AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mukul Choudhary : थोडक्यात मुंबई इंडियन्सच्या हातून जो मोहरा निसटला तो आज LSG साठी ठरला हिरो, कोण आहे मुकुल चौधरी?

Mukul Choudhary : मुकुल चौधरी या 21 वर्षाच्या मुलाने एकारात्रीत आपली ओळख बनवली आहे. काल कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सचा विजय अशक्य वाटत होता. पण मुकुल चौधरीमुळे विजय शक्य झाला. कोण आहे हा मुलगा? त्याला मिळवण्यासाठी किती टीम्समध्ये होती लढाई? जाणून घ्या.

Mukul Choudhary : थोडक्यात मुंबई इंडियन्सच्या हातून जो मोहरा निसटला तो आज LSG साठी ठरला हिरो, कोण आहे  मुकुल चौधरी?
Mukul ChoudharyImage Credit source: PTI
| Updated on: Apr 10, 2026 | 1:07 PM
Share

आयपीएलच्या स्टेजवर जेव्हा एखादा युवा खेळाडू चमकदार कामगिरी करतो, तेव्हा त्याची चर्चा सुरु होते. हा खेळाडू कुठल्या राज्यातून आहे? फ्रेंचायजीने त्याला विकत घेण्यासाठी किती पैसा मोजला?. फ्रेंजायजीने त्याला का विकत घेतलं? याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. लखनऊ सुपर जायंट्सच्या मुकुल चौधरी बाबत सध्या हेच सुरु आहे. 21 वर्षाच्या मुकुलने काल कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध असाच जबरदस्त खेळ दाखवला. मुकुलने आपल्या खेळाने सर्वांनाच जिंकून घेतलं. आज सगळीकडे मुकुल चौधरीची चर्चा आहे. लखनऊच्या टीमला कोलकाताने विजयासाठी 182 धावांचं टार्गेट दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना एकवेळ लखनऊची अवस्था 7 बाद 128 झाली होती. LSG हा सामना गमावणार असं दिसत होतं. पण मुकुल चौधरीने करिष्माई खेळ दाखवला. त्याने 27 चेंडूत 54 धावा फटकावून आपल्या टीमला अविश्वसनीय वाटणारा विजय मिळवून दिला.

आयपीएल 2026 च्या लिलावत मुकुल चौधरीची बेस प्राइस 30 लाख रुपये होती. त्याच्यावर सर्वात आधी राजस्थान रॉयल्सने बोली लावलेली. पाचवेळची चॅम्पियन मुंबई इंडियन्सची सुद्धा त्याच्यावर नजर होती. मुकुलच्या लांब सिक्स मारण्याच्या क्षमतेमुळे या दोन्ही फ्रेंचायजी त्याच्यावर बोली लावत होत्या. मुंबई आणि राजस्थान यांच्यात मुकुलवर बोली लावण्याची लढाई 1 कोटी पर्यंत चालली. त्यावेळी राजस्थानला असं वाटलं की हा प्लेयर आता आपला आहे. त्याचवेळी लखनऊ सुपर जायंट्सची या बोलीमध्ये एन्ट्री झाली.

मुकुलसाठी राजस्थानने किती कोटींची बोली लावली?

मुकुल चौधरीसाठी राजस्थान रॉयल्स आणि लखनऊ सुपर जायंट्समध्ये तगडं बिडवॉर चाललं. राजस्थानला काहीही करुन मुकुल आपल्या टीममध्ये हवा होता. यासाठी त्यांनी तब्बल 2.40 कोटी रुपयापर्यंत बोली लावली. अखेर लखनऊच्या टीमने त्यांच्यापेक्षा 20 लाख रुपयांची जास्त बोली लावून 2.60 कोटींना मुकुल चौधरीला विकत घेतलं. आज त्याचा त्यांना फायदा झालाय.

कसा आहे मुकूल चौधरीचा प्रवास?

“माझा क्रिकेटचा प्रवास हा माझ्या जन्माआधीपासूनच सुरु झालेला. माझ्या वडिलांचं स्वप्न होतं की, एकदिवस माझा मुलगा क्रिकेट खेळेल. त्यावेळी आमच्या कुटुंबाची स्थिती चांगली नव्हती. मी वयाच्या 12-13 व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यावेळी जास्त क्रिकेट अकादमी नव्हत्या. त्यावेळी सीकरमध्ये SBS क्रिकेट अकादमी होती. मी तिथे 5-6 वर्ष प्रशिक्षण घेतलं. नंतर चांगल्या लेव्हलचं क्रिकेट खेळण्यासाठी जयपूरला गेलो. मी मागच्या चार वर्षांपासून जयपूरमध्ये प्रॅक्टिस करतोय” असं मुकूल चौधरीने सांगितलं.

Follow Us
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले
महाराष्ट्रात ही पद्धत कधीच नव्हती, विजय वडेट्टीवार संतापले.
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; तरी बारामतीत मतदान होणार?.
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट.
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया.
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार.
कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्
कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्.