मोहम्मद सिराजची 43 वर्षांपूर्वीच्या लाजिरवाण्या विक्रमाशी बरोबरी

मोहम्मद सिराजची 43 वर्षांपूर्वीच्या लाजिरवाण्या विक्रमाशी बरोबरी

Adelaide Oval, Adelaide : ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी 299 धावांचं आव्हान दिलंय. शॉन मार्शची शतकी (131) खेळी आणि ग्लेन मॅक्सवेलच्या धडाकेबाज 48 धावा यामुळे ऑस्ट्रेलियाने मोठी धावसंख्या उभारली. पण शेवटच्या शतकांमध्ये मॅक्सवेल आणि मार्शला बाद केल्यामुळे भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला वेळेतच वेसन घातली. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.

रणजी ट्रॉफीमध्ये चमकलेल्या मोहम्मद सिराजचा हा पहिलाच वन डे सामना आहे. पण पदार्पणाच्या सामन्यातच त्याची ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी जोरदार धुलाई केली. त्याने एवढ्या धावा लुटल्या, ज्या गेल्या 43 वर्षात एकाही गोलंदाजाने दिल्या नव्हत्या. त्याने 10 षटकात 76 धावा दिल्या, जे गेल्या 43 वर्षातलं दुसरं सर्वाधिक खराब प्रदर्शन आहे.

या यादीत पहिल्या क्रमांकावर कर्सन घिवरी यांचा क्रमांक लागतो. त्यांनी 1975 साली इंग्लंडच्या लॉर्ड्सवर झालेल्या सामन्यात 11 षटकात 83 धावा दिल्या होत्या. तर तिसऱ्या क्रमांकावर अमित भंडारी यांचा क्रमांक लागतो. भंडारी यांनी 2000 साली पदार्पणाच्या सामन्यातच धावांची लयलूट केली होती.

भारताकडून भुवनेश्वर कुमारने 45 धावा देऊन 4, मोहम्मद शमीने 58 धावांच्या बदल्यात 3, तर रवींद्र जाडेजाने एक विकेट घेतली. कुलदीप यादव आणि आंतरराष्ट्रीय पदार्पण करत असेलल्या मोहम्मद सिराजला एकही विकेट मिळाली नाही. मोहम्मद सिराजने 10 षटकात सर्वाधिक 76, तर कुलदीपने 66 धावा दिल्या.

मोहम्मद सिराजला त्याच्या लाजिरवाण्या विक्रमाबद्दल ट्रोल करण्यात येतंय. सिराजला कॉफी विथ करणमध्ये पाठवा, असे मिम्स व्हायरल होत आहेत. कॉफी विथ करण या कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे नुकतंच हार्दिक पंड्या आणि केएल राहुलला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलाय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI