पाक खेळाडूंसाठी बिर्यानी आणि मिठाई बंद, मिसबाह ऊल हक यांचं फर्मान

विश्वकप 2019 मध्ये भारताकडून पराभव स्विकारल्यानंतर पाकिस्तानी संघाच्या (Pakistan cricket team) फिटनेसवरुन अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तसेच खेळादरम्यान पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) जांभई देताना कॅमेरात कैद झाला होता.

पाक खेळाडूंसाठी बिर्यानी आणि मिठाई बंद, मिसबाह ऊल हक यांचं फर्मान

इस्लामाबाद : विश्वकप 2019 मध्ये भारताकडून पराभव स्विकारल्यानंतर पाकिस्तानी संघाच्या (Pakistan cricket team) फिटनेसवरुन अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. तसेच खेळादरम्यान पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद (Sarfaraz Ahmed) जांभई देताना कॅमेरात कैद झाला होता. यानंतर सामन्याच्या एक दिवसआधी पाकिस्तानच्या संघाने (Pakistan cricket team) बर्गर, पिझ्झा आणि बिर्यानीसारखे जंक फूड खाल्ले होते. त्यामुळे पाकिस्तानी संघाच्या फिटनेसवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र आता पाकिस्तानचे नवीन मुख्य प्रशिक्षक मिसबाह उल हक (Coach Misbah Ul Haq) यांनी देशांतर्गत स्पर्धा आणि राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंच्या डाएटमध्ये बदल केला आहे.

नवे प्रशिक्षक मिसबाह यांनी डाएटमध्ये बदल केल्यामुळे सोशल मीडियावर जोरदार त्यांच्या या निर्णयाची चर्चा सुरु आहे. देशांतर्गत स्पर्धेदरम्यान आणि राष्ट्रीय स्पर्धेत खेळाडूंसाठी जड आहार उपलब्ध नसेल. कारण खेळाडूंना राष्ट्रीय संघात जागा बनवण्यासाठी सर्वश्रेष्ठ फिटनेस तयार करावा लागणार आहे, असे आदेश नवे प्रशिक्षक मिसबाह यांनी दिले आहेत.

कायदे आजम ट्रॉफी सामन्यात खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था बघणाऱ्या एका कंपनीच्या सदस्याने म्हटले की, “खेळाडूंना आता बिर्यानी, तेल युक्त रेड मीटचे जेवण आणि मिठाई दिली जाणार नाही”.

नुकतेच पाकिस्तानचा माजी क्रिकेटर मिसबाह यांची संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच माजी वेगवान गोलंदाज वकार यूनिस यांची गोलंदाज प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये हे दोघंही प्रशिक्षक म्हणून आपली जबाबदारी पार पाडतील. यासाठी त्यांचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डसोबत (पीसीबी) तीन वर्षाचा करारही झाला आहे.

“ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे आणि त्यापेक्षाही एक मोठी जबाबदारी आहे. कारण आम्ही क्रिकेटसाठी जगतो आणि आमच्या श्वासातही क्रिकेट आहे”, असं मिसबाह 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेताना म्हटला होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *