat)

नेमबाजीमध्ये नावलौकिक मिळवलेली राही सरनोबत मूळची कोल्हापूर जिल्ह्यातील आहे. जर्मनीमध्ये झालेल्या नेमबाजी स्पर्धेत विजय मिळवून तिनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये एन्ट्री मिळवली होती. राहीने आशियाई क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रकूल स्पर्धांमध्ये पदक मिळवले आहे. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक मिळवण्याचा निर्धार राही सरनोबत हिनं केला आहे.

तेजस्विनी सावंत (Tejaswini Sawant)

नेमबाजीमधून भारताचं प्रतिनिधीत्व करणारी तेजस्विनी सावंत ही कोल्हापूरचीच आहे. तिने आतापर्यंत नेमबाजीचा विश्वकप आणि राष्ट्रकूल स्पर्धांमध्ये विजय मिळवला आहे.

स्वरूप उन्हाळकर (Swarup Unhalkar)

स्वरुप उन्हाळकर दिव्यांग असून तो टोकियोमध्ये होणाऱ्या पॅराऑलिम्पिकमध्ये सहभागी होईल. तो नेमबाजीमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करेल. त्याला शिवछत्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेलं आहे.

प्रवीण जाधव (Pravin Jadhav)

भारताच्या आर्चरी संघातून प्रवीण जाधव ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. 2019 मध्ये झालेल्या स्पर्धेत प्रवीण आणि त्याच्या सहकाऱ्यांनी रौप्यपदक मिळवत टोकियो ऑलिम्पिकमधील प्रवेश निश्चित केला आहे.

अविनाश साबळे (Avinash Sable)

बीड जिल्ह्यातील अविनाश साबळे टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. दोहा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अ‌ॅथलेटिक्स स्पर्धेत 3000 मीटर स्टीपलचेसमध्ये विजेतेपद मिळवत अविनाशनं आलिम्पिकचं तिकीट मिळवलं आहे.

संबंधित बातम्या:

महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा, पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रात

Milind Narvekar | MPLच्या गव्हर्निग काउन्सिलच्या चेअरमन पदी मिलिंद नार्वेकर आणि सुरेश सामंतांची बिनविरोध निवड

(Maharashtra Govt gave fund five players to preparation Tokyo Olympic 2021)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.