नाशिकची कोमल एक्स्प्रेस सुसाट; राष्ट्रीय स्पर्धेत दुसरे सुवर्ण, आशियाई स्पर्धेसाठी पात्र

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Sep 30, 2021 | 6:14 PM

नाशिकच्या भोंसला खेलो इंडिया व एक्सलन्स सेंटरची धावपटू कोमल जगदाळने राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला आहे.

नाशिकची कोमल एक्स्प्रेस सुसाट; राष्ट्रीय स्पर्धेत दुसरे सुवर्ण, आशियाई स्पर्धेसाठी पात्र
कोमल जगदाळे, धावपटू.

नाशिकः नाशिकच्या भोंसला खेलो इंडिया व एक्सलन्स सेंटरची धावपटू कोमल जगदाळने राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला आहे. महिलांच्या तीन हजार स्टिपलेस प्रकारात ती अजिंक्य ठरली. त्यामुळे तिचे कौतुक होत असून, या यशाने ती आता 2022 मध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठीही पात्र ठरली आहे.

दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर सध्या 23 वर्षांखालील राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धा सुरू आहेत. नाशिकची कोमल जगदाळे ही लांब पल्ल्यांची धावपटू आहे. या स्पर्धेत तिने तीन हजार मीटर स्टिपलचेस प्रकारात हे अंतर 9 मिनिटे आणि 51.56 सेकंदात पार केले. या यशाबद्दल कोमलचे कौतुक होत आहे. तिचे हे या स्पर्धेतले दुसरे सुवर्णपदक आहे. यापूर्वी तिने याच स्पर्धेत महिलांच्या पाच हजार मीटर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. हे अंतर तिने कोमलने 16:03:53 इतक्या वेळेत कापले. स्पर्धेत हरियाणाच्या सोनिकाने 17:00:46 वेळेत अंतर कापत रौप्य पदक मिळवले. तर एस. बाधो हिने 17:40:41 वेळेत अंतर कापत कांस्य पदक पटकावले. मात्र, या दोघीही कोमलच्या खूप मागे राहिल्या होत्या. या स्पर्धेत यश मिळवल्याने कोमल जगदाळे 2022 मध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.

आदेश यादवलाही सुवर्ण दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या गटात नाशिकच्या भोंसला खेलो इंडिया व एक्सलन्स सेंटरचा धावपटू आदेश यादवनेही सुवर्णपदक पटकावले आहे. आदेश यादवने 14:12:36 या वेळेत अंतर कापले. पुरुष गटात उत्तर प्रदेशच्या प्रिन्सकुमारने रौप्यपदक पटकावले. त्याने 14:17:37 या वेळेत अंतर कापले. अजय राठीने 14:21:41 इतक्या वेळेत अंतर कापले. त्याला कांस्यपदक पदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत यश मिळवल्याने आदेश यादव ही 2022 मध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. कोमल आणि आदेशच्या यशाबद्दल सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीने त्यांचे अभिनंद केले आहे. सोसायटीचे सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, विभागाचे कार्यवाह हेमंद देशपांडे, खेलो इंडियाचे पालक प्रशांत नाईक, सेंटरचे संचालक डॉ. विवेक राजे, प्राचार्य डॉ. उन्मेष कुलकर्णी यांनी खेळडूंच्या यशाबद्दल त्यांचा अभिनंदन केले आहे. (Nashik runners Komal Jagdale and Aadesh Yadav won gold medals in the National Athletics Championships)

इतर बातम्याः

नाशिक येथे कृषी भवन उभारणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा

नाशिकमधल्या ‘मित्रा’च्या इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन; विकास आणि पर्यावरणाचा सांधा म्हणून संस्था काम करेल असा विश्वास

Special Report: अहो, नाशिकच काय? गल्लीपासून दिल्लीपर्यंत…नावात बरंच काही आहे!

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI