ऐसी धाकड है! जिगरबाज कोमलला तिसरे सुवर्णपदक; राष्ट्रीय स्पर्धेत नाशिकचा दबदबा

दिल्ली येथे सुरू असलेल्या 23 वर्षांखालील राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेच्या महिला गटात नाशिकच्या कोमल जगदाळेने तिसरे सुवर्णपदक पटकावले, तर नाशिकच्या आदेश यादवने रौप्य पदकावर नाव कोरले.

ऐसी धाकड है! जिगरबाज कोमलला तिसरे सुवर्णपदक; राष्ट्रीय स्पर्धेत नाशिकचा दबदबा
कोमल जगदाळे, धावपटू.

नाशिकः दिल्ली येथे सुरू असलेल्या 23 वर्षांखालील राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेच्या महिला गटात नाशिकच्या कोमल जगदाळेने तिसरे सुवर्णपदक पटकावले, तर नाशिकच्या आदेश यादवने रौप्य पदकावर नाव कोरले. या स्पर्धेत नाशिकच्या भोंसला खेळो इंडिया व एक्सलन्स सेंटरच्या धावपटूंनी चार सुवर्ण, दोन रौप्य आणि एका कांस्यपदकाची लयलूट केली आहे.

कोमल आदेश हे दोघेही भोंसला खेळो इंडिया व एक्सलन्स सेंटरकडून खेळतात. कोमलन दहा हजार मीटर धावण्याच्या स्पर्धेत हे पदक पटाकवले आहे. कोमलने 9:51:36 वेळेत हे अंतर पार केले, तर आदेशने 30:43:22 वेळेत स्पर्धेचे अंतर पार केले. कोमल जगदाळे ही लांब पल्ल्यांची धावपटू आहे. या स्पर्धेत तिने याच स्पर्धेत महिलांच्या तीन हजार स्टिपलेस प्रकारात आणि महिलांच्या पाच हजार मीटर स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. हे अंतर तिने कोमलने 16:03:53 इतक्या वेळेत कापले. स्पर्धेत हरियाणाच्या सोनिकाने 17:00:46 वेळेत अंतर कापत रौप्य पदक मिळवले. तर एस. बाधो हिने 17:40:41 वेळेत अंतर कापत कांस्य पदक पटकावले. मात्र, या दोघीही कोमलच्या खूप मागे राहिल्या होत्या. या स्पर्धेत यश मिळवल्याने कोमल जगदाळे 2022 मध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.

आदेशलाही मिळाले आहे सुवर्ण

दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत पुरुषांच्या गटात नाशिकच्या भोंसला खेलो इंडिया व एक्सलन्स सेंटरचा धावपटू आदेश यादवनेही यापूर्वी याच स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. आदेश यादवने 14:12:36 या वेळेत अंतर कापले. पुरुष गटात उत्तर प्रदेशच्या प्रिन्सकुमारने रौप्यपदक पटकावले. त्याने 14:17:37 या वेळेत अंतर कापले. अजय राठीने 14:21:41 इतक्या वेळेत अंतर कापले. त्याला कांस्यपदक पदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत यश मिळवल्याने आदेश यादव ही 2022 मध्ये होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. कोमल आणि आदेशच्या यशाबद्दल सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीने त्यांचे अभिनंद केले आहे. सोसायटीचे सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, विभागाचे कार्यवाह हेमंद देशपांडे, खेलो इंडियाचे पालक प्रशांत नाईक, सेंटरचे संचालक डॉ. विवेक राजे, प्राचार्य डॉ. उन्मेष कुलकर्णी यांनी खेळडूंच्या यशाबद्दल त्यांचा अभिनंदन केले आहे. (Nashik runners Komal Jagdale won gold medals in the National Athletics Championships)

इतर बातम्याः

भुजबळ धमकीप्रकरणी दूध का दूध पानी का पानी होणार; आमदार कांदेंसह छोटा राजनच्या पुतण्याला समन्स

आयपीएल बुकीची ‘माया’ पडली महागात; 30 लाखांची लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला नाशिकमध्ये बेड्या

आई राजा उदो उदो: नवरात्रोत्सवात वणीचे सप्तश्रृंगी मंदिर 24 तास सुरू; यात्रा रद्द, दर्शनासाठी कडक नियम

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI