आधी प्रतिस्पर्ध्यांना झुंजवलं, नंतर मैदानातच बाळाला स्तनपान

सामन्यात आक्रमक खेळी करत आपल्या संघाला जिंकवण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या ललवेंटुआंगी हिचं ममत्व अवघ्या काही मिनिटांमध्ये पाहायला मिळालं.

आधी प्रतिस्पर्ध्यांना झुंजवलं, नंतर मैदानातच बाळाला स्तनपान
Follow us
| Updated on: Dec 11, 2019 | 3:20 PM

ऐझाल : बाळंतपणानंतर अवघ्या काही महिन्यांतच खेळाच्या मैदानात उतरलेल्या आईचं अनोखं रुप मिझोराममध्ये पाहायला मिळालं. महिलेने व्हॉलीबॉल सामन्याच्या हाफ टाईममध्ये बाळाला स्तनपान (Volleyball Player Breastfeed on ground) केलं. या प्रेरणादायी घटनेचे फोटो सोशल मीडियावर कौतुकास पात्र ठरत आहेत.

मिझोरामची राजधानी ऐझालमध्ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. सोमवारी झालेल्या व्हॉलीबॉल सामन्यात ललवेंटुआंगी ही स्तनदा माता सहभागी झाली होती. सामन्यात आक्रमक खेळी करत आपल्या संघाला जिंकवण्यासाठी जीवाचं रान करणाऱ्या ललवेंटुआंगी हिचं ममत्व अवघ्या काही मिनिटांमध्ये पाहायला मिळालं.

ललवेंटुआंगीचं सात महिन्यांचं बाळ प्रेक्षकांमध्ये बसून एकप्रकारे आईला पाठिंबाच देत होतं. व्हॉलीबॉल सामन्याचा हाफ टाईम झाल्यावर आईने लेकराला काळजाशी कवटाळलं. त्यानंतर बाळाला मैदानातच स्तनपान केलं. मैदानात ही दुहेरी जबाबदारी सांभाळणाऱ्या खेळाडूवर नेटिझन्सकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मिझोरामचे क्रीडामंत्री रॉबर्ट रोमाविया रोयते यांनी ललवेंटुआंगी हिला दहा हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देण्याची घोषणा केली आहे. ऐझाल फुटबॉल क्लबनेही तिच्या ममत्वाला सलाम (Volleyball Player Breastfeed on ground) ठोकला आहे.

Non Stop LIVE Update
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.