इंग्लंडच्या बॅटिंगवर मायकल वॉन निराश, म्हणाले, ‘चांगल्या पीचवरही खेळू शकले नाही!’

इंग्लंडच्या फलंदाजांनी खराब फलंदाजी केली आहे, हे मायकल वॉनने मान्य केलं आहे. | michael vaughan

इंग्लंडच्या बॅटिंगवर मायकल वॉन निराश, म्हणाले, 'चांगल्या पीचवरही खेळू शकले नाही!'
india Vs England Michael Vaughan Predicts India Win one day series
Follow us
| Updated on: Mar 04, 2021 | 5:14 PM

मुंबईभारताविरुद्ध इंग्लंडचा संघ (India Vs England) चेन्नई आणि अहमदाबादमध्ये पराभूत झाल्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने (michael vaughan) खेळपट्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने पराभवानंतर फलंदाजांच्या तंत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित न करता खेळपट्टीला दुषणं दिली होती. दुसर्‍या आणि तिसर्‍या कसोटी सामन्यात इंग्लंडचा टॉप ऑर्डर अपयशी ठरला तसंच आता चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावातही अयशस्वी ठरला. यानंतर आता मायकेल वॉनला आता उपरती झाली आहे. इंग्लंडच्या फलंदाजांनी खराब फलंदाजी केली आहे, हे त्याने मान्य केलं आहे. (michael vaughan Disapppinted England batting 4th test Against India)

मायकेल वॉनने ट्विट केले की, “इंग्लंडने शेवटच्या काही कसोटी सामन्यांमध्ये वाईट फलंदाजी केली. पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारण्यासाठी ही खेळपट्टी योग्य आहे. अजिबातच स्पिन गोलंदाजीने त्रास दिला नाही. चेंडू चांगल्या पद्धतीने बॅठवर येतो आहे. मात्र फलंदाजांचं तंत्र चुकतं आहे, असं त्याने म्हटलंय.

त्याचवेळी इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसन म्हणाला की अहमदाबादची खेळपट्टी सपाट दिसत आहे, लॉरीस, अ‍ॅली पोप आणि बेन फॉक्स इंग्लंडला 275 च्या स्कोअरवर आणू शकतात. मात्र आता, पीटरसनचा अंदाज चुकीचा असल्याचे सिद्ध झालंय.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंड कठीण परिस्थितीत आहे. इंग्लंडचे फलंदाज बॅटिंगला अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर संघर्ष करताना दिसले. केवळ बेन स्टोक्सनेच इंग्लंडच्या वतीने चांगली खेळी केली. त्याने 55 धावा केल्या.

स्टोक्स व्यतिरिक्त जॉनी बेअरस्टो आणि अ‍ॅली पोप यांनाही सुरुवात मिळाली, पण ते ते मोठ्या खेळीत रूपांतर करण्यात अपयशी ठरले. एक वेळ इंग्लंडची तीन विकेट 30 धावा अशी अवस्था झाली होती यानंतर बेअरस्टो आणि स्टोक्स यांच्यात 48 धावांची भागीदारी झाली. शेवटी लॉरिन्सने चांगले शॉट्स खेळले. त्याने 46 धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे इंग्लंड 200 चा टप्पा ओलांडू शकला.

(michael vaughan Disapppinted England batting 4th test Against India)

हे ही वाचा :

VIDEO : मोहम्मद सिराजशी नडणाऱ्या बेन स्टोक्सला विराट भिडला, अंपायर्सची मध्यस्थी, भर मैदानात बाचाबाची

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.