माझं करिअर संपवतोय, मितालीचा आरोप; ‘हिचे नखरेच जास्त’, पोवारचं उत्तर, नेमका वाद काय?, वाचा…

भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज सोबतच्या वादानंतर रमेश पोवार यांना प्रशिक्षकवदावरुन दूर करण्यात आलं होतं. (Mithali Raj And Ramesh Powar Dispuite indian Women Cricket)

माझं करिअर संपवतोय, मितालीचा आरोप; 'हिचे नखरेच जास्त', पोवारचं उत्तर, नेमका वाद काय?, वाचा...
मिताली राज आणि रमेश पोवार यांच्यात 2018 साली वर्ल्ड कप दरम्यान वाद झाला होता...
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 7:17 AM

मुंबईभारतीय महिला क्रिकेट टीमला (Indian Womens Cricket team) नवा प्रशिक्षक मिळाला आहे. टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू रमेश पोवार (Ramesh Powar) यांची महिला क्रिकेट टीमच्या प्रशिक्षपदी निवड करण्यात आली आहे. रमेश पोवार दुसऱ्यांदा कोच बनले आहेत. 2018 साली ते भारतीय महिला संघाचे कोच होते. परंतु भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज सोबतच्या वादानंतर त्यांना प्रशिक्षकवदावरुन दूर करण्यात आलं होतं. (Mithali Raj And Ramesh Powar Dispuite indian Women Cricket)

मिताली राज- रमेश पोवार यांच्यातला नेमका वाद काय?

रंमेश पोवार यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय महिला संघाने 2018 च्या टी -20 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. मितालीने पोवार यांच्यावर इंग्लंड विरुद्ध हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वात टी -20 वर्ल्ड कप उपांत्य फेरीतून बाहेर काढल्याचा आरोप केला होता. मितालीने बीसीसीआयला तसं पत्र लिहिले होते आणि पोवार यांनी माझी कारकीर्द संपवण्यासाठी आणि माझा अपमान करण्यासाठी असे केल्याचा आरोप केला होता. “मिताली खूपच नखरे दाखवते आणि संघात विनाकारण वाद निर्माण करते,” असं पोवार यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.

मितालीसोबत पंगा घेतल्याने पोवारांना घरी जावं लागलं होतं…!

मितालीसोबत पंगा घेतल्यानंतर रमेश पोवार यांना पदावरून हटविण्यात आले. हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना या सिनिअर महिला खेळाडूंनी पोवार यांच्या समर्थनार्थ बीसीसीआयला पत्र लिहिले होते तरी पोवार यांना पदावरुन हटविण्यात आले होते. यानंतर डब्ल्यूव्ही रमण यांची महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली. महिला संघाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर पोवारने स्वत: ला प्रशिक्षक म्हणून सिद्ध केले.

प्रशिक्षक म्हणून रमेश पोवारांनी स्वत:ला सिद्ध केलं…!

या वर्षाच्या सुरूवातीला विजय हजारे ट्रॉफीमध्ये अपयशी ठरलेल्या मुंबई संघाला सय्यद मुश्ताक अली टी -२० स्पर्धेचा चॅम्पियन बनविण्यासाठी पोवार यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्याचवेळी माजी भारतीय क्रिकेटपटू रमण यांच्या देखरेखीखालील संघाने गेल्या वर्षी टी -२० विश्वचषकातील अंतिम फेरी गाठली.

दिग्गजांना पछाडत पोवार महिला संघाच्या प्रशिक्षकपदी!

महिल्या संघाच्या प्रशिक्षकपदासाठी एकूण 35 जणांनी अर्ज केले होते. त्यातून 8 जणांची निवड करण्यात आली होती. यामध्ये डबल्यू व्ही रमन, रमेश पवार, ऋषिकेश कानिटकर, अजय रात्रा, सुमन शर्मा, ममाथा माबेन, हेमलता काला आणि देविका वैद्य यांचा समावेश होता. या 8 जणांची मुलाखत ही (Cricket Advisory Committee) बीसीसीआयच्या सल्लागार समितीने घेतली. या समितीमध्ये मदन लाल, सुलक्षणा नाईक आणि आरपी सिंगचा समावेश होतेा. मात्र या 8 जणांना पोवार पुरुन उरले. अखेर सल्लागार समितीने पोवार यांची प्रशिक्षक पदासाठी नाव अंतिम केलं.

हे ही वाचा :

विराटच्या स्वप्नातील ‘नवा भारत’, 6 वर्षांपूर्वी एक स्वप्न पाहिलं, मेहनत घेतली, आज ते पूर्ण झालं!

Ramesh Powar | दिग्गजांना पछाडत रमेश पोवार भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.