मोहसीन नक्वीने भारताची ट्रॉफी देण्यासाठी ठेवली ही अत्यंत मोठी अट, स्वत: सूर्यकुमार यादवच माझ्याकडे…
Asia Cup Trophy Mohsin Naqvi :आशिया कप 2025 च्या फायनलनंतर मोठ्या घडामोडी मैदानावर घडल्या. चक्क भारताची ट्रॉफी चोरून मैदानातून मोहसीन नक्वी यांनी पळ काढला. आता ही ट्रॉफी मिळवण्यासाठी मोहसीन नक्वी यांनी मोठी अट ठेवलीये.

आशिया कप 2025 वर भारताने आपले नाव कोरले. मात्र, अजूनही भारताला आपली ट्रॉफी मिळाली नाही. भारतीय खेळाडू ट्रॉफीशिवायच दुबईच्या मैदानावर जल्लोष साजरा करताना दिसले. आशियाई क्रिकेट कौन्सिलचे अध्यक्ष आणि पाकिस्तानचे माजी मंत्री मोहसीन नक्वी यांच्या हस्ते आशिया चषक घेण्यास भारताच्या टीमने स्पष्टपणे नकार दिला. त्याची कल्पना अगोदरच खेळाडूंनी दिली होती. मात्र, असे असताना देखील मोहसीन नक्वी हे भारतीय खेळाडूंना ट्रॉफी देण्यासाठी मैदानावर आले. शेवटपर्यंत भारतीय खेळाडू आपल्या अटीवर कायम राहिले आणि त्यांनी मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला. मोहसीन नक्वी हे काही वेळ मैदानात थांबले आणि थेट भारतीय संघाची ट्रॉफी आणि खेळाडूंचे मेडल घेऊन चोरट्याप्रमाणे पळून गेले.
नुकताच आता आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीमध्ये यावरून मोठा राडा झाला. शेवटी आपण नवी सुरूवात करू असे म्हणत झालेल्या प्रकारावर मोहसीन नक्वी यांनी माफी मागितली. मात्र, त्यांंनी भारताची ट्रॉफी परत देण्यासाठी मोठी अट ठेवली. त्यांनी म्हटले की, भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने स्वत: माझ्याकडे यावे आणि ट्रॉफी घेऊन जावी. जोपर्यंत सूर्यकुमार यादव येणार नाही, तोपर्यंत ट्रॉफी देणार नसल्याच्या भूमिकेवर ते आहेत.
झालेल्या प्रकारावर मोहसीन नक्वी यांनी माफी मागितली असली तरीही त्यांनी ट्रॉफी आणि मेडल देण्यासाठी अट ठेवली. बैठकीत मोहसीन नक्वी यांनी म्हटले की, मी मैदानात भारतीय संघाला ट्रॉफी देण्यासाठी कितीवेळ थांबलो..मी कार्टुनसारखा तिथे उभा राहिलो पण ते लोक आलीच नाहीत. आता मोहसीन नक्वी यांनी सूर्यकुमारला ट्रॉफी घेण्यासाठी बोलावले आहे.
रिपोर्टनुसार, मोहसीन नक्वी यांच्याकडे ट्रॉफी सूर्यकुमार यादव किंवा दुसरा कोणताही खेळाडू जाणार नाही. मोहसीन नक्वी यांना भारताची ही ट्रॉफी आशियाई क्रिकेट परिषदेकडे किंवा बीसीसीआयकडे द्यावी लागणार आहे. यासोबतच त्यांनी ठेवलेली अट कधीच पूर्ण होणार नाही. फक्त हेच नाही तर मोहसीन नक्वी यांनी पुढील 72 तासांमध्ये जर ही ट्रॉफी दिली नाही तर त्यांच्यावर दुबईत गुन्हा देखील दाखल केला जाऊ शकतो.
