VIDEO: रिषभ पंतच्या ‘त्या’ शॉटचा सातासमुद्रापार जलवा, न्यूझीलंडच्या बॅटसमनने मारला रिव्हर्स स्कूप

बांग्लादेशचा गोंलदाज मुस्ताफिजूर रहमानच्या गोलंदाजीवर डेवोन कॉनवे यानं रिव्हर्स स्कूप शॉट मारला. Devon Conway plays reverse scoop

VIDEO: रिषभ पंतच्या 'त्या' शॉटचा सातासमुद्रापार जलवा, न्यूझीलंडच्या बॅटसमनने मारला रिव्हर्स स्कूप
डेवोन कॉनवे
Follow us
| Updated on: Mar 28, 2021 | 5:42 PM

मुंबई: भारत आणि इंग्लंड (IND VS ENG) यांच्यामध्ये तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना सुरु आहे. इंग्लंड विरोधातील वनडे मालिकेत भारताचा विकेटकीपर रिषभ पंतची बॅट चांगलीचं तळपत आहे. रिषभ पंतने कसोटी आणि टी-20 मालिकेतही इंग्लंडच्या गोलंदाजीवर जोरदार फटकेबाजी केली होती. इंग्लंडचे प्रमुख गोलंदाज जेम्स अँडरसन आणि जोफ्रा आर्चर यांची धुलाई देखील रिषभ पंतनं केली होती. रिषभ पंतचे रिव्हर्स स्कूप शॉट चर्चेचा विषय ठरले आहेत. रिषभ पंतच्या या शॉटची क्रेझ जगभरात पोहोचली आहे. न्यूझीलंडचा फलंदाज डेवोन कॉनवे यानं देखील रिव्हर्स स्कूप शॉट मारला. (NZvsBAN Devon Conway plays reverse scoop on bowling of mustafizur rahman copy style of Rishabh Pant)

डेवोन कॉनवेचा रिव्हर्स स्कूप शॉट

न्यूझीलंडचा फलंदाज डेवोन कॉनवे यानं रविवारी बांग्लादेश विरोधातील मॅचमध्ये हा शॉट लगावला. न्यूझीलंड आणि बांग्लादेश यांच्यामध्ये टी-20 मालिका सुरु आहे. यामॅचमध्ये बांग्लादेशचा गोंलदाज मुस्ताफिजूर रहमानच्या गोलंदाजीवर डेवोन कॉनवे यानं रिव्हर्स स्कूप शॉट मारला. तो थेट सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडला. डेवोन कॉनवे यानं 52 बॉलमध्ये 92 धावा केल्या.

न्यूझीलंड आणि बांग्लादेश यांच्यामध्ये हॅमिल्टन येथील मैदानावर टी-20 सामना खेळवण्यात आला. कॉवेनच्या फलंदाजीच्या जोरावर न्यूझीलंडनं 20 ओव्हरमध्ये 210 धावा केल्या. विल यंग याने देखील 53 धावा केल्या. बांग्लादेशला 20 ओव्हरमध्ये 8 गड्यांच्या मोबदल्यात 144 धावा करता आल्या.

भारताचं इंग्लंडसमोर 330 धावांचं आव्हान

दुसरीकडे, भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील अतिंम सामना पुण्यात खेळवला जात आहे. भारतातर्फे आजही रिषभ पंतनं धुवांधार फलंदाजी केली. भारताविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय (India vs England 3rd ODI) सामन्यात ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, शार्दूल ठाकूर यांनी संकटसमयी केलेल्या जबरदस्त फलंदाजीमुळे टीम इंडियाला पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलं. भारतीय संघाने टीम इंडियाला 330 धावांचं आव्हान दिलं आहे. भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या गोलंदाजांच्या माऱ्याला कडवी झुंज देत 329 धावांचा डोंगर उभा केला.

संबंधित बातम्या

IND vs ENG 3rd ODI Live Score : भारतीय संघ 329 धावा करुन तंबूत, इंग्लंडला 330 धावांचं आव्हान

चार गडी तंबूत परतले, पंत आणि पांड्याच्या भागीदारीचं नवं वादळ, इंग्लिश गोलंदाजांना धू धू धुतलं

(NZvsBAN Devon Conway plays reverse scoop on bowling of Mustafizur Rahman copy style of Rishabh Pant)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.