रशियाला दणका, हा देश करणार आता थेट हवाई रक्षण, रशियन ड्रोनच्या घुसखोरीनंतर मोठा निर्णय..
रशिया आणि युक्रेन युद्ध पेटताना दिसत आहे. त्यामध्येच रशियाने पोलंडच्या हवाई हद्दीचा वापर गेल्याने वाद अधिक वाढलाय. दुसरीकडे अमेरिका ही रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांच्या विरोधात भूमिका घेताना दिसत आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सध्या चांगलेच पेटल्याचे दिसत आहे. त्यामध्येच रशियाच्या काही ड्रोनने पोलंडच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्याने एकच खळबळ उडाली. हेच नाही तर पोलंड म्हणावा तसा या घुसखोरी केलेल्या ड्रोनला प्रतिउत्तर देऊ शकला नाही. यानंतर नाटो देशांमध्ये तातडीची बैठक पार पडली. रशियाने पोलंडच्या हवाई क्षेत्राचे गंभीर उल्लंघन केले. पोलंडच्या हवाई क्षेत्राचे रक्षण करण्यासाठी डेन्मार्क, जर्मनी यासोबतच फ्रान्सही पुढे आल्याचे बघायला मिळाले. आता ब्रिटनही पोलंडला मदत करण्यासाठी समोर आलाय. रशियन ड्रोनच्या विरोधात ब्रिटन मैदानात उतरला आहे. पोलंडच्या हवाई हद्दीच्या संरक्षणाचा विडा ब्रिटिशने उचलला असून ते पोलंडच्या हवाई हद्दीचे संरक्षण करणार आहेत.
ब्रिटिश रॉयल एअर फोर्सचे लढाऊ विमान पोलंडच्या हवाई हद्दीचे रक्षण करतील, असे ब्रिटिश संरक्षण मंत्री जॉन हीली यांनी स्पष्ट केले. टायफून लढाऊ विमाने लिंकनशायरमधील आरएएफ कोनिंग्सबी येथून उड्डाण करतील. रशियाने नाटो सदस्य देशाच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी करून मोठी चूक केल्यााचे हेली यांनी म्हटले. नाटो आता पोलंडचे रक्षण करून रशियाला एकत्रितपणे प्रत्युत्तर दिले जाईल, असेही त्यांनी म्हटले.
पोलंडच्या हवाई हद्दीत रशियन ड्रोन गेल्याने खळबळ उडाली. पोलंडने याचा निषेध करत जोरदार टीका केली. पोलंडने असाही दावा केला की, आम्ही रशियन ड्रोन पाडले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर भाष्य केले आणि ही रशियाची एक चूक असू शकते असे त्यांनी म्हटले. मात्र, पोलंडने जाहीरपणे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाचा निषेध केला आणि तुम्ही याला चूक कशी म्हणतात? असे त्यांनी म्हटले.
युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध टोकाला गेलंय. हेच नाही तर रशियाने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतरही मोठा हल्ला हा युक्रेनवर केला. रशियावर अमेरिका थेट कारवाई करत नसून त्यांच्याकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर निर्बंध लादत आहे. त्यामध्येच आता रशियाने पोलंडची हवाई हद्द वापरून मोठा वाद ओडून घेतल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे.
