बालेवाडी मैदानात ऑलिम्पिक प्रेरणा प्रदर्शन

बालेवाडी मैदानात ऑलिम्पिक प्रेरणा प्रदर्शन

पुणे : खेलो इंडिया स्पर्धेच्या निमित्ताने पुण्याच्या बालेवाडी स्टेडियममध्ये ऑलिम्पिक प्रेरणा प्रदर्शन भरवण्यात आलं होते. या प्रदर्शनाला क्रिडा प्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाचे आयोजन संजय दुधाणे यांनी केले होते.

महाराष्ट्र सरकारने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात तब्ब्ल सहा हजार खेळाडू सहभागी झाले आहेत. तसेच यामध्ये अंडर 17 आणि अंडर 21 वयोगटातील खेळाडू एकूण 18 खेळात आपले नशीब आजमवणार आहेत. यामध्ये अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, फुटबॉल, कुस्तीसह इतर खेळांचा समावेश आहे.

बालेवाडी स्टेडियममध्ये ऑलिम्पिक प्रेरणा प्रदर्शन कार्यक्रमात पुण्यातील शालेय विद्यार्थ्यांनीही हजेरी लावली.

या प्रदर्शनामध्ये ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती पी. व्ही, सिंधूंने रिओ स्पर्धेत खेळलेले शटल, मेरी कोमने सरावासाठी वापरलेले ग्लोव्ह ज्अशा दुर्मीळ वस्तूंचे प्रदर्शन या ठिकाणी लावण्यात आले आहे.

खाशाबा जाधव आणि बाबू निमल यांनी जिंंकलेले ऑलिम्पिक पदक, 70 दुर्मिळ छायाचित्र आणि ऑलिम्पिकचा खजिना खेलो इंडियाच्या निमित्ताने सुरू होणार्‍या ऑलिम्पिक प्रेरणा प्रदर्शनात पाहाण्याची पर्वणी देशभरातील खेळाडूंना मिळत आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI