तिहेरी तलाकपेक्षाही वाईट वागणूक, केकेआरने एका मेसेजवर दिग्गजाला हाकललं

मुंबई : आयपीएल 2018 मधील सर्वात महागडा दुसरा खेळाडू आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार मिचेल स्टार्कला त्याची फ्रँचायझी कंपनी कोलकाता नाईट रायडर्सने रिलीज केलं आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, केकेआरने एक मेसेज पाठवून स्टार्कला रिलीज करत असल्याची माहिती दिली. स्टार्कने स्वतः ही गोष्ट पत्रकारांशी बोलताना सांगितली. स्टार्कने पत्रकारांशी बोलताना सांगितलं, की केकेआरने एक मेसेज पाठवून रिलीज करत असल्याचं सांगितलं. …

तिहेरी तलाकपेक्षाही वाईट वागणूक, केकेआरने एका मेसेजवर दिग्गजाला हाकललं

मुंबई : आयपीएल 2018 मधील सर्वात महागडा दुसरा खेळाडू आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार मिचेल स्टार्कला त्याची फ्रँचायझी कंपनी कोलकाता नाईट रायडर्सने रिलीज केलं आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, केकेआरने एक मेसेज पाठवून स्टार्कला रिलीज करत असल्याची माहिती दिली. स्टार्कने स्वतः ही गोष्ट पत्रकारांशी बोलताना सांगितली.

स्टार्कने पत्रकारांशी बोलताना सांगितलं, की केकेआरने एक मेसेज पाठवून रिलीज करत असल्याचं सांगितलं. कोलकाताने मागच्या आयपीएलमध्ये स्टार्कवर 9.40 कोटी रुपयांची बोली लावून खरेदी केलं होतं. मात्र दुखापतीमुळे त्याला संपूर्ण मालिकेत खेळता आलं नाही. यापूर्वीही 2016 आणि 2017 मध्ये दुखापतीमुळे त्याला खेळता आलं नव्हतं.

कोलकात्यात समावेश होण्याअगोदर स्टार्क विराट कोहलीच्या नेतृत्त्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळत होता.

दोन वर्षांपूर्वीच कोलकाता संघाच्या मालकाकडून एक मेसेज आला. मला कोलकाता फ्रँचायझींनी रिलीज केलं आहे. सध्या तरी मी घरी आहे. माझी दुखापत जास्त दिवस राहणार नाही. शरीराला मजबूत करणे आणि लवकर फीट होण्याची ही चांगली संधी आहे, असं स्टार्क म्हणाला.

पुढच्या वर्षी होणाऱ्या आयपीएलमध्ये खेळू न शकल्यास इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी नव्या दमाने मला तयार राहता येईल. सध्या मी ऑस्ट्रेलियासाठी जास्तीत जास्त वन डे आणि कसोटी सामन्या खेळण्याचा प्रयत्न करत आहे, असंही स्टार्कने सांगितलं.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *