AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FIFA World Cup 2026 स्पर्धेत विषारी सापांचा विळखा, जर्मनीचा संघ थोडक्यात बचावला; स्वित्झर्लंडचा संघही चिंतेत

Snake in FIFA World Cup 2026: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता प्रत्येक सामन्यानंतर पुढे सरकत आहे. असं असताना फुटबॉल खेळाडूंमध्ये आता सापांची चर्चा सुरू झाली आहे. या स्पर्धेत सापांचं सावट दिसून आलं आहे. जर्मनी संघाने त्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

FIFA World Cup 2026 स्पर्धेत विषारी सापांचा विळखा, जर्मनीचा संघ थोडक्यात बचावला; स्वित्झर्लंडचा संघही चिंतेत
FIFA World Cup 2026 स्पर्धेत विषारी सापांचा विळखा, जर्मनीचा संघ थोडक्यात बचावला; स्वित्झर्लंडचा संघही चिंतेतImage Credit source: Getty Images
| Updated on: Jun 17, 2026 | 3:43 PM
Share

Snake in Germany Training Camp: फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेला अपेक्षेप्रमाणे सुरूवात झाली आहे. सुरूवातीच्या काही सामन्यात रोमांचक लढती पाहण्याची संधी क्रीडाप्रेमींना मिळाली. फिफा वर्ल्डकप स्पर्धेच्या 23व्या पर्वात पुढच्या सामन्यातही असंच काहीसं पाहायला मिळणार यात काही शंका नाही. असं असताना या स्पर्धेदरम्यान विषारी सापांची भीती मनात घर करून बसली आहे. फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेदरम्यात जर्मनीच्या संघाचा थेट सामना सापाशी झाली. सराव शिबिरात सापाने एन्ट्री मारल्याने धावाधाव झाली. सुदैवाने जर्मनीच्या खेळाडूंना काही झालं नाही. जर सापाकडे लक्ष गेलं नसतं तर काही घडू शकलं असतं. सापाची दहशत असताना जर्मनीने सराव केला, पण चिंताही व्यक्त केली. अशीच काहीशी चिंता नॉर्वे आणि स्वित्झर्लंड संघाने व्यक्त केली आहे.

जर्मनी संघाचा सापाशी आमनसामना

फिफा वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान जर्मनी संघाचा कर्णधार जोशुआ किमिट याने बीसीसी स्पोर्ट्सलला दिलेल्या मुलाखतीत सराव शिबिरात साप आल्याचं सांगितलं. आम्ही विरोधी संघाच्या कमकुवत आणि ताकदीच्या गोष्टींवर चर्चा करत असतो. पण त्याच बरोबर आम्हाला गवतात लपलेल्या सापांवरही लक्ष ठेवावं लागतंय. आमच्या ट्रेनिंग कॅम्पमध्ये साप पाहिले आहेत. साप इतके विषारी आहेत की दंशामुळे तर सरळ रुग्णालयात जाण्याची वेळ येऊ शकते. जर्मन कर्णधाराच्या मते, सापाचे विष प्राणघातक नसले तरी ते निश्चितच धोकादायक आहे. जर्मन कर्णधार आणि संघ सापाच्या प्रकरणातून थोडक्यात बचावले.

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत सापांबाबत पहिल्यांदाच काही चर्चा होते असं नाही. नॉर्वे आणि स्वित्झर्लंड संघानेही सापांबाबत चिंता व्यक्त केली आहे. स्वित्झर्लंड संघाला सराव शिबीर सोडून इतरत्र जाऊ नये याबाबत आधीच सूचना दिल्या गेल्या आहेत. कारण त्याच्या सराव शिबिराजवळ सापांचा वावर आहे. सापांच्या स्थितीमुळे स्वीस खेळाडूंना प्रशिक्षण शिबिराबाहेर फुटबॉल मारल्यास न आणण्याच्या सूचना दिल्या आहे. सापांचा धोका टाळण्यासाठी दुसरा चेंडू वापरण्यास सांगितलं आहे. त्यामुळे विरोधी संघांविरुद्ध रणनिती आखायची की जीव मुठीत धरून सराव करायचा असा प्रश्न आता पडला आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा